आंब्याचा हंगाम आला असला तरी आपल्याकडे बहुतांश लोक असे आहेत जे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पहिल्यांदा आंबे खरेदी करतात आणि तेव्हापासूनच आंब्याचा रस खातात. आपल्याकडे जसे प्रत्येक सणाला एखाद्या खास पदार्थाचे महत्त्व असते, तसेच महत्त्व अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आंब्याला आहे. त्यामुळे घरोघरी आता अक्षय्य तृतीयेनिमित्त आमरस करण्यासाठी आंब्यांच्या खरेदीची तयारी सुरू झालेली असणार.. वर्षातून मोजके २ महिने मिळणारं हे फळं. त्यामुळे आंब्यांचा आणि आमरसाचा मनमुराद आस्वाद घ्या पण त्या फळाची पौष्टिकता घालवू नका (Avoid 2 Mistakes While Making Mango Juice). म्हणूनच आमरस करताना कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या टाळाव्या याविषयी आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी यांनी दिलेली ही विशेष माहिती...(healthy and nutritious way of making aamras or mango juice)
आमरस करताना या गोष्टी लक्षात ठेवाच..
मंजिरी कुलकर्णी सांगतात की आमरस पचण्यासाठी वातावरणात पुरेशी उष्णता असणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे अक्षय्य तृतीया जेव्हा येते तेव्हा उन्हाळा सुरुवात होऊन थोडासा काळ गेलेला असतो आणि आंबा पचनासाठी व्यवस्थित अशी उष्णता हवेमध्ये तयार झालेली असते. त्यामुळे बरेच लोक अक्षय्य तृतीयेच्या दिवशीपासून आमरस खाण्यास सुरुवात करतात.
फक्त २ गोष्टी करा- कडिपत्त्याचं रोप होईल हिरवेगार- डेरेदार, इतर कोणत्याच खताची गरज नाही
आमरस कसा करावा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आजकाल आपण सगळेच आमरस करताना मिक्सरमध्ये फिरवून तो एकसारखा, मऊ करण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्यामुळे आंब्यातले खूप चांगले घटक नाश पावतात. जसे की आमरस पचायला जड असल्यामुळे निसर्गानेच त्यामध्ये फायबर जास्त दिलेले आहेत. पण हे फायबर आपण मिक्सरमध्ये आमरस फिरवून संपवून टाकतो. त्यामुळे आमरस पचायला आणखी जड होतो. म्हणूनच आमरस मिक्सरमधून फिरवलेला नसावा.
ज्यांना पचनाच्या तक्रारी आहेत त्यांनी आमरसामध्ये चमचाभर गाईचं तूप आणि थोडीशी मिरेपूड टाकून खाल्लं तर पचायला तो बऱ्यापैकी हलका होतो.
तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिता? ३ गोष्टी कटाक्षाने टाळा- तब्येतीला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त
बरेच लोक आमरस करताना त्यामध्ये दूध घालतात. मँगो मिल्कशेक मोठ्या आवडीने प्यायला जातो. पण हे अत्यंत चुकीचे आहे. कारण फळ आणि दूध हे विरुद्ध आहार म्हणून ओळखले जाते. त्यामुळे त्याचे वाईट परिणाम शरीरावर होऊ शकतात. त्यामुळे आमरस करताना त्यात दूध अजिबात घालू नये.