वातावरणातला उकाडा आता प्रचंड वाढलेला आहे. अगदी सकाळी १० नंतरच ऊन खूप तापलेलं असतं. अशा गरम वातावरणात जेवणही जात नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता जर योग्य केला तर थकवा अशक्तपणा येत नाही. पण नाश्त्याला काय करावं असा प्रश्न असतोच. त्याच प्रश्नाचं हे एक सोपं उत्तर पाहा. डॉक्टर सांगतात की उन्हाळ्यात सकाळी नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ म्हणजे दही पोहे (how to make dahi pohe?). ते जर तुम्ही पुढे सांगितलेल्या एका खास पद्धतीने करून खाल्ले तर आरोग्याला नक्कीच खूप फायदे होतील.(dahi pohe recipe for summer breakfast)
दही पोहे करण्याची रेसिपी
दही पोहे करण्यासाठी एक कप पोहे घ्या आणि ते पाण्याने व्यवस्थित भिजवून ओले करून घ्या.
छान ओलसर भिजवलेल्या पोह्यांमध्ये एक कप घरी तयार केलेले दही घाला.
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याची भीती वाटते? ' हे ' घरगुती तेल लावा, केस होतील दाट
दही घालण्यापुर्वी ते व्यवस्थित फेटून घ्या. त्यामध्ये चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर, भाजलेले किंवा तुपात परतून घेतलेले शेंगादाणे, डाळवं, बारीक चिरलेली काकडी, टोमॅटो, गाजर आणि भरपूर कोथिंबीर घाला. आणखी छान चव आणि सुगंध येण्यासाठी तुम्ही त्यात पुदिना आणि डाळिंबाचे दाणेही घालू शकता.
यानंतर गॅसवर छोटीशी कढई गरम करायला ठेवा. त्यामध्ये तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर जिरे, हिरव्या मिरच्या, कडिपत्ता आणि हिंग घालून छान खमंग फोडणी करून घ्या.
हात खूप सुरकुतल्यासारखे दिसतात? किचनमधले २ पदार्थ हातांवर चोळा, हात होतील सायीसारखे मऊ
ही कडकडीत फोडणी पोह्यांवर घातली की सगळे पदार्थ एकदा व्यवस्थित हलवून घ्या. मस्त गारेगार दही पोहे तयार.
हे पोहे पचायला हलके असतात. शिवाय त्यामध्ये आपण भरपूर भाज्या घातल्याने त्यातून फायबरही चांगल्या प्रमाणात मिळतात. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी दही पोहे उपयुक्त ठरतात.
Web Summary : Dahi Pohe is a refreshing and healthy breakfast option for summer. This recipe involves soaking flattened rice, mixing it with yogurt, and adding vegetables and spices. It aids digestion and keeps the body cool during hot weather.
Web Summary : दही पोहा गर्मियों के लिए एक ताज़ा और स्वस्थ नाश्ता विकल्प है। इस रेसिपी में चपटा चावल भिगोकर, दही में मिलाकर, सब्जियां और मसाले मिलाए जाते हैं। यह पाचन में मदद करता है और गर्मी के मौसम में शरीर को ठंडा रखता है।