Lokmat Sakhi >Food > Diabetes care tips : शुगर फ्री पदार्थ असं खरंच काही असतं का? दिवाळीत शुगर फ्री खाण्यापूर्वी बघा डॉक्टर काय म्हणतात..

Diabetes care tips : शुगर फ्री पदार्थ असं खरंच काही असतं का? दिवाळीत शुगर फ्री खाण्यापूर्वी बघा डॉक्टर काय म्हणतात..

Diabetes care tips : काहीजण खाऊन पिऊन फिट राहण्याच्या प्रयत्नात बाजारातील शुगर फ्री पर्यायांकडे वळतात.  (Is it safe to eat sugar free mithai)

By manali.bagul | Published: October 27, 2021 06:55 PM2021-10-27T18:55:25+5:302021-10-27T19:05:33+5:30

Diabetes care tips : काहीजण खाऊन पिऊन फिट राहण्याच्या प्रयत्नात बाजारातील शुगर फ्री पर्यायांकडे वळतात.  (Is it safe to eat sugar free mithai)

Diabetes care tips : Is it safe to eat sugar free mithai for goof health | Diabetes care tips : शुगर फ्री पदार्थ असं खरंच काही असतं का? दिवाळीत शुगर फ्री खाण्यापूर्वी बघा डॉक्टर काय म्हणतात..

Diabetes care tips : शुगर फ्री पदार्थ असं खरंच काही असतं का? दिवाळीत शुगर फ्री खाण्यापूर्वी बघा डॉक्टर काय म्हणतात..

मनाली बागुल

कुठलाही सण म्हटलं की गोड धोड पदार्थ आलेच.  दिवाळीसाठी (Diwali 2021) घरोघरी लाडू, चकली, करंजी, शंकरपाळे बनवण्याची लगबग सुरू असेल. शुगर लेव्हल, फॅट्स वाढण्याच्या भीतीनं आपल्यापैकी अनेकजण सण मनासारखे इन्जॉय करत नाहीत. तर काहीजण पुन्हा कधीही मिळणार नसल्यासारखे पदार्थांवर ताव मारतात. तर काहीजण खाऊन पिऊन फिट राहण्याच्या प्रयत्नात बाजारातील शुगर फ्री पर्यायांकडे वळतात.  (Is it safe to eat sugar free mithai)

या पदार्थांचा शरीरावर कसा परिणाम होतो? शुगर फ्री पदार्थ कितीही खाल्ले तरी चालतात का? असे प्रश्न खूप कमी लोकांना पडतात. एकूण काय तर सणासुदीला मनासारखं खाऊन तब्येत कशी चांगली ठेवावी हे माहित असणं महत्वाचं. याबाबत (Obesity and Diabetes Management specialist) डॉ.नितीन पाटणकर यांनी लोकमतशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. 

शुगर फ्री पदार्थांमध्ये कितपत तथ्य? (Sugar free food item)

- शुगर फ्री पदार्थांमध्ये दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात साखर न वापरता खजूर, खारिक यांसारखे ड्रायफ्रुट्स वापरून मिठाया तयार केल्या जातात. यात फ्रॅक्टोज नावाची साखर असते. नैसर्गिक साखरेपेक्षा कमी गोडवा या साखरेत असतो.  तसंच खजूर, मनुक्यातही गोडवा येण्यासाठी काही प्रमाणात साखर घातली जाते. साहजिकच शुगर फ्री समजून असे पदार्थ लोकांकडून जास्त खाल्ले जातात. ज्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. 

- दुसऱ्या प्रकारात साखर न वापरता (Sucralose) सुक्रालोज, Stevia (स्टिविया) यांचा वापर पदार्थांमध्ये गोडवा येण्यासाठी केला जातो. सुक्रॅलोज हे साखरेच्या ३०० ते ५०० पट जास्त गोड असते. त्यामुळे नैसर्गिक साखरेच्या तुलनेत हे पदार्थ वापरून तयार केलेल्या मिठायांचे अतिसेवन कॅलरीजचे प्रमाण खूप वाढवते आणि त्याचा शरीराला त्रास होतो’ उदा. शुगर लेव्हल वाढेल किंवा डायबिटीस होईल म्हणून साध्या साखरेचा अर्धा पेढा खाणारी व्यक्ती शुगर फ्री चा टॅग असलेले पदार्थ अनेकदा दाबून खाते. साहाजिकच यामुळे कॅलरीजचे प्रमाण वाढते.  

शरीरासाठी काय चांगलं?

या प्रकारच्या मिठाया न  खाता साध्या साखरेपासून तयार झालेल्या मिठाया, गोड पदार्थ खायला हवेत. त्याचं प्रमाणही जास्त असू नये. प्रमाणात खाल्यास  शरीरावर काही परिणाम होत नाही. डॉक्टर नितीन यांच्या म्हणण्यानुसार पदार्थ जीभेपलिकडे अन्ननलिकेत शिरला की तिथपासून चवीचा संबंध संपतो, म्हणून जीभेच्या चोचल्यांसाठी शरीराचं नुकसान करणं योग्य नाही. 

सणासुदीला, विशेष कार्यक्रमांना तुम्ही मन न मारण्यापेक्षा नक्कीच गोड, धोड पदार्थांचा आनंद घेऊ शकता. पण किती खाताय हे महत्वाचं असतं. क्वालिटीप्रमाणेच खाण्याच्या क्वांटीटीकडे लक्ष द्यायला हवं. तीन छोट्या घासात १००% समाधान मिळते. पुढील खाणे असमाधान (cravings) वाढवते. शुगर फ्री च्या पॅकेजिंगला बळी पडण्यापेक्षा घरी तयार केलेले पदार्थ खा पण अगदी कमी प्रमाणात खा.  तुम्ही एकावेळेला किती खाता, दिवसभरात किती खाता आणि खाल्लेले सर्व पदार्थ पचवण्याची शरीराची क्षमता कशी आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. 

Web Title: Diabetes care tips : Is it safe to eat sugar free mithai for goof health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.