Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > एकदा माठ भरला की किती दिवस तुम्ही त्यातलं पाणी पिता? ‘एवढ्या’ तासांनी पाणी बदला कारण...

एकदा माठ भरला की किती दिवस तुम्ही त्यातलं पाणी पिता? ‘एवढ्या’ तासांनी पाणी बदला कारण...

how often to change matka water : how often should you change water in clay pot in summer : how many days water stays fresh in matka : फ्रीजपेक्षा माठातलं पाणी उत्तम! पण ते नेमकं किती दिवसांनी बदलावं पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2026 18:00 IST2026-04-30T18:00:00+5:302026-04-30T18:00:02+5:30

how often to change matka water : how often should you change water in clay pot in summer : how many days water stays fresh in matka : फ्रीजपेक्षा माठातलं पाणी उत्तम! पण ते नेमकं किती दिवसांनी बदलावं पाहा...

how often to change matka water how often should you change water in clay pot in summer | एकदा माठ भरला की किती दिवस तुम्ही त्यातलं पाणी पिता? ‘एवढ्या’ तासांनी पाणी बदला कारण...

एकदा माठ भरला की किती दिवस तुम्ही त्यातलं पाणी पिता? ‘एवढ्या’ तासांनी पाणी बदला कारण...

उन्हाळा सुरू झाला की, थंडगार आणि मातीचा सुगंध मिश्रित नैसर्गिक पाण्यासाठी अनेक घरांमध्ये मातीचा माठ वापरण्याची परंपरा आजही कायम आहे. माठातलं पाणी शरीराला थंडावा देतं आणि चवीलाही उत्तम लागतं. माठातल्या पाण्यांत नैसर्गिक थंडावा असल्याने ते पाणी बाधत नाही, त्यामुळे आपल्यापैकी बरेचजण उन्हाळ्यात मातीच्याच माठातलं पाणी पिणं पसंत करतात. उन्हाळ्याच्या दिवसांत फ्रीजच्या थंड पाण्यापेक्षा मातीच्या माठातील नैसर्गिकरीत्या गार झालेलं पाणी पिण्याची मजा काही वेगळीच असते. परंतु, आरोग्याच्या दृष्टीने माठाची निगा राखणं तितकंच महत्त्वाचं आहे. मात्र, अनेकदा आपण एकदा माठ भरल्यानंतर ते पाणी दिवसेंदिवस तसंच वापरत राहतो, ज्याकडे विशेष लक्ष दिलं जात नाही(how often to change matka water).

मातीच्या माठातलं पाणी  पिताना आपण एक चूक नेहमी करतो - ती म्हणजे माठात एकदा पाणी भरलं की ते संपेपर्यंत आपण माठ रिकामा करत नाही किंवा स्वच्छ धुवत नाही. अनेक दिवस माठात पाणी साचून राहिल्याने त्यात सूक्ष्म जीवजंतू किंवा शेवाळ तयार होण्याची शक्यता असते, जे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. मग, माठातलं पाणी नेमकं किती दिवसांनी (how many days water stays fresh in matka) बदलावं आणि माठ स्वच्छ करण्याची योग्य पद्धत काय? असा प्रश्न आपल्याला पडतो. त्यामुळे माठातलं पाणी किती दिवसांनी बदलावं आणि त्याची योग्य (how often should you change water in clay pot in summer) काळजी कशी घ्यावी, हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे.

मातीच्या माठातलं पाणी नेमकं किती दिवसांनी बदलावं ?

आरोग्याच्या दृष्टीने, मातीच्या माठातलं पाणी माठातलं पाणी १२ ते १८ तासांच्या अंतराने बदललं पाहिजे. जर माठ मोठा असेल आणि पाणी संपत नसेल, तरीही दिवसातून किमान एकदा माठ रिकामा करून, तो विसळून पुन्हा ताजे पाणी भरावे. मातीचा माठ सच्छिद्र असतो. जर पाणी दीर्घकाळ साचून राहिले, तर त्यात सूक्ष्म जीवजंतू वाढू शकतात किंवा पाण्याचा ताजेपणा कमी होऊन त्याचा स्वाद बिघडू शकतो. दररोज नवीन पाणी भरण्यापूर्वी माठ स्वच्छ पाण्याने विसळून घेणं गरजेचं आहे.

उन्हाळ्यात माठातलं पाणी नैसर्गिकरीत्या गार होतं आणि ते आरोग्यासाठी फ्रीजच्या पाण्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं असतं. मात्र, अनेक जण माठ पूर्ण संपेपर्यंत त्यातलं पाणी बदलत नाहीत. उन्हाळ्यात माठातलं पाणी नैसर्गिकरीत्या गार होतं आणि ते आरोग्यासाठी फ्रीजच्या पाण्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं असतं. मात्र, अनेक जण माठ पूर्ण संपेपर्यंत त्यातलं पाणी बदलत नाहीत. माठ सच्छिद्र असतो. जर पाणी जास्त काळ साचून राहिलं, तर माठाच्या आतल्या भागावर एक चिकट थर साचू लागतो, जो बॅक्टेरिया वाढण्यास कारणीभूत ठरतो.

माठातलं पाणी प्रत्येकवेळी आरोग्यासाठी अमृत नसतं! 'या' ८ लोकांनी चुकूनही पिऊ नये - मिळेल आजारांना निमंत्रण... 

वेणी घाला किंवा आंबाडा, केस दिसतील दाट - जाडजूड! लोखंडी कढईत केलेलं  'असं' लावा, केस होतील सुंदर...

मातीचे गुणधर्म पाण्यात उतरण्यासाठी पाणी ताजे असणे आवश्यक आहे. साठवून ठेवलेल्या  पाण्यामुळे माठाचा नैसर्गिक गोडवा कमी होऊ शकतो. नुसतं पाणी बदलणं पुरेसं नसतं, तर माठाची वेळोवेळी खोलवर स्वच्छता करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम, माठात उरलेलं सर्व जुनं पाणी फेकून द्या. कित्येक दिवस जुनं साठवून ठेवलेलं पाणी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

माठ रिकामा केल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. माठाच्या आतील भाग हाताने हळुवार घासून स्वच्छ करावा. जर माठाला थोडा दुर्गंध येत असेल किंवा तो जास्त अस्वच्छ झाला असेल, तर तुम्ही बेकिंग सोडा वापरून तो साफ करू शकता. यामुळे माठातील बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. स्वच्छ धुतल्यानंतर माठ काही वेळ तसाच उघडा किंवा उन्हात सुकण्यासाठी ठेवावा. यामुळे माठ पुन्हा वापरण्यासाठी पूर्णपणे निर्जंतुक होतो.

पाण्याच्या टाकीत 'या' झाडाची लहानशी फांदी घाला, दुर्गंधी येणार नाही-शेवाळं साचणार नाही...

माठात स्वच्छ पाणी भरल्यानंतर त्यावर मातीचेच झाकण घट्ट लावून ठेवावे. मातीच्या झाकणामुळे पाण्याचे तापमान नैसर्गिकरीत्या टिकून राहण्यास मदत होते. माठातून पाणी काढण्यासाठी कधीही त्यात थेट हात टाकू नका. पाणी काढण्यासाठी नेहमी लांब दांड्याच्या पळीचा वापर करावा. यामुळे हातावरील जंतू पाण्यात जात नाहीत आणि पाणी स्वच्छ राहते.

Web Title: how often to change matka water how often should you change water in clay pot in summer