lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > ढाबास्टाईल डाळ तडका-घरीच करा १० मिनिटात, रोजच्या वरणाला येईल हॉटेलस्टाईल चव

ढाबास्टाईल डाळ तडका-घरीच करा १० मिनिटात, रोजच्या वरणाला येईल हॉटेलस्टाईल चव

Authentic Dhaba Style Dal Fry : रोजच्या डाळीला द्या ढाबास्टाईल झणझणीत तडका, उकळी फुटताच घरात पसरेल घमघमाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2024 11:39 AM2024-01-23T11:39:46+5:302024-01-23T11:41:46+5:30

Authentic Dhaba Style Dal Fry : रोजच्या डाळीला द्या ढाबास्टाईल झणझणीत तडका, उकळी फुटताच घरात पसरेल घमघमाट

Authentic Dhaba Style Dal Fry | ढाबास्टाईल डाळ तडका-घरीच करा १० मिनिटात, रोजच्या वरणाला येईल हॉटेलस्टाईल चव

ढाबास्टाईल डाळ तडका-घरीच करा १० मिनिटात, रोजच्या वरणाला येईल हॉटेलस्टाईल चव

कोणाला रोजच्या जेवणात डाळ-भात (Daal-Bhaat) खायला दिलं, तरी ते आवडीने खातील. भारतीय लोकांच पोट भात-डाळ खाऊनही भरते.  शिवाय डाळ-भातामधील पौष्टीक घटक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. पण बऱ्याचदा रोजच्या चवीचे डाळ-भात खाऊन प्रचंड कंटाळा येतो. जिभेला वेगळी चव मिळावी म्हणून, बरेच जण हॉटेलमध्ये जाऊन विविध पदार्थ खातात. तर काही जण हॉटेलमध्ये जाऊनही डाळ-भात ऑर्डर करतात.

पण आपण घरात ढाबास्टाईल डाळ तडका तयार करू शकता. विविध भागांमध्ये डाळीला तडका देण्याची पद्धत वेगवेगळी आढळते (Cooking Tips). काही जण फोडणीमध्ये शिजवलेली डाळ घालून मिक्स करतात (Dhaba Style Daal Tadka). तर काही जण शिजवलेल्या डाळीवर फोडणी देतात. जर आपल्याला ढाबास्टाईल डाळ तडका खायचे असेल तर, या रेसिपीला फॉलो करा(Authentic Dhaba Style Dal Fry).

ढाबास्टाईल डाळ तडका करण्यासाठी लागणारं साहित्य

शिजवलेली डाळ (तूर, मूग)

जिरं

कडीपत्ता

लसूण

कांदा

कोण म्हणतं घरी लोणी स्पंज डोसा करता येत नाही? पीठ दळताना घाला २ पांढऱ्या गोष्टी

हिंग

हळद

गरम मसाला

कोथिंबीर

कसुरी मेथी

मीठ

कृती

सर्वप्रथम, एका कढईत २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, कडीपत्ता, बारीक चिरलेला किंवा ठेचलेला लसूण आणि बारीक चिरलेला कांदा घालून परतवून घ्या. कांदा लालसर झाल्यानंतर त्यात चिमुटभर हिंग, चिमुटभर हळद, अर्धा चमचा गरम मसाला, एक चमचा लाल तिखट घालून मिक्स करा. हवं असल्यास आपण त्यात उकडलेला बटाटा देखील घालू शकता.

भाकरी करताना वातड-कडक होतात? शेफ पंकज भदौरिया सांगतात १ सोपी ट्रिक-भाकऱ्या होतील परफेक्ट

तयार फोडणीमध्ये शिजवलेली डाळ घालून मिक्स करा. आपण डाळ शिजवताना तूर आणि मुगाच्या डाळीचा वापर करू शकता. नंतर त्यात एक कप पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि कसुरी मेथी घालून मिक्स करा. शेवटी चवीनुसार मीठ घाला. वरणाला उकळी फुटल्यानंतर गॅस बंद करा. अशा प्रकारे ढाबास्टाईल डाळ तडका वाफाळलेल्या भातासह खाण्यासाठी रेडी.

Web Title: Authentic Dhaba Style Dal Fry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.