lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > वाटीभर बेसनाचा करा मऊ-फुललेला, जाळीदार ढोकळा; ४ टिप्स, मार्केटसारखा ढोकळा बनेल घरी

वाटीभर बेसनाचा करा मऊ-फुललेला, जाळीदार ढोकळा; ४ टिप्स, मार्केटसारखा ढोकळा बनेल घरी

How to make dhokla fluffy : प्रत्येकवेळी ढोकळ्यासाठी डाळ-तांदूळच दळावे लागतात असं नाही. घरात जर रवा किंवा बेसन असेल तरीही  ढोकळा बनवता येतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 08:36 AM2023-07-20T08:36:00+5:302023-07-20T08:40:01+5:30

How to make dhokla fluffy : प्रत्येकवेळी ढोकळ्यासाठी डाळ-तांदूळच दळावे लागतात असं नाही. घरात जर रवा किंवा बेसन असेल तरीही  ढोकळा बनवता येतो.

How to make dhokla fluffy : Easy Dhokla recipe How to Make Soft and Spongy Dhokla | वाटीभर बेसनाचा करा मऊ-फुललेला, जाळीदार ढोकळा; ४ टिप्स, मार्केटसारखा ढोकळा बनेल घरी

वाटीभर बेसनाचा करा मऊ-फुललेला, जाळीदार ढोकळा; ४ टिप्स, मार्केटसारखा ढोकळा बनेल घरी

नाश्त्याला  काहीतरी नवीन खावंस वाटलं की नेहमी बाहेरून आणलेले पदार्थ  खाल्ले जातात.  रोज सकाळच्या नाश्त्यासाठी आणि मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासााठी ढोकळा उत्तम पर्याय आहे. ढोकळा हा कमी कॅलरीजयुक्त पदार्थ असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीनं हा पदार्थ खातात. (How to make dhokla) ढोकळा बनवण्याच्या अनेक पद्धती आहेत. (How to Make Soft and Spongy Dhokla)

काहींना पांढरा ढोकळा आवडतो तर काहींना ताकातला ढोकळा आवडतो. मऊ, फुगलेला ढोकळा  घरी बनवणं सुद्धा सोपं आहे. प्रत्येकवेळी ढोकळ्यासाठी डाळ-तांदूळच दळावे लागतात असं नाही. घरात जर रवा किंवा बेसन असेल तरीही  ढोकळा बनवता येतो. ढोकळा बनण्याची परफेक्ट पद्धत पाहूया. (How to make dhokla fluffy)

ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात आधी १ वाटी  रवा घ्या. त्यात १ कप बेसन पीठ, १ कप दही, बारीक चिरलेल्या मिरच्या, बारीक चिरलेला लसूण, हळद, मीठ घाला. पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.  मग झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवा. त्यात इनो, लिंबाचा रस घालून पुन्हा ढवळा. एका भांड्याला तेलानं ग्रीस करून  त्यात हे मिश्रण घाला आणि वाफेवर शिजवण्यासाठी ठेवा. (How To Make Soft And Spongy Dhoklas)

१० मिनिटांनी गॅस बंद करून  झाकण काढून घ्या. तयार ढोकळ्यावर तेल, मोहोरी, जीर, कढीपत्ता, तीळ, मिरचीची फोडणी द्या. या फोडणीत  साखरेचं पाणी घालून परसवून घ्या. मग या मिश्रणाचे चौकोनी काप करा. तयार आहे गरमागरम ढोकळा. मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा पाहूणे आल्यावर त्यांना खायला देण्यासाठी हा उत्तम नाश्ता आहे. 

परफेक्ट ढोकळा बनवण्याच्या टिप्स

१) ढोकळा बनवण्यासाठी बेसनाचे पीठ व्यवस्थित चाळणे फार महत्वाचे आहे. चण्याचं पीठ चाळून बारीक पिठाचा ढोकळे बनवण्यासाठी वापर करा.

२) ढोकळा मऊ होण्यासाठी मिश्रण व्यवस्थित फेटणे फार महत्वाचे आहे. मिश्रण एका दिशेने हळूहळू ढवळत असताना पाणी घाला. तुम्ही मिश्रण हातानेही फेटू शकता.

३) जास्त हळद घालू नका. रंग येण्यासाठी काहीजण ढोकळ्यामध्ये जास्त हळद घालतात पण यामुळे चवसुद्धा बिघडू शकते.

४) अनेकदा बेकिंग सोडा घातल्यानंतर ढोकळा व्यवस्थित फुलत नाही. यासाठी बेकिंग सोडा टाकल्यानंतर बॅटर नीट ढवळून घ्या आणि मिश्रण २० ते २५ मिनिटे तसेच ठेवा.

Web Title: How to make dhokla fluffy : Easy Dhokla recipe How to Make Soft and Spongy Dhokla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.