lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Parenting > उद्योगपती श्रीधर वेंबू म्हणतात- परीक्षेचा दबाव विद्यार्थ्यांच्या क्षमता, गुणवत्ता नष्ट करतोय, म्हणूनच आपण....

उद्योगपती श्रीधर वेंबू म्हणतात- परीक्षेचा दबाव विद्यार्थ्यांच्या क्षमता, गुणवत्ता नष्ट करतोय, म्हणूनच आपण....

Exam Pressure: सध्या परीक्षेचा ताण घेतलेले पालक आणि विद्यार्थी काही अपवाद सोडले तर प्रत्येक घरातच दिसत आहेत.. म्हणूनच एकदा उद्याेजक श्रीधर वेंबू यांचं म्हणणं जाणून घ्यायला पाहिजे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2024 09:09 AM2024-03-23T09:09:06+5:302024-03-23T09:10:02+5:30

Exam Pressure: सध्या परीक्षेचा ताण घेतलेले पालक आणि विद्यार्थी काही अपवाद सोडले तर प्रत्येक घरातच दिसत आहेत.. म्हणूनच एकदा उद्याेजक श्रीधर वेंबू यांचं म्हणणं जाणून घ्यायला पाहिजे.

Sridhar Vembu says ultra competitive pressure on children destroys talent in students | उद्योगपती श्रीधर वेंबू म्हणतात- परीक्षेचा दबाव विद्यार्थ्यांच्या क्षमता, गुणवत्ता नष्ट करतोय, म्हणूनच आपण....

उद्योगपती श्रीधर वेंबू म्हणतात- परीक्षेचा दबाव विद्यार्थ्यांच्या क्षमता, गुणवत्ता नष्ट करतोय, म्हणूनच आपण....

Highlightsशिक्षणाच्या बाबतीत त्यांनी फिनलँड या देशाचे, त्या देशातील शिक्षण पद्धतीचेही खूप कौतूक केले आहे.

मार्च महिन्याचा हा काळ म्हणजे परीक्षेचा काळ असतो. ही परीक्षा फक्त विद्यार्थ्यांचीच नसते तर त्यांच्या पालकांची आणि घरातल्या सगळ्याच मंडळींची असते. म्हणजे खरोखरच हा सगळ्यांच्या परीक्षेचा काळ असतो, असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. खरं पाहायला गेलं तर मुलांना परीक्षेचा ताण असतो की त्या परीक्षेमुळे पालक त्यांच्यावर जो दबाव टाकतात, त्या दबावाचा ताण असतो, हे एकदा पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे. हा ताण नेमका विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या गुणवत्तांना कुठे घेऊन जात आहे, याविषयी उद्योजक श्रीधर वेंबू यांनी व्यक्त केलेलं मत विद्यार्थ्यांना, पालकांना विचार करायला लावणारं आहे. 

 

उद्योजक श्रीधर वेंबू यांची याविषयीची एक पोस्ट सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत आहे. सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये एका क्लासची एक जाहिरात आहे.

लिंबू जास्त दिवस टिकविण्याचा सोपा उपाय, ३- ४ महिने लिंबू राहतील फ्रेश- रसरशीत

त्या जाहिरातीमध्ये असं सांगितलं आहे की अमूक एका मुलीने तो क्लास सोडला आणि ती दुसऱ्या क्लासमध्ये गेली म्हणून तिचा JEE परीक्षेतला स्कोअर कसा कमी झाला. अशी निगेटिव्ह जाहिरात करून त्या विद्यार्थिनीच्या आत्श्वविश्वासाचं खच्चीकरण करणाऱ्या जाहिरातीवर वेंबू यांनी टिका केली असून ही रॅट रेस विद्यार्थ्यांची गुणवत्ता, त्यांच्यामधील इतर क्षमता नामशेष करणारी आहे, असं ते म्हणाले. 

 

या जीवघेण्या स्पर्धांमधून भारताने बाहेर पडायला पाहिजे. स्पर्धा ही विद्यार्थ्यांना नोकरी देणाऱ्या कंपन्यांमध्ये असावी. शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांसाठी नाही.

Holi 2024: रंगांमुळे त्वचा खराब होण्याची भीती वाटते? फक्त ३ गाेष्टी करा- मनसोक्त होळी खेळा

शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी फिनलँड या देशाचे, त्या देशातील शिक्षण पद्धतीचेही खूप कौतूक केले आहे. एम्प्लॉयर असणाऱ्या प्रत्येकाने तरुणांना नाेकरी देताना केवळ त्यांची शैक्षणिक गुणवत्ता पाहू नये, तर शिक्षणाव्यतिरिक्त त्यांनी मिळवलेल्या इतर कौशल्यांचाही विचार करावा, जेणेकरून ही स्पर्धा कुठेतरी कमी होऊ शकेल, असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. 

 

Web Title: Sridhar Vembu says ultra competitive pressure on children destroys talent in students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.