सध्याच्या स्थितीत वजन कमी (Weight Loss) करणं ही एक मोठी समस्या आहे. बऱ्याच लोकांची तक्रार असते की अनेक उपाय करून ही वजन नियंत्रणात ठेवता येत नाही. तुम्हीसुद्धा त्यापैकीच असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. प्रसिद्ध योग गुरू आणि लेखक हंसाजी योगेंद्र यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी काही खास टिप्स सांगितल्या आहेत. या टिप्स वापरून तुमचं वजन सहज कमी होण्यास मदत होईल. (What Is The Best Morning Routine For Weight Loss Know From Hansaji Yogendra)
शरीराची चरबी कशी कमी कराल?
डॉक्टर हंसाजी सांगतात की जर तुम्ही रोज सकाळी १ सोपं रूटीन फॉलो केलं तर शरीरात बदल दिसून येऊ शकतात. योग गुरूंच्यामते प्रत्येक सकाळी शरीर २४ तासांचा वेळ आपल्याला देतं. या वेळेत जर तुम्ही चांगल्या सवयींचा अवलंब केला तर वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.
डॉक्टर हंसाजी सांगतात की सकाळी लवकर उठल्यानंतर वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं पाऊल म्हणजे सुर्य उगवण्यासोबतच आपल्या शरीराचे सर्केडीयन रिदम सुरू होते. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म चांगला राहतो. भूक नियंत्रणात राहते तसंच फॅट बर्न होण्याची प्रक्रिया वेगानं होते.
सकाळी ४ ते ६ वाजता शरीराचे नॅच्युरल हॉर्मोन कोर्टिसोल एक्टिव्ह होते. यावेळी उठल्यानं इंसुलिन सेंसिटिव्हिटी चांगली राहते तसंच बीएमआय कमी होतो. याशिवाय रात्री लवकर झोपण्याची सवयही लावायला हवी.
सकाळच्या उन्हात जा
सकाळी उठल्यानंतर २ ते ३ मिनिटं उन्हात बसा. सकाळी ऊन लेप्टीन, घ्रेलिन आणि मेलाटोनिन हॉर्मोन्सना बॅलेन्स करते. लेप्टिन पोट भरल्याचे संकेत देते. घ्रेलिन भूक वाढवणारा हॉर्मोन असतो आणि मेलाटोनोनिन झोपेचा. अनेक अभ्यासांमधून असं दिसून आलं आहे की ३ हॉर्मोन्स कंट्रोल केल्यानं तुमचं वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. ज्यामुळे तुमचा कॅलरी इन्टके १० ते १५ टक्के कमी होतो.
दिवसभराच्या खाण्याचं प्लॅनिंग करा
हंसाजी सांगतात की दिवसभरात लोक काही ना काही खात असतात ज्यामुळे वजन वाढतं. अशा स्थितीत जर तुम्ही सकाळीच दिवसभराच्या खाण्याची प्लॅनिंग केली तर तुमचा कॅलरी इन्टेक कमी होईल आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
