Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात चिबूड खा पोटभर-तब्येतीसाठी वर्षभराचं टॉनिक-वजनही हाेईल कमी! ग्लॅमर नसलेलं पौष्टिक फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2026 15:44 IST

Eat mesh melon in summer, you will also lose weight! A nutritious fruit : चिबूड म्हणजे चविष्ट आणि पौष्टिक फळ, आहारात नक्कीच असावे.

उन्हाळा सुरू झाला की शरीराला थंडावा देणारे, पचायला हलके आणि पाण्याने समृद्ध पदार्थ खाण्याकडे आपोआप कल वाढतो. शरीराला नेहमीपेक्षा जास्त पाण्याची गरज असते. विविध फळांमधून गरजेचे पोषण आणि पाणी मिळते.  (Eat mesh melon in summer, you will also lose weight! A nutritious fruit )कलिंगड तर आपण खातोच साखर आणि पाण्याने भरलेल्या अशाच फळांपैकी एक म्हणजे चिबूड (खरबूज). रसाळ, गोड आणि मस्त गोड चव असलेलं चिबूड हे केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे.

चिबूडामध्ये सुमारे ८५–९० टक्के पाणी असतं, त्यामुळे ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं. उन्हाळ्यात घामामुळे शरीराला पाण्याची कमतरता जाणवते. शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळण गरजेचं असते. ही पाण्याची कमतरता भरुन काढण्यासाठी चिबूड खूप उपयुक्त ठरतं. त्यामुळे उष्माघात (heatstroke) टाळण्यासाठीही हे फळ फायदेशीर आहे.

चिबूडामध्ये व्हिटामिन ए आणि सी मुबलक प्रमाणात आढळतात. व्हिटामिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं, तर व्हिटामिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं. त्यामुळे नियमित चिबूड खाल्ल्यास शरीराची इम्युनिटी सुधारते आणि संसर्गापासून संरक्षण मिळतं. हे फळ आरोग्यासाठी चांगलं असतंच शिवाय चवही मस्त असल्याने मुलंही आवडीने खातात. याशिवाय, चिबूडामध्ये फायबर (तंतुमय पदार्थ)ही चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता कमी होते आणि पोट हलकं राहायला मदत होते. जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी चिबूड हा उत्तम पर्याय आहे कारण त्यात कॅलरीज कमी आणि पाणी जास्त असतं. त्यामुळे रोज थोडं चिबूड खाल्ल तरी त्याचा काही तोटा होणार नाही. मात्र साखर घालून खाल्ल तर वजन कमी होण्यासाठी मदत होत नाही. 

चिबूडामध्ये पोटॅशियमही असतं, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठीही हे फळ उपयुक्त ठरतं. तसेच, त्वचेसाठीही चिबूड खूप फायदेशीर आहे. त्यातील अँटी ऑक्सिडंट्स त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करतात आणि उन्हामुळे होणारा त्रास कमी करतात. एकंदरीत, चिबूड हे उन्हाळ्यातील एक संपूर्ण पोषण देणारं फळ आहे. शरीराला थंडावा देण्यापासून ते पचन सुधारण्यापर्यंत आणि त्वचेची काळजी घेण्यापर्यंत अनेक फायदे या एका फळात दडलेले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्या आहारात चिबूडाचा समावेश नक्कीच करायला हवा.

English
हिंदी सारांश
Web Title : Eat musk melon this summer: A healthy, hydrating, weight-loss aid.

Web Summary : Musk melon, rich in water, vitamins A and C, and fiber, hydrates, boosts immunity, aids digestion, and supports weight loss. Potassium helps control blood pressure, benefiting heart health. Antioxidants help the skin glow.
टॅग्स :समर स्पेशलअन्नआहार योजनाहेल्थ टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सफळे