Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > रात्रीच्या जेवणाऐवजी प्या हे चविष्ट सूप - वजन कमी होईल आणि उपाशी झोपायची वेळही येणार नाही

रात्रीच्या जेवणाऐवजी प्या हे चविष्ट सूप - वजन कमी होईल आणि उपाशी झोपायची वेळही येणार नाही

Drink this delicious soup for dinner - you will lose weight and you will not have to go to bed hungry : रात्री प्या फक्त हे सूप. वजन कमी करण्यासाठी फायद्याचे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2026 17:38 IST2026-03-24T17:37:14+5:302026-03-24T17:38:14+5:30

Drink this delicious soup for dinner - you will lose weight and you will not have to go to bed hungry : रात्री प्या फक्त हे सूप. वजन कमी करण्यासाठी फायद्याचे.

Drink this delicious soup for dinner - you will lose weight and you will not have to go to bed hungry | रात्रीच्या जेवणाऐवजी प्या हे चविष्ट सूप - वजन कमी होईल आणि उपाशी झोपायची वेळही येणार नाही

रात्रीच्या जेवणाऐवजी प्या हे चविष्ट सूप - वजन कमी होईल आणि उपाशी झोपायची वेळही येणार नाही

वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणाऐवजी हलकं, पचायला सोपं आणि पौष्टिक सूप घेणं खूप फायदेशीर ठरू शकतं. भाज्या, डाळी आणि ओट्स घालून केलेलं सूप पोटभरीचं असतं आणि त्यात कॅलरीजही कमी असल्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं. करायला अगदी सोपं आहे. (Drink this delicious soup for dinner - you will lose weight and you will not have to go to bed hungry)शिवाय रात्री जेवणं टाळण्याऐवजी हा पर्याय जास्त चांगला आहे. सगळ्यांनाच एकवेळचं जेवण बंद करणं जमत नाही. त्यामुळे मन मारुन उपाशी राहण्याऐवजी असे पदार्थ खा जे आरोग्यासाठी चांगले असतात.  

साहित्य (प्रमाणासहित)
ओट्स २ चमचे, मूगडाळ किंवा मसूरडाळ २ चमचे, १ गाजर , १ बीट , १ टोमॅटो , पालक, लसूण, आलं, मीठ, मिरी पूड, हळद, पाणी 

कृती 
१. सुरुवातीला डाळ स्वच्छ धुऊन थोडावेळ भिजत ठेवा, त्यामुळे ती लवकर शिजते आणि पचायलाही हलकी जाते. कढई किंवा कुकरमध्ये थोडं पाणी घालून त्यात डाळ, चिरलेल्या भाज्या, आलं आणि लसूण घालून सगळं एकत्र शिजवून घ्या. भाज्या मऊ झाल्यावर त्यात ओट्स घाला आणि पुन्हा थोडावेळ उकळू द्या, जेणेकरून सुपला नैसर्गिक घट्टपणा येईल.

२. सगळं व्यवस्थित शिजल्यावर ते थोडं गार होऊ द्या आणि हवं असल्यास मिक्सरमधून फिरवून घ्या किंवा तसेच ठेवले तरी चालते. नंतर परत गरम करताना त्यात मीठ, मिरीपू ड आणि हळद घालून ढवळून घ्या. सूप खूप घट्ट वाटत असेल तर पाणी घालून आपल्या आवडीप्रमाणे पातळ करा.

३. हे सूप रात्रीच्या जेवणाऐवजी घेतल्यास पोट भरलेलं राहतं. भूक कमी लागते आणि अनावश्यक खाणं टाळता येतं. नियमितपणे अशा प्रकारचं हलकं आणि पौष्टिक सूप घेतल्यास वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला नक्कीच मदत होते. त्यामुळे रोज रात्री हे सूप  प्या. भाज्या बदला किंवा डाळी बदला त्यामुळे चवही वेगळी मिळेल आणि पोटही भरेल. 

Web Title : रात के खाने के लिए स्वादिष्ट सूप: बिना भूखे वजन घटाएं।

Web Summary : वजन घटाने के लिए रात के खाने की जगह हल्का, पौष्टिक सूप लें। सब्जी और दाल का सूप कम कैलोरी के साथ पेट भरता है। बनाने में आसान, यह भूख को रोकता है और प्रभावी ढंग से वजन प्रबंधन का समर्थन करता है। वजन नियंत्रित करने का एक स्वस्थ और स्वादिष्ट तरीका।

Web Title : Delicious soup for dinner: Lose weight without going to bed hungry.

Web Summary : Replace dinner with light, nutritious soup for weight loss. Vegetable and lentil soup keeps you full with fewer calories. Easy to make, it prevents hunger pangs and supports weight management effectively. A healthy and tasty way to control weight.