आपलं शरीर निरोगी आणि प्रभावी दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. फिट राहण्यासाठी लोक जिममध्ये तासनतास मेहनत करतात. अनेकदा योग्य आहार घेऊनही वर्कआऊटचा पुरेपूर फायदा मिळत नाही. लोक असा विचार करतात की वर्कआऊटचा परिणाम आपली ऊर्जा आणि एनर्जीवर होतो. (What Should Eat Before Workout)
प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटीयाचे फिटनेस ट्रेनर सिद्धार्थ सिंह यांनी अलिकडेच सोशल मीडिआवर प्री-वर्कआऊट डाएटबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांच्यामते काही पदार्थ वर्कआऊटच्या आधी खाणं टाळायला हवं. कारण यामुळे पचनक्रिया संथ होते. पण काही सुपरफूड्स शरीराला एनर्जी देण्यात जास्त प्रभावी ठरतात. (Foods That You Eat Before Workout)
तळलेले पदार्थ खाऊ नका
सिद्धार्थ सिंह यांच्यामते वर्कआऊटच्या आधी तळलेले पदार्थ खाणं टाळा. अशा पदार्थांमध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचनाची गती संथ होते. थकवा येणं, पोटात जडपणा येणं, थकवा, व्यायामात मन न लागणं अशा समस्या उद्भवतात. म्हणून व्यायामाला जाण्यासाठी अशा पदार्थांपासून लांब राहायला हवं.
जास्त फायबर्सयुक्त पदार्थ लगेच खाऊ नका
फायबर्स शरीरासाठी आवश्यक असतात पण वर्कआऊटच्या आधी जास्त फायबर्स खाणं चांगले मानले जात नाही. फायबर्सयुक्त पदार्थ पचायला जास्तवेळ घेतात. ज्यामुळे तुम्हाला ब्लॉटींग, गॅसेस असे त्रास उद्भवू शकतात. म्हणून व्यायामाआधी सॅलेड किंवा फायबर्सयुक्त पदार्थ खा.
साखरयुक्त पदार्थांपासून दूर राहा
काही लोक व्यायामाला जाण्याधी गोड पदार्थ किंवा चॉकलेट्स खातात जेणेकरून त्यांना त्वरीत एनर्जी मिळेल. पण असे पदार्थ तात्पुरती एनर्जी देतात पण त्यांना वर्कआऊटदरम्यान चक्कर येऊ शकते तसंच थकवा येऊ शकतो म्हणूनच गोड पदार्थ स्नॅक्स किंवा शुगरयुक्त ड्रिंक्स टाळावे.
व्यायामाआधी केळी, ओट्स, पीनट बटर, उकळलेले बटाटे, दही आणि फळं, प्रोटीनयुक्त हलका आहार घ्यायला हवा. एक्सपर्ट्सच्यामते जिमला जाण्याच्या ३० ते ६० मिनिटं आधी हलका आहार घ्या. जर तुम्ही जड अन्नपदार्थ खाल्ले तर वर्कआऊटच्या कमीत कमी २ ते ३ तास आधी खा. यामुळे शरीराला अन्न पचायला व्यवस्थित वेळ मिळतो.
Web Summary : Tamannaah Bhatia's trainer advises avoiding fried, high-fiber, and sugary foods before workouts. Opt for bananas, oats, peanut butter, boiled potatoes, yogurt, and fruits for sustained energy and better results.
Web Summary : तमन्ना भाटिया के ट्रेनर ने वर्कआउट से पहले तला हुआ, उच्च फाइबर और शर्करा युक्त भोजन खाने से बचने की सलाह दी है। बेहतर परिणाम के लिए केला, ओट्स, पीनट बटर, उबले आलू, दही और फल चुनें।