lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > हिंगाशिवाय फोडणी शक्यच नाही? पण हिंगाविषयी या ३ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

हिंगाशिवाय फोडणी शक्यच नाही? पण हिंगाविषयी या ३ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

हिंगाचा आपण रोजच वापर करतो, पण हेच हिंग जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात, कोणते ते पाहूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 05:58 PM2021-11-10T17:58:09+5:302021-11-10T18:02:33+5:30

हिंगाचा आपण रोजच वापर करतो, पण हेच हिंग जास्त प्रमाणात घेतल्यास त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात, कोणते ते पाहूया...

Bursting is not possible without hinga? But do you know these 3 things about Hinga? | हिंगाशिवाय फोडणी शक्यच नाही? पण हिंगाविषयी या ३ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

हिंगाशिवाय फोडणी शक्यच नाही? पण हिंगाविषयी या ३ गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

Highlightsहिंगाचा जास्त वापर झाल्यास काय तोटे होतात वाचा...पदार्थाला स्वाद आणणारा हिंग कधीतरी आरोग्यासाठी अपायकारकही

आपण रोज भाजी, आमटी, पोहे, उपीट आणि बाकी सगळ्याच पदार्थांना फोडणी देतो. यामध्ये आपण मसाल्यातील वेगवेगळे पदार्थ वापरतो. हे मसाले आरोग्यासाठी फायदेशीर असतातच पण जेवणाचा स्वाद वाढविण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. या फोडणीत आपण हिंगाचाही आवर्जून वापर करतो. हिंगाने पदार्थाला येणारा स्वाद पदार्थाच्या चवीत भरच घालतो. मात्र या हिंगाचे प्रमाण जास्त झाल्यास ते आरोग्यासाठी घातकही ठरु शकते. आरोग्याच्या काही समस्यांसाठी हिंग औषध म्हणूनही काम करते. पण या हिंगाचे प्रमाण योग्य असायला हवे. पाहूयात हिंगाविषयी काही महत्त्वपूर्ण बाबी...

हिंग हे मानवासाठी उपयुक्त असल्याचे म्हटले जाते. आपण दररोजच्या जेवणात वापरत असलेले हिंगाचे प्रमाण सामान्यपणे सुरक्षित मानले जाते. एका अभ्यासानुसार, दररोज दोन वेळच्या जेवणांमध्ये मिळून २५० मिलीग्रॅम हिंगाचा वापर केलेला चालतो. पण हेच हिंग जास्त प्रमाणात वापरल्यास तोंडावर सूज येणे, गॅसेसचा त्रास, ताण आणि डोकेदुखीचे कारण होऊ शकते. त्यामुळे आहारतज्ज्ञ हिंग ठराविक प्रमाणात वापरण्याचा सल्ला देतात. पाहूयात हिंगाचा जास्त वापर केल्यास उद्भवणाऱ्या संमस्यांविषयी...

( Image : Google)
( Image : Google)

१. गॅसेसचा त्रास - पोटदुखी, अपचन यांसारख्या पोटाच्या तक्रारींसाठी अनेकदा हिंग खाण्याचा सल्ला दिला जातो. मग कोणी नुसते किंवा कोणी गुळासोबत, ताकात घालून हिंग घेतात. पण हे हिंग जास्त प्रमाणात खाल्ले गेल्यास गॅसेसचा त्रास होऊ शकतो. तसेच हिंगाच्या जास्त सेवनामुळे पोट फुगल्यासारखे होते आणि पोटात जळजळ होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे तुम्ही पोटावर उपाय म्हणून हिंग खात असाल तर केवळ चिमूटभर हिंग खायला हवे. 

२. ब्लडप्रेशर अनियमितता - सतत हिंगाचा जास्त प्रमाणात वापर केल्यास ब्लडप्रेशर वरखाली होण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. इतकेच नाही तर काही लोकांना डोकेदुखी, चक्कर येणे आणि लक्ष केंद्रित न होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. आधीपासून ब्लडप्रेशरचा त्रास असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांना न विचारता हिंगाचे सेवन करु नये. 

( Image : Google)
( Image : Google)

३. गर्भवतींनी काळजी घ्यायला हवी - गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी हिंग कितपत फायदेशीर आहे याबाबत पुरेसे संशोधन उपलब्ध नाही. मात्र या महिलांनी प्रमाणापेक्षा जास्त हिंगाचे सेवन करु नये. हिंगातील काही घटक हे गर्भासाठी म्हणावे तितके चांगले नसतात. यामुळे गर्भाशी निगडित अडचणी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भावस्थेत डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने आहार घेणे केव्हाही फायद्याचे असते. डॉक्टरांचा सल्ला न घेता घरगुती उपाय म्हणून हिंगाचा वापर करु नका. 

Web Title: Bursting is not possible without hinga? But do you know these 3 things about Hinga?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.