lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > होळी स्पेशल थंडाई- शिल्पा शेट्टीची खास रेसिपी, गारेगार थंडाईशिवाय रंगांची मजा नाहीच...

होळी स्पेशल थंडाई- शिल्पा शेट्टीची खास रेसिपी, गारेगार थंडाईशिवाय रंगांची मजा नाहीच...

How To Make Holi Special Thandai: रंगांची उधळण मनसोक्तपणे केली, पण प्यायला गारेगार थंडाईच नसेल तर होळीची काय मजा... म्हणूनच शिल्पा शेट्टीने सांगितलेली ही खास रेसिपी एकदा पाहून घ्या.. (Holi Celebration 2024)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2024 11:09 AM2024-03-23T11:09:42+5:302024-03-23T11:10:29+5:30

How To Make Holi Special Thandai: रंगांची उधळण मनसोक्तपणे केली, पण प्यायला गारेगार थंडाईच नसेल तर होळीची काय मजा... म्हणूनच शिल्पा शेट्टीने सांगितलेली ही खास रेसिपी एकदा पाहून घ्या.. (Holi Celebration 2024)

Holi Celebration 2024, How to make holi special thandai, thandai recipe by actress Shilpa Shetty, easy and quick recipe of holi special thandai | होळी स्पेशल थंडाई- शिल्पा शेट्टीची खास रेसिपी, गारेगार थंडाईशिवाय रंगांची मजा नाहीच...

होळी स्पेशल थंडाई- शिल्पा शेट्टीची खास रेसिपी, गारेगार थंडाईशिवाय रंगांची मजा नाहीच...

Highlightsअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने सांगितलेली ही थंडाईची सोपी रेसिपी बघा आणि लगेचच घरी गारेगार थंडाई करून पाहा.

होळीचा सण आता अवघ्या एक- दोन दिवसांवर आला आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये आणि खास करून घराघरांतल्या बच्चे कंपनीमध्ये जबरदस्त उत्साह आहे. मोठी मंडळीही सर्व ताणतणाव विसरून मनसोक्त रंग खेळण्याच्या तयारीला लागलेले आहेत (Holi Celebration 2024). ही सगळी तयारी करून जर झाली असेल तर आता होळीच्या सणाचा आनंद वाढविणारी थंडाई कशी करायची, ते पाहून ठेवा (How to make holi special thandai).. कारण होळीच्या रंगांची परिपुर्णता थंडाई प्यायल्याशिवाय काही होत नाही (easy and quick recipe of holi special thandai). म्हणूनच अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने सांगितलेली ही थंडाईची सोपी रेसिपी बघा आणि लगेचच घरी गारेगार थंडाई करून पाहा. (thandai recipe by actress Shilpa Shetty)

होळी स्पेशल थंडाई करण्याची रेसिपी

 

साहित्य

६ ते ८ काजू

८ ते १० बदाम

१ टेबलस्पून खसखस

लिंबू जास्त दिवस टिकविण्याचा सोपा उपाय, ३- ४ महिने लिंबू राहतील फ्रेश- रसरशीत

१ टेबलस्पून टरबूज बिया

२ टीस्पून बडिशेप

४ ते ५ काळी मिरी

 

अर्धा टीस्पून जायफळ पावडर

अर्धा टीस्पून वेलची पावडर

Holi 2024: रंगांमुळे त्वचा खराब होण्याची भीती वाटते? फक्त ३ गाेष्टी करा- मनसोक्त होळी खेळा

९ ते १० पिस्ते

गुलाबाच्या ८ ते १० पाकळ्या

२ ग्लास दूध 

८ ते १० केशराच्या काड्या

४ टेबलस्पून साखर

 

कृती

सगळ्यात आधी दूध गरम करायला ठेवा.

त्यानंतर एका वाटीत थोडंसं दूध घेऊन त्यात केशराच्या काड्या भिजत ठेवा.

उद्योगपती श्रीधर वेंबू म्हणतात- परीक्षेचा दबाव विद्यार्थ्यांच्या क्षमता, गुणवत्ता नष्ट करतोय, म्हणूनच आपण....

त्यानंतर साखर आणि केशर सोडून वर दिलेले इतर सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची बारीक पावडर करून घ्या. हा झाला थंडाईचा मसाला.

आता दूध जेव्हा उकळायला लागेल तेव्हा त्यामध्ये सगळ्यात आधी भिजवलेलं केशर टाका. यानंतर आपण तयार केलेला थंडाई मसाला टाका. साधारण अर्धा लीटर दूध असेल तर त्यासाठी २ टेबलस्पून थंडाई मसाला टाकावा. 

यानंतर साखर टाका आणि मंद आचेवर दूध आणखी काही मिनिटे तापवून घ्या. दूध थोडं आळून आलं की गॅस बंद करा.

यानंतर ही थंडाई रुम टेम्परेचरवर आली की फ्रिजमध्ये ठेवून द्या आणि थंड झाल्यानंतर तिचा छान आस्वाद घ्या. 

 

Web Title: Holi Celebration 2024, How to make holi special thandai, thandai recipe by actress Shilpa Shetty, easy and quick recipe of holi special thandai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.