Lokmat Sakhi >Food > दाल में बहोत प्रोटीन है! रोज एक वाटी वरण खा - तब्येत कमवा - टाळा अतिरेकी प्रयोग

दाल में बहोत प्रोटीन है! रोज एक वाटी वरण खा - तब्येत कमवा - टाळा अतिरेकी प्रयोग

Dal has a lot of protein! Eat a bowl of dal daily - gain health, healthy home food : वरण खाणे ठरते आरोग्यासाठी फार फायद्याचे. एक वाटी आमटी पिणे किती आरोग्यदायी आहे जाणून घ्या.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2025 11:25 IST2025-08-03T11:23:33+5:302025-08-03T11:25:06+5:30

Dal has a lot of protein! Eat a bowl of dal daily - gain health, healthy home food : वरण खाणे ठरते आरोग्यासाठी फार फायद्याचे. एक वाटी आमटी पिणे किती आरोग्यदायी आहे जाणून घ्या.

Dal has a lot of protein! Eat a bowl of dal daily - gain health, healthy home food | दाल में बहोत प्रोटीन है! रोज एक वाटी वरण खा - तब्येत कमवा - टाळा अतिरेकी प्रयोग

दाल में बहोत प्रोटीन है! रोज एक वाटी वरण खा - तब्येत कमवा - टाळा अतिरेकी प्रयोग

पोळी भाजी आमटी भात हे भारतीयांचे खाणे आहे. आपण आहारात काही वेगळे चटाकेदार, चमचमीत वेगळे पदार्थ करतोच. मात्र रोजच्या आहारात ठराविक पदार्थच असतात. फोडण्या विविध प्रकारच्या केल्या जातात. भाज्या तसेच डाळी वेगवेगळ्या वापरल्या जातात. (Dal has a lot of protein! Eat a bowl of dal daily - gain health, healthy home food )मात्र आहारात रोज हे पदार्थ असतातच. आरोग्य चांगले राहावे आणि शरीराला गरजेचे पोषण मिळावे यासाठी आजकाल विविध गोष्टींचा वापर लोकं करतात. महागातले पदार्थ काय घेतात, विदेशी भाज्या आणतात. मात्र आपला साधा भारतीय पद्धतीचा आहार मुळातच फार परिपूर्ण आहे. आपल्या येथील वातावरणानुसार तो योग्य आहे. त्यामुळे घरचे पौष्टिक खाऊन शरीराला गरजेचे पोषण मिळतेच. 

भारतीय स्वयंपाकघरात डाळींना महत्वाचा घटक मानतात आणि महाराष्ट्रात त्यांचा उपयोग अनेक प्रकारे होतो. यामध्ये आमटी आणि वरण हे दोन प्रमुख प्रकार आहेत, जे दररोजच्या जेवणात हमखास आढळतात. या दोन्ही पदार्थांमध्ये विविध डाळींचा समावेश होतो आणि केवळ चवीलाच नव्हे तर आरोग्यदृष्ट्याही त्यांना फार महत्त्व आहे.

डाळींना प्रथिनांचा उत्तम स्रोत मानले जाते. ती शरीरातील स्नायूंची ताकद वाढवते. पचनसंस्थेला चालना देते आणि दीर्घकाळ पोट भरलेले राहते. या डाळींत लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि बी-कॉम्प्लेक्स ही जीवनसत्त्वही असतात. जी शरीरातील विविध कार्यांसाठी उपयुक्त असतात. वरणात वापरली जाणारी मूग डाळ ही हलकी, लवकर पचणारी आणि शरीराला थंडावा देणारी मानली जाते. मूग डाळ विशेषतः पचनासाठी उपयुक्त असते आणि जठराशी संबंधित समस्या कमी करते. तूर डाळ सगळ्याचदृष्ट्या चांगले असते.

उडीद डाळ, जी काही वेळा खास आमटींमध्ये वापरली जाते, ही हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त असते. ती शरीरात उष्णता निर्माण करते आणि थंडीच्या दिवसांमध्ये उपयुक्त ठरते. मसूर डाळ ही लोहाचा समृद्ध स्रोत आहे, विशेषतः महिलांसाठी उपयुक्त असून ती हिमोग्लोबिन वाढवण्यात मदत करते. हरभऱ्याची डाळ हृदयासाठी लाभदायक आहे आणि त्यातील फायबर्समुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. एकंदरीत डाळींचा आहारातील समावेश फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे रोजच्या आहारात डाळ असणे गरजेचे आहे.  
 

Web Title: Dal has a lot of protein! Eat a bowl of dal daily - gain health, healthy home food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.