lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > होळी स्पेशल : मऊ-लुसलुशीत पुरणपोळ्या करण्याची सोपी ट्रिक, ना पुरण पातळ होणार ना पोळी फाटणार

होळी स्पेशल : मऊ-लुसलुशीत पुरणपोळ्या करण्याची सोपी ट्रिक, ना पुरण पातळ होणार ना पोळी फाटणार

Holi Special Puran Poli Recipe (Puranpoli Kashi kartat Dakhva) : पुरणपोळ्यांचे सारण बाहेर येऊ नये यासाठी डाळ शिजवण्यापासून पुरण वाटेपर्यंत अनेक गोष्टींची काळजीपूर्वक तयारी करावी लागते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 11:04 AM2024-03-24T11:04:26+5:302024-03-24T16:20:48+5:30

Holi Special Puran Poli Recipe (Puranpoli Kashi kartat Dakhva) : पुरणपोळ्यांचे सारण बाहेर येऊ नये यासाठी डाळ शिजवण्यापासून पुरण वाटेपर्यंत अनेक गोष्टींची काळजीपूर्वक तयारी करावी लागते.

Holi Special Puran Poli Recipe : How to Make perfect puranpoli at home | होळी स्पेशल : मऊ-लुसलुशीत पुरणपोळ्या करण्याची सोपी ट्रिक, ना पुरण पातळ होणार ना पोळी फाटणार

होळी स्पेशल : मऊ-लुसलुशीत पुरणपोळ्या करण्याची सोपी ट्रिक, ना पुरण पातळ होणार ना पोळी फाटणार

होळी  (Holi 2024) म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यांसमोर येतात ते म्हणजे पुरणपोळ्या. पुरणपोळ्या बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्याघरी बनवल्या तर त्याची चव दुप्पटीने वाढते. पुरणपोळी खायला जितकी रूचकर लागते तितकीच पोळी बनवायलाही तेव्हढीच मेहनत लागते. (Puran Poli Recipe) पुरणपोळ्या बनवण्याआधी काही खास ट्रिक्स फॉलो केल्या तर तुमचं काम अधिक सोपं होईल आणि पोळ्या अजिबात बिघडणार नाहीत. पुरणपोळ्या करण्याची साधी, सोपी रेसिपी पाहूया. (Holi Special Recipe) पुरणपोळ्यांचे सारण बाहेर येऊ नये यासाठी डाळ शिजवण्यापासून पुरण वाटेपर्यंत अनेक गोष्टींची काळजीपूर्वक तयारी करावी लागते. (How To Make Perfect Puran Poli at Home)

1) पुरणपोळी बनवताना डाळ कशी शिजवता हे महत्वाचे

पुरणपोळ्या करण्यासाठी चणाडाळ घेऊन ती थेट कुकरला लावतो पण त्याऐवजी २ तास आधी डाळ भिजवून घेतली तर चव अधिकच चांगली  लागते आणि पोळ्या परफेक्ट बनतात. तसंच डाळ शिजवताना त्यात खूपच जास्त पाणी देखील राहत नाही.  डाळ परफेक्ट शिजते आणि पाणीसुद्धा फेकून द्यावे लागत नाही. डाळ शिजवल्यानंतर पाणी  फेकून देण्यापेक्षा हे पाणी तुम्ही आमटीसाठी वापरू शकता.

2) डाळीत गुळ घालण्याचे योग्य प्रमाण

डाळीत योग्य प्रमाणात गुळ घालणं महत्वाचे असते. प्रमाणापेक्षा जास्त गुळ घातला तर पुरण कडक होतं किंवा खूपच पाातळ होते. जास्त काळ्या, जुन्या गुळाचा वापर करणं टाळा कारण तो लगेच वितळतो. चांगला गुळ किसून किंवा बारीक करून त्यात घाला म्हणजे पोळ्या चांगल्या होतील.

3) पुरण पातळ झाले तर काय करावे?

पुरण फारच पातळ झालं असेल तर एका सुती कापडात घेऊन व्यवस्थित दाबून घ्या म्हणजे त्यात पाणी राहणार नाही आणि पुरण कोरडे होईल.  किंवा कढईत घालून गरम केले तर पुरणाचा ओलसरपणा निघून जाईल. कढईत घालून पुरण गरम केल्याने त्याला चवही चांगली येते आणि कोरडेपणाही येतो.

4) डाळ शिजवताना हा पदार्थ घाला

पुरणाची डाळ शिजवताना त्यात चमचाभर तूप घालायला विसरू नका. ज्यामुळे डाळ लवकर शिजते आणि चिकटत नाही. तसंच गुळाबरोबर साखर घातल्याने पुरण चांगले होते.  पुरण सतत हलवत राहा म्हणजे खाली चिकटणार नाही आणि छान मोकळेसुद्धा होईल.

Web Title: Holi Special Puran Poli Recipe : How to Make perfect puranpoli at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.