Lokmat Sakhi >Food > पालकाच्या भाजीमध्ये 'हा' पदार्थ मुळीच घालू नका! किडनीस्टोन असणाऱ्यांनी तर हमखास टाळावाच..

पालकाच्या भाजीमध्ये 'हा' पदार्थ मुळीच घालू नका! किडनीस्टोन असणाऱ्यांनी तर हमखास टाळावाच..

Healthy Method Of Eating Spinach: पालकाची भाजी करताना आणि खातानाही ही गोष्ट लक्षात ठेवाच..(how to make spinach sabji more healthy and nutritious?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2025 17:00 IST2025-06-25T16:58:46+5:302025-06-25T17:00:43+5:30

Healthy Method Of Eating Spinach: पालकाची भाजी करताना आणि खातानाही ही गोष्ट लक्षात ठेवाच..(how to make spinach sabji more healthy and nutritious?)

healthy method of eating spinach, how to make spinach sabji more healthy and nutritious  | पालकाच्या भाजीमध्ये 'हा' पदार्थ मुळीच घालू नका! किडनीस्टोन असणाऱ्यांनी तर हमखास टाळावाच..

पालकाच्या भाजीमध्ये 'हा' पदार्थ मुळीच घालू नका! किडनीस्टोन असणाऱ्यांनी तर हमखास टाळावाच..

Highlightsशरीरातलं वाढलेलं ऑक्झालेट पालकामधल्या कॅल्शियमला बांधून ठेवतं. त्यामुळे कॅल्शियम रक्तात मिसळत नाही.

पालकाची भाजी ही तशी अनेकांच्या आवडीची. नेहमीप्रमाणे फोडणी घालून, डाळीचं पीठ लावून न करता जर थोड्या वेगळ्या पद्धतीने पालकांची भाजी केली तर लहान मुलंही ती आवडीने खातात. त्यात पालक पनीर जर तुम्ही केलं तर मग मात्र ते घरातले सगळेच आवडीने खातात. पालकाच्या भाजीप्रमाणेच पालकाचं सूप, पालक पुऱ्या, पालकाचे पराठे असे कित्येक वेगवेगळे पदार्थ केले जातात. पालकामध्ये लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे ती भाजी आठवड्यातून एकदा तरी आपल्या आहारात असायलाच हवी (healthy method of eating spinach). पण ती भाजी करताना जर तुम्ही नेमकी एक चूक केली तर मात्र पालकाची भाजी खाऊन पोषण मिळण्याऐवजी तब्येतीला नुकसानच जास्त होऊ शकतं.(how to make spinach sabji more healthy and nutritious?)


 
पालकाच्या भाजीमध्ये कोणता पदार्थ घालू नये?

पालकाची भाजी किंवा सूप करताना अनेक जण त्यामध्ये टोमॅटो घालतात. पालक पनीर करताना तर मुख्य ग्रेव्ही कांदा आणि टोमॅटोचीच केली जाते. पण असं करणं आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतं.

चिकट, ड्राय झालेले केस महिनाभरात होतील सिल्की, मऊ! हेल्दी केसांसाठी सोपा घरगुती उपाय

विशेषत: किडनीस्टोनचा त्रास असणाऱ्यांनी जर टोमॅटो घातलेली पालकाची भाजी खाल्ली तर त्यांचा आजार आणखी जास्त वाढू शकतो, अशी माहिती आहारतज्ज्ञ रिता जैन यांनी सांगितली आहे. पालकामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम आणि ऑक्झालेट (oxalates) असतं. टोमॅटोमध्येही ऑक्झालेट जास्त प्रमाणात असतं. जेव्हा आपण पालक आणि टोमॅटो एकत्र करून खातो तेव्हा शरीरात खूप जास्त ऑक्झालेट होतं.

 

शरीरातलं वाढलेलं ऑक्झालेट पालकामधल्या कॅल्शियमला बांधून ठेवतं. त्यामुळे कॅल्शियम रक्तात मिसळत नाही आणि पालकाची पुरेशी भाजी खाऊनही शरीरातली कॅल्शियमची कमतरता दूर होत नाही.

भारताच्या 'या' शहरात राहतात सगळ्यात जास्त लठ्ठ लोक! बघा तुम्ही तर त्या शहरात नाही ना?

शिवाय ऑक्झालेट जेव्हा शरीरात जास्त प्रमाणात येतं तेव्हा त्याचे ऑक्झॅलिक क्रिस्टल्सही तयार होऊ शकतात. तेच क्रिस्टल किडनीस्टोनसाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळेच पालक आणि टोमॅटो हे मिश्रण टाळा असं आहारतज्ज्ञांचं म्हणणं आहे. 


 

Web Title: healthy method of eating spinach, how to make spinach sabji more healthy and nutritious 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.