Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > स्वयंपाकाचा कंटाळा आला? रात्रीसाठी करा अस्सल गुजराथी चवीची 'फाडा नी खिचडी', सोपी पौष्टिक रेसिपी 

स्वयंपाकाचा कंटाळा आला? रात्रीसाठी करा अस्सल गुजराथी चवीची 'फाडा नी खिचडी', सोपी पौष्टिक रेसिपी 

Gujarathi Recipe of Fada ni Khichadi: फाडा नी खिचडी हा एक प्रसिद्ध गुजराथी पदार्थ असून तो रात्रीच्या जेवणासाठी अतिशय उत्तम मेन्यू होऊ शकतो...(how to make fada ni khichadi?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2026 13:08 IST2026-03-18T12:13:06+5:302026-03-18T13:08:29+5:30

Gujarathi Recipe of Fada ni Khichadi: फाडा नी खिचडी हा एक प्रसिद्ध गुजराथी पदार्थ असून तो रात्रीच्या जेवणासाठी अतिशय उत्तम मेन्यू होऊ शकतो...(how to make fada ni khichadi?)

gujarathi recipe of fada ni khichadi, how to make fada ni khichadi, moong dal khichadi recipe, daliya khichadi recipe  | स्वयंपाकाचा कंटाळा आला? रात्रीसाठी करा अस्सल गुजराथी चवीची 'फाडा नी खिचडी', सोपी पौष्टिक रेसिपी 

स्वयंपाकाचा कंटाळा आला? रात्रीसाठी करा अस्सल गुजराथी चवीची 'फाडा नी खिचडी', सोपी पौष्टिक रेसिपी 

Highlights शुगर असणाऱ्या आणि वेटलॉस करणाऱ्या लोकांसाठी ती एक उत्तम पर्याय आहे.

बऱ्याचदा असं होतं की दिवसभराची कामं करून आपण खूप थकलेलो असतो. त्यामुळे मग रात्री स्वयंपाक करण्याचा खूप कंटाळा येतो. असं काहीतरी हवं असतं जे अगदी झटपट होईल आणि त्यासाठी खूप वेळ स्वयंपाक घरात काम करत बसण्याची गरज नाही. शिवाय आता तर उन्हाळ्यामुळे रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकंफुलकं असलं तर जास्त बरं वाटतं... म्हणून आता ही गुजराथी चवीची फाडा नी खिचडी एकदा ट्राय करून पाहा (Gujarathi Recipe of Fada ni Khichadi). आपली डाळ तांदळाची खिचडी तर आपण नेहमीच करतो. आता ही एक वेगळी खिचडी रेसिपी घ्या. या खिचडीमध्ये तांदळाच्या ऐवजी दलिया वापरला जातो (daliya khichadi recipe). त्यामुळे शुगर असणाऱ्या आणि वेटलॉस करणाऱ्या लोकांसाठी ती एक उत्तम पर्याय आहे.

गुजराथी पद्धतीची फाडा नी खिचडी कशी करायची 

 

साहित्य

२ वाट्या दलिया

१ वाटी मुगाची डाळ

गाजर, बटाटा, टोमॅटो, कांदा, मटार अशा कोणत्याही आवडीच्या भाज्या २ कप

उन्हात फिरून चेहरा काळा पडला? घरीच फक्त २० रुपयांत करा हायड्रा फेशियल, त्वचा चमकेल

फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, हिंग, लसूण पेस्ट आणि वाळलेल्या लाल मिरच्या

चवीनुसार मीठ 

कृती 

फाडा नी खिचडी करण्यासाठी सगळ्यात आधी तर मुगाची डाळ आणि दलिया चांगलं धुवून घ्या. 

 

गॅसवर कुकर गरम करायला ठेवा. आणि त्यात तेल किंवा तूप घालून फोडणी करून घ्या. लसूण पेस्ट परतून घ्या. 

यानंतर त्यामध्ये धुतलेली मुगाची डाळ आणि दलिया घाला. तेलामध्ये दलिया आणि मुगाची डाळ एकदा परतून घ्या.

मुलींना लवकर पाळी येण्याची ५ कारणं- 'या' गोष्टींपासून मुलींना दूर ठेवा, डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या, चवीनुसार मीठ आणि पाणी घाला. दलिया मुगाची डाळ मिळून ३ वाट्या असतील तर त्याच्या दुप्पट म्हणजे ६ वाट्या पाणी घाला. कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर ३ ते ४ शिट्ट्या झाल्या की फाडा नी खिचडी झाली तयार.. ही रेसिपी स्मिता देव यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. 


 

Web Title : आसान गुजराती फाड़ा खिचड़ी रेसिपी: एक त्वरित, स्वस्थ रात्रिभोज विकल्प

Web Summary : खाना पकाने से थक गए हैं? गुजराती फाड़ा खिचड़ी आजमाएं! यह त्वरित, स्वस्थ रेसिपी चावल की जगह दलिया का उपयोग करती है, जो इसे वजन घटाने और मधुमेह रोगियों के लिए एकदम सही बनाती है। बस मसाले भूनें, दलिया, मूंग दाल, सब्जियां, पानी डालें और प्रेशर कुक करें। मिनटों में तैयार!

Web Title : Easy Gujarati Fada Khichdi Recipe: A Quick, Healthy Dinner Option

Web Summary : Tired of cooking? Try Gujarati Fada Khichdi! This quick, healthy recipe uses daliya instead of rice, making it perfect for weight loss and diabetics. Simply sauté spices, add dalia, moong dal, vegetables, water, and pressure cook. Ready in minutes!