lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > केळी खूप पिकली, फेकून देताय? थांबा, करा पिकलेल्या केळीचा पौष्टिक बनाना पराठा !

केळी खूप पिकली, फेकून देताय? थांबा, करा पिकलेल्या केळीचा पौष्टिक बनाना पराठा !

How to make banana paratha : केळी (banana) म्हणजे सर्वसामान्यांचं सुपर फुड. हे सूपर फूड अति पिकलं किंवा डागाळलं म्हणून फेकून देऊ नका. त्याचा असा मस्त उपयोग करा आणि गरमागरम, खमंग बनाना पराठे (paratha recipe) करा. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 01:11 PM2021-12-03T13:11:33+5:302021-12-03T13:18:11+5:30

How to make banana paratha : केळी (banana) म्हणजे सर्वसामान्यांचं सुपर फुड. हे सूपर फूड अति पिकलं किंवा डागाळलं म्हणून फेकून देऊ नका. त्याचा असा मस्त उपयोग करा आणि गरमागरम, खमंग बनाना पराठे (paratha recipe) करा. 

Food, Recipe : How to make healthy and tasty banana paratha  | केळी खूप पिकली, फेकून देताय? थांबा, करा पिकलेल्या केळीचा पौष्टिक बनाना पराठा !

केळी खूप पिकली, फेकून देताय? थांबा, करा पिकलेल्या केळीचा पौष्टिक बनाना पराठा !

Highlightsबनाना पराठा हा पदार्थ नाश्त्यासाठी उत्तम आहे. रात्रीही जर तुम्हाला वन डिश मिल खायचे असेल, भूक कमी असेल तर तुम्ही बनाना पराठ्याचा आस्वाद घेऊ शकता.

केळी जेव्हा खूप जास्त पिकते तेव्हा सर्दीचा त्रास होईल म्हणून केळी खाणं आपण टाळतो. ते बरोबरही आहे. म्हणूनच तर ही केळी तशीच न खाता त्यापासून बनाना पराठा किंवा केळीची दशमी हा एक चवदार पदार्थ करा. बनाना पराठा करताना अति पिकलेलं केळ तसंच्या तसं आपल्या पोटात जात नाही. ते भाजल्या जातं, त्यावर काही प्रक्रिया होते. त्यामुळे ते आपल्याला बाधत नाही. सर्दी, खाेकला असा काही त्रास त्यामुळे होत नाही. शिवाय पिकलेली केळीही उपयोगात येते आणि पैशाची व अन्नाची अशी दोघांचीही बचत होते. 

 

कधी कधी असंही होतं की घरात आणलेली सगळी केळी एकदमच पिकून जातात. मग अशा वेळी एकदम ती खाल्ल्या जात नाहीत आणि मग वाया जातात. केळी वाया गेली म्हणून वाईटही वाटतं. असं टाळण्यासाठी खूप पिकलेल्या केळीचा असा झकास उपयोग तुम्ही नक्कीच करू शकता. बनाना पराठा हा पदार्थ नाश्त्यासाठी (breakfast dish) उत्तम आहे. रात्रीही (dinner) जर तुम्हाला वन डिश मिल (one dish meal) खायचे असेल, भूक कमी असेल तर तुम्ही बनाना पराठ्याचा आस्वाद घेऊ शकता. हा पराठा बटर, सॉस, एखादी चटणी, लोणचे किंवा कांद्या- टोमॅटोची भाजी अशा कशा सोबतही खाता येतो. मुलांनाही डब्यात देण्यासाठी हा एक चांगला पदार्थ आहे. चवबदल म्हणून एकदा करून बघा... 

 

बनाना पराठा करण्यासाठी लागणारे साहित्य
Ingredients for banana paratha 

सात ते आठ दशम्या बनविण्यासाठी दोन पिकलेली केळी. कणिक (wheat aata), एक टेबलस्पून मध, १ टेबलस्पून किसलेला गूळ, चवीपुरती १ टीस्पून विलायची पावडर आणि दालचिनी पावडर, चवीनुसार मीठ, बटर किंवा तूप. 

कसा करायचा बनाना पराठा?
How to make banana paratha
 
- बनाना पराठा करण्यासाठी सगळ्यात आधी केळीची सालं काढून ती कुस्करून घ्या. यामध्ये कणिक, मध, गुळ, दालचिनी, विलायची, चवीनुसार मीठ असं सगळं साहित्य टाका.
- केळीतच पीठ भिजले गेले पाहिजे. या हिशोबानेच कणिक घ्या. पाणी टाकू नका. केळी कमी पडली तर पाण्याऐवजी थोडेसे दुध टाका. पण शक्यतो केळीतच पीठ भिजवले जाईल, असे करा. 


- तेल लावून पीठ सारखे करून घ्या.
- यानंतर पीठाचे पराठा बनविण्यासाठी लहान लहान गोळे करा.
- आता पोळी लाटतो त्याप्रमाणे घडी घालून पराठा लाटा किंवा मग सरळ सरळ गोल पराठा लाटा.
- पराठा झाल्यानंतर तव्यावर टाका आणि तूप लावून खमंग भाजा.
- केळीचा गरमागरम, खमंग बनाना पराठा झाला तयार. 

 

Web Title: Food, Recipe : How to make healthy and tasty banana paratha 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.