lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > गुरूपौर्णिमा स्पेशल : नैवैद्यासाठी करा रव्याचा ‘खास’ शिरा; झटपट आणि खमंग रेसिपी

गुरूपौर्णिमा स्पेशल : नैवैद्यासाठी करा रव्याचा ‘खास’ शिरा; झटपट आणि खमंग रेसिपी

Happy Guru Purnima 2023 : शिऱ्यासाठी तुम्ही कोणत्या रव्याची निवड करता हे फार महत्वाचं आहे. जाड किंवा बारीक कोणत्याही रव्याचा वापर तुमच्या आवडीनुसार करू शकता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 12:25 PM2023-07-03T12:25:33+5:302023-07-03T13:10:31+5:30

Happy Guru Purnima 2023 : शिऱ्यासाठी तुम्ही कोणत्या रव्याची निवड करता हे फार महत्वाचं आहे. जाड किंवा बारीक कोणत्याही रव्याचा वापर तुमच्या आवडीनुसार करू शकता. 

Happy Guru Purnima 2023 : Guru Purnima Naivedya Special Ravyacha Sheera Prasadacha Recipe | गुरूपौर्णिमा स्पेशल : नैवैद्यासाठी करा रव्याचा ‘खास’ शिरा; झटपट आणि खमंग रेसिपी

गुरूपौर्णिमा स्पेशल : नैवैद्यासाठी करा रव्याचा ‘खास’ शिरा; झटपट आणि खमंग रेसिपी

आषाढ महिन्याची पौर्णिमा म्हणजेच गुरूपौर्णिमेचे ( Guru Purnima 2023) महत्व अनन्यसाधारण आहे. मोठ्या उत्साहात हा सण प्रत्येकजण साजरा करतो.  या दिवशी गुरूचे, शिक्षकांचे केले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा करून त्यांना वंदन करतात. गुरूपौर्णिमेच्या दिवशी अनेक घरांमध्ये नैवेद्य दाखवला जातो. (Gurupornima Special)  पण नैवेद्य घरी तयार करण्यासाठी प्रत्येकालाच वेळ मिळतो असं नाही. (Guru Purnima Naivedya Special)

कमीत कमी वेळात नैवेद्यासाठी कोणता पदार्थ बनवता येईल ते पाहूया. नैवेद्यासाठी रव्याचा शीरा, खीर बनवू शकता जेणेकरून कमीत कमी वेळात उत्तम नैवेदय  तयार होईल.(Guru Purnima Naivedya Special Ravyacha Sheera Prasadacha Recipe)  शिरा उत्तम होण्यासाठी रवा व्यवस्थित भाजलं जाणं गरजेचं असतं. शिऱ्यासाठी तुम्ही कोणत्या रव्याची निवड करता हे फार महत्वाचं आहे. जाड किंवा बारीक कोणत्याही रव्याचा वापर तुमच्या आवडीनुसार करू शकता. 

नैवेद्याचा शिरा बनवण्याचे साहित्य

रवा-  १ वाटी

तूप - २ वाटी

काजूचे काप- ८ ते ९

बदामाचे काप-  ८ ते ९

पिस्त्याचे काप- ८ ते ९

मनूके - ७ ते ८

पाणी- एक ग्लास

साखर - १ ते दीड कप

केशर- आवडीनुसार

1) रव्याचा शीरा बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका कढईत साजूक तूप गरम करायला ठेवा. त्यात ड्रायफ्रुट्सचे बारीक काप घालून ते तळून घ्या.  

2) काजू, पिस्ता, बदाम, मनूके तुम्ही यात घालू शकता. लालसर तळल्यानंतर ते  बाहेर काढा. त्यात कढईत पुन्हा थोडं तूप घालून त्यात बारीक रवा भाजून घ्या.

३) रवा गोल्डन भाजून  घाल्यानंतर त्यात गरजेनुसार गरम पाणी घालून ढवळून घ्या. ५ मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजू द्या.

४)  झाकण काढून त्यात  कपभर साखर घालून मिश्रण एकजीव करा. नंतर त्यात दूधात मिसळलेले केशर आणि ड्रायफ्रुट्स घालून एकजीव करून घ्या. तयार आहे गरमागरम प्रसादाचा शिरा.

५) त्यात तुम्ही वरून तुळशीचं पान ठेवू शकता किंवा पिस्त्याचे काप घालू शकता. 

Web Title: Happy Guru Purnima 2023 : Guru Purnima Naivedya Special Ravyacha Sheera Prasadacha Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.