lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > तुम्हीही आलं फ्रिजमध्ये ठेवता का? 'हे' ३ पदार्थ चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका, बघा काय होतं....

तुम्हीही आलं फ्रिजमध्ये ठेवता का? 'हे' ३ पदार्थ चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका, बघा काय होतं....

Avoid Keeping These 3 Ingredients In Refrigerator: फ्रिजमध्ये कोणते पदार्थ चुकूनही ठेवू नयेत, हे एकदा बघा... स्वत:सकट घरच्यांचं आरोग्य जपायचं तर एवढं करायलाच पाहिजे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2024 09:07 AM2024-02-02T09:07:26+5:302024-02-02T09:10:01+5:30

Avoid Keeping These 3 Ingredients In Refrigerator: फ्रिजमध्ये कोणते पदार्थ चुकूनही ठेवू नयेत, हे एकदा बघा... स्वत:सकट घरच्यांचं आरोग्य जपायचं तर एवढं करायलाच पाहिजे...

Avoid keeping these 3 ingredients in refrigerator, we should not keep these 3 things in fridge | तुम्हीही आलं फ्रिजमध्ये ठेवता का? 'हे' ३ पदार्थ चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका, बघा काय होतं....

तुम्हीही आलं फ्रिजमध्ये ठेवता का? 'हे' ३ पदार्थ चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका, बघा काय होतं....

Highlightsफ्रिजमध्ये असलं तरी ते अन्न खराब होण्याची प्रक्रिया सुरू असतेच. फक्त फरक एवढा असतो की ही क्रिया खूप सावकाश होते. त्यामुळे अन्न खराब होत आहे, हे आपल्याला कळतही नाही.

हल्ली फ्रिजचा वापर बऱ्याच घरांमध्ये स्टोरेज बॉक्स म्हणून केला जातो. जे पदार्थ उरले किंवा बाजारातून जास्तीचे आणले ते सगळे पदार्थ फ्रिजमध्ये कोंबून ठेवले जातात. बऱ्याचजणी ८- १० दिवसांच्या भाज्या एकदम घेतात आणि सगळ्याच फ्रिजमध्ये भरून ठेवतात. पण फ्रिजमध्ये असलं तरी ते अन्न खराब होण्याची प्रक्रिया सुरू असतेच. फक्त फरक एवढा असतो की ही क्रिया खूप सावकाश होते. त्यामुळे अन्न खराब होत आहे, हे आपल्याला कळतही नाही. आपण ते खातो आणि तेच आपल्या आरोग्यासाठी जास्त धाेकादायक ठरतं (Avoid keeping these 3 ingredients in refrigerator). काही पदार्थ तर फ्रिजमध्ये मुळीच ठेवू नयेत. ते पदार्थ कोणते ते पाहा...(we should not keep these 3 things in fridge)

फ्रिजमध्ये कोणते पदार्थ ठेवू नयेत?

 

कोणते ३ पदार्थ फ्रिजमध्ये कधीच ठेवू नयेत, याविषयीचा एक माहितीपूर्ण व्हिडिओ manvirdosanjh या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

तळपायाच्या भेगांपासून ते चेहऱ्याच्या टॅनिंगपर्यंत.. सगळ्या समस्या घालविण्यासाठी फक्त १ सोपा उपाय

१. आलं

या व्हिडिओनुसार आलं चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका. कारण फ्रिजमधल्या दमट- ओलसर वातावरणामुळे आलं लवकर खराब होतं. त्याचा सुगंध कमी होत जातो. त्यामुळे आलं फ्रिजमध्ये न ठेवता नेहमी कोरड्या थंड जागेत ठेवावं. 

 

२. कांदा

कांदे आपण कोरड्या जागेत साठवतो. पण कधीतरी चिरलेला कच्चा कांदा उरला तर तो फ्रिजमध्ये ठेवला जातो.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या 'बजेट स्पेशल' ६ सुपर साड्या, बघा साड्यांची खास बात..

किंवा कच्चा कांदा असणारा एखादा पदार्थ उरला तरीही आपण तो सहज फ्रिजमध्ये ठेवून देतो आणि नंतर खातो. पण असं करणं आरोग्यासाठी घातक आहे. कारण कांदा चिरल्यानंतर काही तासांतच त्यातून काही गॅसेस तयार होतात, जे आरोग्यासाठी चांगले नसतात.

 

३. केचअप

टोमॅटो केचअपदेखील कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. मुळातच त्यांच्यात असे घटक असतात, ज्यामुळे ते बाहेरच्या वातावरणात राहू शकेल. त्यामुळेच कोणत्याही दुकानांमध्ये, मॉलमध्ये केचअप कधीही फ्रिजमध्ये ठेवलेले नसते. 

 

Web Title: Avoid keeping these 3 ingredients in refrigerator, we should not keep these 3 things in fridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.