lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > भाजी आवडीची नाही, मग तोंडी लावायला ५ मिनिटांत करा एक झणझणीत पदार्थ - जेवणाची वाढेल रंगत

भाजी आवडीची नाही, मग तोंडी लावायला ५ मिनिटांत करा एक झणझणीत पदार्थ - जेवणाची वाढेल रंगत

Mirchi Lasun Fried Chutney Recipe: फक्त २ पदार्थ वापरून आपण हा खास पदार्थ करणार आहोत. त्याला तळलेलं तिखट असं म्हणतात. बघा नेमका कसा असतो तो पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2023 03:09 PM2023-09-13T15:09:07+5:302023-09-13T15:09:48+5:30

Mirchi Lasun Fried Chutney Recipe: फक्त २ पदार्थ वापरून आपण हा खास पदार्थ करणार आहोत. त्याला तळलेलं तिखट असं म्हणतात. बघा नेमका कसा असतो तो पदार्थ...

1 Simple trick that make your simple or routine meal delicious and tasty, Mirchi lasun fried chutney recipe | भाजी आवडीची नाही, मग तोंडी लावायला ५ मिनिटांत करा एक झणझणीत पदार्थ - जेवणाची वाढेल रंगत

भाजी आवडीची नाही, मग तोंडी लावायला ५ मिनिटांत करा एक झणझणीत पदार्थ - जेवणाची वाढेल रंगत

Highlightsकधी कधी तोंडी लावायला काही तरी झणझणीत, तोंडाला अगदी चव आणणारं असं काहीतरी पाहिजे असतं. अशावेळी ही रेसिपी तुमच्या खूप उपयोगी येऊ शकते.

कधी कधी तेच ते नेहमीचं वरण- भात- भाजी- पोळी किंवा भाकरी असं जेवण करून कंटाळा येतो.  कधी कधी जेवणात खूपच साधी किंवा आापल्याला आवडत नसणारी भाजी असते. अशा वेळी मग जेवणाची मजाच जाते. कधी कधी तोंडी लावायला काही तरी झणझणीत, तोंडाला अगदी चव आणणारं असं काहीतरी पाहिजे असतं. अशावेळी ही रेसिपी तुमच्या खूप उपयोगी येऊ शकते. स्वयंपाक घरातले फक्त २ पदार्थ वापरून आपण ही रेसिपी करणार आहे (1 Simple trick that make your simple or routine meal delicious ). यालाच तळलेलं तिखट असं मराठवाड्यात म्हटलं जातं. (Mirchi lasun fried chutney recipe)

 

तळलेलं तिखट करण्याची रेसिपी
साहित्य

१ टेबलस्पून लाल तिखट

५ ते ६ लसूण पाकळ्या

तळणीचे मोदक करताना तेलात फुटू नयेत म्हणून ३ टिप्स, मोदक होतील खमंग

१ टीस्पून तीळ

१ टेबलस्पून तेल

चवीनुसार मीठ

फोडणीसाठी मोहरी आणि चिमूटभर हिंग

 

रेसिपी
१. सगळ्यात आधी लसूण सोलून घ्या आणि त्याचे अगदी बारीक बारीक असे काप करा. गॅसवर फोडणीसाठी वापरण्यात येणारी छोटी कढई तापायला ठेवा.

वेटलॉससाठी अत्यंत उपयोगी ४ हेल्थ ड्रिंक्स, पचन होईल झ्टपट आणि वजन उतरेल सरसर....

२.  कढई गरम झाली की त्यात तेल टाका. तेल चांगलं तापलं की त्यात मोहरी टाकून फोडणी करून घ्या. फोडणी झाल्यानंतर त्यात स्वादासाठी चिमुटभर हिंग टाका आणि त्यानंतर तीळ घाला.

 

३. तीळ लालसर झाले की त्यात लाल तिखट घाला. लाल तिखट घातल्यानंतर अगदी ५ ते ६ सेकंदातच गॅस बंद करून टाका. गॅस चालू ठेवल्यास ठसका येऊ शकतो.

जोडीदार आपल्याला गृहित धरतोय हे कसे ओळखाल? धोक्याची घंटा वाजवणारी ३ लक्षणे, सावध व्हा..

४. आता त्यात मीठ घाला आणि सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. ते तिखट कढईमध्ये तसंच ठेवा. तिखटाचा लालसर रंग जाऊन जेव्हा ते थोडं चॉकलेटी दिसू लागेल, तेव्हा आपलं तिखट छान खमंग तळलं गेलं आहे, हे ओळखावं. जर तेल कमी वाटत असेल तर आणखी तेल घालू शकता. हे तळलेलं तिखट जेवणात तोंडी लावायला घ्या. जेवणाची मजा नक्कीच वाढेल. 

 

 

Web Title: 1 Simple trick that make your simple or routine meal delicious and tasty, Mirchi lasun fried chutney recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.