Join us

नेहमीच्याच भाज्यांना येईल खमंग चमचमीतपणा.. 'हा' घरगुती मसाला घाला- लहान मुलंही आवडीने खातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2025 16:16 IST

How To Make Kitchen King Masala At Home: आपल्या रोजच्या भाज्यांची चव अधिक खुलविण्यासाठी हा घरगुती किचन किंग मसाला नक्कीच उपयोगी येऊ शकतो..(Homemade Kitchen King Masala Recipe)

ठळक मुद्देहा किचन किंग मसाला तुम्ही सगळ्या भाज्यांमध्ये घालू शकता. भाज्या नेहमीपेक्षा जास्त चवदार होतील. 

घरोघरी दिसणारं एक सामान्य चित्र म्हणजे घरातल्या सगळ्यांना आणि विशेषत: लहान मुलांना काहीतरी वेगळं, चमचमीत, चटपटीत खाण्याची इच्छा असते तर घरातल्या स्त्रियांना आपल्या घरातल्या लोकांनी काहीतरी पौष्टीक खावं असं वाटत असतं. घरातले सगळेच  त्याच त्या चवीची भाजी खाऊनही कंटाळलेले असतात. त्या चवीमध्ये त्यांना थोडा बदल हवा असतो. त्यासाठी मग भाज्यांमध्ये  वेगवेगळे मसाले टाकण्यात येतात (cooking tips for tasty food). पण असे विकतचे मसाले रोजच्या स्वयंपाकात वापरायला आरोग्याच्या दृष्टीने नको वाटतात (how to make vegetable more tasty). म्हणूनच आता हा एक हाेममेड किचन किंग मसाला करून पाहा (how to make kitchen king masala at home?) आणि भाज्यांमध्ये थोडा थोडा घाला (how to enhance the taste of food?).. बघा तुमच्या नेहमीच्याच भाज्या कशा जास्त चवदार होतील..(homemade kitchen king masala recipe) 

 

घरच्याघरी किचन किंग मसाला तयार करण्याची रेसिपी

अगदी बाजारात मिळतो त्याच चवीचा किचन किंग मसाला घरीच कसा तयार करायचा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ chefrohitchandra660 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

साहित्य

धने ३ चमचे 

भन्नाट देसी जुगाड- सुईमध्ये दोरा ओवण्याची सगळ्यात सोपी ट्रिक, एक टुथब्रश घ्या आणि......

जिरे १ चमचा 

शाही जिरा १ चमचा 

मेथी दाणे १ चमचा 

चणाडाळ ३ चमचे 

मोहरी २ चमचे 

दालचिनी ३ तुकडे

तेजपान २ 

काळी वेलची २ आणि हिरवी वेलची ५

 

दगडफूल १

कसुरी मेथी २ टी स्पून

भाजी करपली? टेन्शन घेऊ नका- 'हा' पदार्थ भाजीत घाला- करपट वास जाऊन होईल खाण्यायोग्य

मीठ १ टीस्पून

आमचूर पावडर १ टीस्पून

वाळलेल्या लाल मिरच्या ६

 

कृती 

घरच्याघरी किचन किंग मसाला तयार करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये कसूरी मेथी, आमचूर पावडर आणि लाल मिरच्या हे पदार्थ सोडून इतर सगळे मसाले घालून मंद आचेवर भाजून घ्या..

खूपच हडकुळे दिसता- काही केल्या वजन वाढेना? चमचाभर मेथ्या घेऊन 'हा' उपाय करा- तब्येत सुधारेल

मसाले भाजत असताना गॅस मोठा करू नये. कारण मसाले जळतात आणि त्यांचा स्वाद जातो.

भाजून घेतलेले मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला. त्याचवेळी त्यामध्ये मीठ, हळद, आमचूर पावडर, कसूरी मेथी, चाट मसाला घाला आणि सगळे मसाले अगदी बारीक वाटून घ्या.. तुम्ही मसाल्याची पावडर जेवढी जास्त बारीक कराल तेवढा मसाल्यांचा स्वाद जास्त खुलतो.

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सभाज्याआरोग्य