Join us

नूडल्स खाण्याची खूप इच्छा होतेय? ५ गोष्टी करा- मैद्याच्या नूडल्सही होतील हेल्दी-खा पौष्टिक पोटभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2025 16:37 IST

5 Cooking Tips For Making Noodles More Healthy: नूडल्स, इंस्टंट नूडल्स खाण्याची इच्छा जर अनावर होत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरून त्यांना तुम्ही एक हेल्दी टच देऊ शकाल..(5 Tips To Enjoy Your Maida Noodles Guilt-Free)

ठळक मुद्देतुम्हाला नूडल्स खाण्याची खूपच इच्छा झाली तर या काही गोष्टी नक्की करून पाहा..

वजन कमी करायचं किंवा आरोग्य जपायचं म्हणून काही जण आता बऱ्यापैकी जागरुक झाले आहेत. खाण्यापिण्यावरही त्यांचा व्यवस्थित ताबा असतो. मनात असूनही वजन- शुगर वाढेल किंवा तब्येत बिघडेल या भीतीने ते अनेक पदार्थ खाणं टाळतात. पण कधी कधी आपल्या अतिशय आवडीचा पदार्थ समोर दिसला की मग मात्र मनावरचा ताबा सुटतो आणि तो पदार्थ खावा वाटतो. असं खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या बाबतीत प्रत्येकवेळी मन मारून जमत नाही (how to make maida noodles more healthy?). त्यासाठीच जर कधी तुम्हाला नूडल्स खाण्याची खूपच इच्छा झाली तर या काही गोष्टी नक्की करून पाहा (5 cooking tips for making noodles more healthy). त्यामुळे नूडल्स अधिक आरोग्यदायी होऊ शकतात.(5 Tips To enjoy Your Maida Noodles Guilt-Free)

मैद्याच्या नूडल्स अधिक हेल्दी होण्यासाठी टिप्स

 

१. फायबर असणाऱ्या भाज्या घाला

मैद्याच्या नूडल्स पचायला जड असतात. त्यामुळे नूडल्स करताना त्यात नेहमी पालक, ब्रोकोली, गाजर, सिमला मिरची, पत्ताकोबी अशा फायबरयुक्त भाज्या जास्त प्रमाणात घाला. कारण या भाज्या पचनासाठी मदत करतात. त्यामुळे नूडल्स पचायला जड जात नाहीत.

फक्त ४ टोमॅटोंपासून करा १०० पापड! खमंग पापडांची ही सोपी रेसिपी यंदा करून पाहाच

२. तेलाचा वापर

नूडल्स करताना त्यात खूप जास्त तेल घातलं जातं. एवढ्या जास्त प्रमाणात तेल खाणं आरोग्यासाठी चांगलं नाहीच. त्यामुळे नूडल्स तयार करताना त्यात कमीतकमी तेल घाला. खूप जास्त तेलकट नूडल्स खाऊ नका. तसेच नूडल्स करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल, तिळाचं तेल असे तेलाचे जास्त हेल्दी पर्याय वापरा.

 

३. प्रोटीनयुक्त पदार्थांचा वापर

नूडल्स तयार करताना त्यात फायबरयुक्त भाज्यांप्रमाणेच जर काही प्रोटीनयुक्त पदार्थही घातले तर नूडल्स नक्कीच जास्त हेल्दी होतात. यासाठी तुम्ही पनीर, चीज, कडधान्ये, मशरूम अशा काही पदार्थांचा वापर करू शकता.

व्हिटॅमिन B12 कमी असल्याने अशक्तपणा येतो? ७ शाकाहारी पदार्थ खा- थकवा पळून जाईल

४. घरचे मसाले वापरा

नूडल्ससोबत त्याचा खास मसालासुद्धा येतो. या मसाल्यांमुळे नूडल्सची चव जास्त खुलते यात वादच नाही. पण त्या मसाल्यांमध्ये सोडीयमचा तसेच प्रिझर्व्हेटीव्हचा खूप जास्त वापर केलेला असतो. त्यामुळे ते मसाले वापरणं टाळा किंवा मग त्यांचा खूपच कमी वापर करा. त्याऐवजी घरगुती मसाल्यांचा जास्त प्रमाणात वापर करा.

 

५. खाण्याचे प्रमाण

तुम्ही नूडल्स किती प्रमाणात खात आहात हे देखील खूप जास्त महत्त्वाचं आहे. तोंडाची चव खुलविण्यापुरत्याच नूडल्स खा. जेवणासारख्या हेवी प्रमाणात त्या खाऊ नका. ही पथ्यं पाळली तर नूडल्स खाणंही आरोग्यदायी ठरू शकतं.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आरोग्यहेल्थ टिप्सपाककृतीभाज्या