कितीही नियोजन केलं तरी कधी कधी असं होतंच की घरात कोणतीच भाजी नसते. कांदा, बटाटा, टोमॅटो या आपल्या नेहमीच्या भाज्या तेवढ्या असतात. कधी कधी तर यापैकी एखादी भाजीही संपलेली असते. पण रोजच्या जेवणात तर भाजी हवीच असते. अशावेळी मग जर फक्त कांदे उरले असतील तर कांद्याचं पिठलं केलं जातं किंवा कांदा परतून त्यांची भाजी केली जाते. पण या त्याच त्याच चवीची भाजी खाण्यापेक्षा ही थोडी वेगळी रेसिपी पाहा. ही रेसिपी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. रेसिपी अगदी सोपी आहे. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून पाहा (how to make dhaba style onion sabji?). घरातल्या सगळ्यांनाच आवडेल.(celebrity chef Kunal Kapoor shared onion sabji recipe)
कांद्याची भाजी करण्याची रेसिपी
साहित्य
दोन मध्यम आकाराचे कांदे
७ ते ८ काजू
३ टेबलस्पून दही
एन्झायटीचा त्रास- मनात सतत निगेटीव्ह विचार? २ मिनिटांत अस्वस्थ मन शांत करण्याची खास ट्रिक..
१ टीस्पून लाल तिखट, जीरेपूड, धनेपूड, चाट मसाला
१ टीस्पून जीरे, धने
२ ते ३ वाळलेल्या लाल मिरच्या आणि तेवढ्याच हिरव्या मिरच्या
१ टीस्पून आलं- लसूण पेस्ट
चवीनुसार मीठ
कृती
या पद्धतीने कांद्याची भाजी करण्यासाठी कांदे मोठ्यामोठ्या फोडींमध्ये चिरून घ्या.
यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, हिंग, जिरे, धने, हिरव्या मिरच्या, आलं- लसूण पेस्ट असं सगळं घालून परतून घ्या.
यानंतर काजू आणि दही थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि त्याची पातळ पेस्ट करा. आता ही पेस्ट कढईमध्ये घाला. पेस्ट परतून घेतल्यानंतर त्यामध्ये हळद, तिखट, धने पावडर, जिरे पावडर घाला.
यानंतर कांदा घालून परतून घ्या. सगळ्यात शेवटी मीठ, चाट मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. यानंतर थोडंसं पाणी टाकून कढईवर झाकण ठेवा आणि वाफ येऊ द्या. चटपटीत चवीची कांद्याची भाजी तयार..