Lokmat Sakhi >Food > १ वाटी रव्याचे करा कुरकुरीत-मऊ मेदू वडे; डाळ न दळता- न भिजवता १० मिनिटांत बनतील वडे

१ वाटी रव्याचे करा कुरकुरीत-मऊ मेदू वडे; डाळ न दळता- न भिजवता १० मिनिटांत बनतील वडे

How to Make Instant Suji Medu Vada : इंस्टट मेदूवडे करण्यासाठी तुम्हाला डाळ भिजवावी लागत नाही-ना डाळ दळावी लागते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 01:08 PM2023-11-16T13:08:28+5:302023-11-17T11:34:48+5:30

How to Make Instant Suji Medu Vada : इंस्टट मेदूवडे करण्यासाठी तुम्हाला डाळ भिजवावी लागत नाही-ना डाळ दळावी लागते.

How to Make Instant Suji Medu Vada : Rava Medu Vada Recipe in Marathi | १ वाटी रव्याचे करा कुरकुरीत-मऊ मेदू वडे; डाळ न दळता- न भिजवता १० मिनिटांत बनतील वडे

१ वाटी रव्याचे करा कुरकुरीत-मऊ मेदू वडे; डाळ न दळता- न भिजवता १० मिनिटांत बनतील वडे

नाश्त्याला मेदूवडे (Medu Vada) खायला सर्वांनाच खायला आवडते. (Cooking Tips) पण मेदूवडे करायचं म्हटलं की डाळ भिजवा-डाळ दळा अशी वेगवेगळी कामं करावी लागतात ज्यात बराचवेळ जातो. (Rava medu vada kasa karaycha marathi) घरच्याघरी मेदूवडे करण्याची सोपी पद्धत म्हणजे तुम्ही इंस्टंट मेदूवडे ट्राय करू शकतात. इंस्टट मेदू वडे करण्यासाठी तुम्हाला डाळ भिजवावी लागत नाही-ना डाळ दळावी लागते. मेदू वडे करण्याची सोपी रेसिपी पाहूया. वरून कुरकरीत आणि आतून सुपर सॉफ्ट रव्याचा वडा तुम्हाला पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होईल. (How to Make Instant Suji Medu Vada)

इस्टंट मेदू वडा बनवण्यासाठी काय साहित्य लागते?  (Instant Rawa Medu vada Making Steps)

1) रवा- ३/4 कप रवा

2) पाणी - १ कप

3) मीठ- चवीनुसार

4) बारीक चिरलेल्या मिरच्या - १ ते २

5) कढीपत्ते- ८ ते १०

6) किसलेलं आलं- २ टिस्पून

7) बारीक चिरलेला कांदा- १ 

8) बारीक चिरलेली कोथिंबीर- १ टेबलस्पून

9) तेल-  तळण्यासाठी

रव्याचे मेदू वडे करण्याची सोपी पद्धत (How to Make Suji Meduvada)

१) सगळ्यात आधी एका कढईत पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात वाटीभर रवा घाला. त्यात चमचाभर मीठ घालून रवा पाणी शोषून घेईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्या. 

२) नंतर रव्याचा गोळा एका ताटात काढून घ्या. त्यात १ कांदा चिरून घाला, १ बारीक चिरलेली मिरची,  एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,१ टिस्पून काळी मिरी घाला. 

३) त्यात अर्धा ते एक टिस्पून तेल घालून मिश्रण एकजीव करून घ्या आणि मेदू वड्याप्रमाणे आकार तयार करा. पिठाच्या गोळ्याला गोल आकार देऊन यीमध्ये छिद्र पाडून घ्या.

कुरकुरीत भेंडी फ्रायची सोपी रेसिपी-एकदा ट्राय करा, भेंडीला नाक मुरडणारेही आवडीने खातील

४) नंतर कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात तयार पिठाचे वडे घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या.  वडे पूर्ण बुडतील इतके तेल कढईत ठेवा.

५) ज्यामुळे वडे कोणत्याही बाजूने जळणार नाहीत आणि छान टेक्चर येईल. वडे तळून  झाल्यानंतर एका ताटात काढून घ्या. तयार आहेत गरमागरम मेदूवडे.

Web Title: How to Make Instant Suji Medu Vada : Rava Medu Vada Recipe in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.