lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > पांढरं, पिवळं आणि हिरवं तिखट पाहिलंय कधी? बघा कसं करतात ते..

पांढरं, पिवळं आणि हिरवं तिखट पाहिलंय कधी? बघा कसं करतात ते..

Food And Recipe: उन्हाळा सरत आला आहे, त्यामुळे घरोघरी तिखट आणि करणं सुरु झालं असणार. यावर्षी त्यात हा आणखी एक प्रयोग करून बघा.. पांढरं, पिवळं आणि हिरवं तिखट करण्याचा..(tikhat recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 04:18 PM2022-05-30T16:18:25+5:302022-05-30T16:19:14+5:30

Food And Recipe: उन्हाळा सरत आला आहे, त्यामुळे घरोघरी तिखट आणि करणं सुरु झालं असणार. यावर्षी त्यात हा आणखी एक प्रयोग करून बघा.. पांढरं, पिवळं आणि हिरवं तिखट करण्याचा..(tikhat recipe)

Ever seen white, yellow and green chili powder? How to make white, yellow and green chili powder? 3 types of chili powder | पांढरं, पिवळं आणि हिरवं तिखट पाहिलंय कधी? बघा कसं करतात ते..

पांढरं, पिवळं आणि हिरवं तिखट पाहिलंय कधी? बघा कसं करतात ते..

Highlightsपिवळं, पांढरं आणि हिरवं तिखट, हा तिखटाचा नेमका प्रकार कोणता आणि तो कसा करायचा, याविषयीची ही माहिती आणि खास रेसिपी..

चवीला झणझणीत आणि दिसायला लालबुंद असणारं तिखट आपल्या नेहमीच्या पाहण्यातलं.. काळा मसाला, गोड मसाला हे देखील आपल्या ओळखीचे. ठेचा हा हिरव्या तिखटाचा प्रकारही आपल्याला माहिती असतो... पण जुन्या काळी लाल तिखटाप्रमाणेच हिरवं तिखट  (green chili powder)आणि पांढरं तिखटही (white chili powder) केलं जायचं.. तसंच आता काही ठिकाणी पिवळं तिखटही (yellow chili powder) केलं जातं.. आता पिवळं, पांढरं आणि हिरवं तिखट, हा तिखटाचा नेमका प्रकार कोणता आणि तो कसा करायचा, याविषयीची ही माहिती आणि खास रेसिपी..

 

पालक पनीर, सरसोंका साग अशा हिरव्या भाज्या आपण करतो. लाल तिखट टाकून या भाज्यांचा हिरवागार रंग बिघडू नये म्हणून त्यांच्यासाठी हिरवं तिखट वापरतात. साबुदाण्याच्या पापड्या करताना त्यांचा मुळचा पांढरा रंग लाल किंवा हिरव्या तिखटामुळे बिघडू नये, म्हणून त्यासाठी जुन्या काळी खास पांढरं तिखट वापरलं जायचं.. आणि पिवळं तिखट हा अगदी अलिकडचा प्रकार आहे.. हे तिन्ही तिखट लाल तिखटाप्रमाणचे वर्षभर टिकणारे असतात बरं का. बघा या तिन्ही प्रकारचे तिखट करण्याची ही खास रेसिपी... अगदी सोपी.

 

१. हिरवं तिखट रेसिपी
हिरवं तिखट करण्यासाठी आपल्या ज्या हिरव्यागार लवंगी मिरच्या असतात त्या उन्हात वाळवायला ठेवा. २ दिवस थेट उन्हात वाळू द्या. त्यानंतर त्यांच्यावर आणखी एक कपडा टाका आणि तशा परिस्थितीत त्या आणखी २- ३ दिवस उन्हात वाळू द्या. त्यांच्यावर कपडा टाकल्याने त्यांचा मुळ हिरवागार रंग उडणार नाही. ४ ते ५ दिवसांत या मिरच्या पुर्णपणे कोरड्या झाल्या की त्या मिक्सरमधून फिरवा आणि त्याची पावडर तयार करा. हिरवं तिखट झालं तयार. एअर टाईट बरणीत हे तिखट वर्षभर टिकतं.

 

२. पांढरं तिखट
पांढरं तिखट करण्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्यांचा वापर करायचा आहे. त्यासाठी एका पातेल्यात पाणी उकळत ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यात हिरव्या मिरच्या टाका आणि २ ते ३ मिनिटे उकळून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा. मिरच्या पाण्यातून निथळून घ्या आणि त्या कडक उन्हात ३ ते ४ दिवस वाळू द्या. पाण्यात उकळून घेतल्याने आणि कडक उन्हात वाळू दिल्याने मिरच्यांचा रंग आपोआप उडतो. मिरच्या वाळल्या की मिक्सरला फिरवून त्याची पावडर करून घ्या. हे झालं पांढरं तिखट तयार.

 

३. पिवळं तिखट 
पिवळं तिखट तयार करण्यासाठी पिवळ्या सिमला मिरचीचा वापर करावा. पिवळ्या सिमला मिरचीचे तुकडे करून ते उन्हात वाळू द्या. कडक वाळले की ते मिक्सरमधून फिरवून घ्या. अशा पद्धतीने केलेले पिवळे, हिरवे आणि पांढरे तिखट तुम्ही ३ वाट्यांमध्ये भरून जवळ जवळ ठेवले की आपोआपच त्यांच्या रंगातला वेगळेपणा लगेचच लक्षात येतो. 

 

Web Title: Ever seen white, yellow and green chili powder? How to make white, yellow and green chili powder? 3 types of chili powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.