Lokmat Sakhi >Food > छोटा भीम खातो ते टूनटून मावशीचे लाडू आता तुम्हीही करा घरीच, पाहा मस्त सोपी झटपट रेसिपी

छोटा भीम खातो ते टूनटून मावशीचे लाडू आता तुम्हीही करा घरीच, पाहा मस्त सोपी झटपट रेसिपी

Chhota Bheem loves toontoon aunty's laddoo, in less ingredient's make special laddoo : भीमला आवडणारे टून-टून मावशीच्या दुकानातील लाडू घरी करायचेत? मग ही रेसिपी नक्की करून पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2023 12:21 PM2023-10-29T12:21:08+5:302023-10-29T12:22:12+5:30

Chhota Bheem loves toontoon aunty's laddoo, in less ingredient's make special laddoo : भीमला आवडणारे टून-टून मावशीच्या दुकानातील लाडू घरी करायचेत? मग ही रेसिपी नक्की करून पाहा

Chhota Bheem loves toontoon aunty's laddoo, in less ingredient's make special laddoo | छोटा भीम खातो ते टूनटून मावशीचे लाडू आता तुम्हीही करा घरीच, पाहा मस्त सोपी झटपट रेसिपी

छोटा भीम खातो ते टूनटून मावशीचे लाडू आता तुम्हीही करा घरीच, पाहा मस्त सोपी झटपट रेसिपी

'भीम की शक्ति धूम मचाए, सामने कोई टिक ना पाये'. छोटा भीममधलं (Chhota Bheem) हे गाणं लहान मुलांमध्ये खूप फेमस आहे. लहान मुलं छोटा भीम हा कार्यक्रम आवडीने पाहतात. या कार्टूनमधून मुलांना खूप काही शिकायला मिळतं. त्यातील अनेक पात्र खूप प्रसिद्ध आहेत. मुख्य म्हणजे भिमच्या दोस्त मंडळींसह, टून-टून मावशी म्हणजेच चुटकीच्या आईचं पात्र लहान मुलांना खूप आवडतं.

या कार्टूनमध्ये टून-टून मावशी एका दुकानाची मालकीण असते. त्यात ती लाडू विकते, व या दुकानातून भीम लपून - छपून लाडू चोरून खातो. आपल्याला देखील हे लाडू पाहून खाण्याची इच्छा नक्कीच झाली असेल. लहान मुलांना लाडू खूप आवडतात. जर आपल्याला देखील टून-टून मावशीच्या दुकानातील फेमस लाडू घरी तयार करायचे असतील तर, ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा(Chhota Bheem loves toontoon aunty's laddoo, in less ingredient's make special laddoo ).

टून-टून मावशीचे फेमस लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

बदाम

काजू

पिस्ता

तूप

बेसन

पिठीसाखर

कृती

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात ४ ते ५ बदाम, काजू, पिस्ता घालून पावडर तयार करा. गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. नंतर त्यात ४ ते ५ चमचे तूप घाला. तूप विरघळल्यानंतर त्यात सुकामेव्याची पावडर घालून एका मिनिटासाठी चमच्याने ढवळत राहा. नंतर त्यात २ वाटी बेसन घालून चमच्याने मिक्स करा. जोपर्यंत बेसन तुपामध्ये एकजीव होत नाही, तोपर्यंत चमच्याने ढवळत राहा.

१५ ते २० मिनिटानंतर तयार मिश्रण एका प्लेटमध्ये काढून पसरवा. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात एक कप पिठीसाखर घालून हाताने एकजीव करा. मिश्रण छान एकजीव झाल्यानंतर हाताला थोडे तूप लावून लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे भीमला आवडणारे टून-टून मावशीच्या दुकानातील फेमस चविष्ट लाडू खाण्यासाठी रेडी.

Web Title: Chhota Bheem loves toontoon aunty's laddoo, in less ingredient's make special laddoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.