Join us
Daily Top 2Weekly Top 5

Holy 2026 : यंदा रंग खेळताना प्या ‘पान शॉट्स’! इतकं भन्नाट गारेगार ड्रिंक की पिऊन वाटेल गारेगार फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2026 18:30 IST

Holy 2026: Drink ‘Paan Shots’ while playing with colors this year! A drink so delicious that you will feel refresh : पान शॉट्स कधी प्यायले का? होळीसाठी खास रेसिपी.

उन्हाळ्याची चाहूल लागली की थंडगार, सुगंधी  खास पेयं करण्याची आणि पिण्याची इच्छा वाढतच जाते. त्यात होळी आली की थंडाई तर आपण पितोच. होळीच्या सणात गोडधोडासोबत काहीतरी वेगळं आणि हटके सर्व्ह करायचं असेल तर पान शॉट्स हा एक मजेशीर आणि पारंपरिक फ्लेवर असलेला पर्याय आहे. (Holy 2026: Drink ‘Paan Shots’ while playing with colors this year! A drink so delicious that you will feel refresh)रंगांच्या सणात गोडवा आणि ताजेपणा वाढवणारा हा छोटासा पण प्रभावी प्रकार अनेकांना आवडतो.

पान शॉट्समध्ये प्रामुख्याने विड्याचे पान, गुलकंद आणि बडीशेप यांचा वापर केला जातो. विड्याचे पान सुगंधी आणि ताजेतवाने करणारे असते. जेवणानंतर पान खाण्याची परंपरा केवळ चवीसाठी नसून पचनासाठीही फायदेशीर मानली जाते. विड्याच्या पानामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील विषारी घटक कमी करण्यास मदत करतात. तसेच ते तोंडाची दुर्गंधी कमी करुन तोंडाला फ्रेश ठेवतात. पाहा पान शॉट्स कसे तयार करावे. 

साहित्य विड्याचे पान, बडीशेप, वेलची पूड, गुलकंद, बदाम, काजू, दूध, आइस्क्रिम, साखर, बर्फ 

कृती१. विड्याची पाने स्वच्छ धुवायची. त्याची टोकं काढून टाकायची. नंतर कात्रीने पानाचे बारीक तुकडे करायचे. एका मिक्सरच्या भांड्यात ते तुकडे घ्यायचे. त्यात वेलची पूड घालायची. वेलचीचा वास फार सुंदर येतो आणि त्याची गोडसर चवही छान लागते. 

२. मिक्सरच्या भांड्यात दोन ते तीन चमचे गुलकंद घ्यायचा. चांगल्या दर्जाचाच वापरा त्याची चव छान लागते. त्यात काजू घालायचे. तसेच थोडे बदामही घालायचे. पेस्ट वाटून घ्यायची. मिक्सरमधून छान वाटून पेस्ट तयार करायची. थोडे पाणी घालून एकजीव पेस्ट तयार करायची. 

३. फ्रिजमध्ये ही पेस्ट आठवडाभर आरामात टिकते. जेव्हा पण पानशॉट्स प्यायची इच्छा असेल तेव्हा मिक्सरच्या भांड्यात थोडे दूध घ्यायचे. त्यात तयार केलेल्या मिश्रणाचे चार चमचे ओतायचे. नंतर बर्फ घालायचा आणि व्हॉनिला आयस्क्रिम घालायचे. थोडी साखर घालायची आणि मस्त वाटून घ्यायचे. छान गारेगार प्यायचे.   

English
हिंदी सारांश
Web Title : Holy 2026: Enjoy refreshing Paan Shots this Holi!

Web Summary : This Holi, ditch the usual Thandai for Paan Shots! A refreshing blend of betel leaves, gulkand, and fennel seeds, this drink offers a unique and flavorful experience. Easy to make at home, it's the perfect way to add a touch of tradition and coolness to your celebrations.
टॅग्स :होळी 2026अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सआहार योजनासमर स्पेशल