Lokmat Sakhi >Fitness > मलायका अरोराच्या परफेक्ट फिगरचे सीक्रेट, सकाळी 'हा' कपभर चहा पिते रोज...

मलायका अरोराच्या परफेक्ट फिगरचे सीक्रेट, सकाळी 'हा' कपभर चहा पिते रोज...

Why Malaika Arora swears by clove tea Health benefits you need to know : Malaika Arora Drink Clove Tea Know Its Health Benefits : मलायका दिवसाची सुरुवात चहानेच करते, पण हा चहा साधासुधा नसून - ठेवतो तिला कायम फिट आणि हेल्दी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2025 14:40 IST2025-04-13T14:26:32+5:302025-04-13T14:40:51+5:30

Why Malaika Arora swears by clove tea Health benefits you need to know : Malaika Arora Drink Clove Tea Know Its Health Benefits : मलायका दिवसाची सुरुवात चहानेच करते, पण हा चहा साधासुधा नसून - ठेवतो तिला कायम फिट आणि हेल्दी...

Why Malaika Arora swears by clove tea Health benefits you need to know Malaika Arora Drink Clove Tea Know Its Health Benefits | मलायका अरोराच्या परफेक्ट फिगरचे सीक्रेट, सकाळी 'हा' कपभर चहा पिते रोज...

मलायका अरोराच्या परफेक्ट फिगरचे सीक्रेट, सकाळी 'हा' कपभर चहा पिते रोज...

बॉलिवूड मधील सगळ्यात फिट अँड फाईन असणाऱ्या अभिनेत्रींपैकी मलायका अरोरा - खानचे नाव सगळ्यात आधी येते. मलायकाने स्वत:ला ज्या पद्धतीने फिट ठेवलं आहे, ते खरोखरंच कमाल आहे, म्हणूनच तर पन्नाशी ओलांडलेली असताना देखील मलायका अजूनही तितकीच तरुण आणि फिट दिसते.  मलायका अरोराला बघून तिच्या (Why Malaika Arora swears by clove tea Health benefits you need to know) वयाचा अंदाज लावणं तसं कठीणच आहे. खरंतर, तिच्या फिटनेसमागे खूप खडतर मेहनत आणि नियमबद्द रूटीन आहे. मलायका वयाच्या ५० व्या वर्षीही इतकी तरुण आणि फिट दिसते की फिटनेसमध्ये ती आजच्या अभिनेत्रींना मागे टाकते(Malaika Arora Drink Clove Tea Know Its Health Benefits).

मलायका स्लिम फिट दिसण्यासाठी आजही तितकीच मेहेनत घेताना दिसते. तिचे डेली फिटनेस रुटीन ती अगदी काटेकोरपणे, बारकाईने फॉलो करतेच. आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या दिवसाची सुरुवात ही चहाच्या घोटानेच होते. मलायका देखील दिवसाची सुरुवात मस्त कपभर चहा पिऊन करते, परंतु तिचा चहा वेगळ्या प्रकारचा असतो. मलायका सकाळी कपभर लवंगाचा चहा पिऊन दिवसाची सुरुवात करते. या खास कपभर लवंगाच्या चहाने दिवसभर तिला काम करण्यासाठी ऊर्जा तर मिळतेच पण सोबतच तिचे फिटनेस राखण्यास देखील मदत होते. मलायका पिते तो लवंगाचा चहा कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत ते पाहूयात.  

लवंगाचा चहा कसा करायचा ? 

लवंगाचा चहा करण्यासाठी आपल्याला ग्लासभर पाणी, १० ते १२ लवंग काड्या, १ टेबलस्पून मध आणि  १ टेबलस्पून लिंबाचा रस इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी घेऊन ते हलके उकळवून घ्यावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात लवंग काड्या घालाव्यात. लवंग घातल्यावर ५ ते ७ मिनिटे पाणी मध्यम आचेवर गरम करून घ्यावे. लवंगाचा फ्लेवर पाण्यांत उतरल्यावर गॅस बंद करून हे पाणी गाळून घ्यावे. या गाळून घेतलेल्या लवंगाच्या पाण्यात आपण आपल्या आवडीनुसार, मध किंवा लिंबाचा रस घालू शकता. 

नेहमी गाडी लागते, उलट्या-मळमळतं? २ सोपे उपाय, प्रवासात गाडी लागणं बंद-आनंदानं जा फिरायला!

लवंगाचा चहा पिण्याचे फायदे... 

१. लवंगमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. जे शरीराला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानाशी लढण्यास मदत करतात. ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

२. लवंगामध्ये अँटीसेप्टिक, अँटीव्हायरल आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म देखील असतात. जे सर्दी आणि खोकला दूर ठेवतात.

३. हा चहा प्यायल्याने तुमची पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. निरोगी पचन तुमचे वजन लवकर कमी करण्यास मदत करेल. हे पेय तुमचा चयापचय दर वाढवण्यास देखील मदत करते.

उन्हाळ्यात वजन कमी करायचं ? सातूच्या पिठाचे 'हे' ५ पदार्थ करतील जादू - वेटलॉस होऊन दिसाल स्लिमट्रिम...

४. जर तुम्हाला हिरड्या किंवा दातांच्या दुखण्याने त्रास होत असेल तर लवंग चहा घेणे तुमच्यासाठी चांगले आहे. लवंगात दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे हिरड्यांची जळजळ कमी करतात.

५. लवंग चहा देखील छातीत रक्तसंचय किंवा सायनस ग्रस्त लोकांसाठी एक आरोग्यदायी पेय आहे. लवंगात युजेनॉल असते जे कफ साफ करण्यास मदत करते.

६. लवंगात व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के असते जे बॅक्टेरियाच्या संसर्गाशी लढण्यास मदत करतात. हे तुमच्या शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करते.

विराट कोहलीच्या पोषणतज्ज्ञांनी सांगितली खास युक्ती, ४ सवयी फक्त बदला-फिटनेस मिळवा कोहलीसारखा!

दिवसांतून केव्हा पिणे आहे फायदेशीर ?

हिंदुस्तान टाइम्सला डॉ. अंजना यांनी दिलेल्या मुलाखतीनुसार, जेवणांनंतर अर्ध्या तासाने लवंगाचा चहा पिण्याची सर्वोत्तम वेळ आहे. जेवणानंतर पोटफुगीची समस्या कमी करण्यास आणि जेवलेल्या अन्नाचे पचन करण्यास मदत होते. आपण सकाळी उपाशीपोटी देखील लवंगाचा चहा पिऊ शकतात. लवंगाचा चहा दिवसातून एक किंवा जास्तीत जास्त दोन वेळा पिणे फायदेशीर ठरेल.

Web Title: Why Malaika Arora swears by clove tea Health benefits you need to know Malaika Arora Drink Clove Tea Know Its Health Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.