आजकाल लोक फिट राहण्यासाठी जिममध्ये तासनतास घाम गाळत आहेत आणि त्यासाठी ते जिम ट्रेनरलाही खूप पैसे देत आहेत. तुम्ही एक रुपयाही खर्च न करता तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या रुटीनमध्ये चालण्याचा समावेश करावा लागेल. पण तुम्हाला फिटनेससाठी चालण्याची योग्य पद्धत आणि त्याचे फायदे माहित असणं आवश्यक आहे.
चालण्याची योग्य पद्धत कोणती?
हळू चालण्याऐवजी वेगाने चालणे
जर तुम्ही हळू चालत असाल तर ते तितकंस प्रभावी ठरणार नाही, विशेषतः वजन कमी करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही १ मिनिटात किमान ८०-१०० पावलं चाललं पाहिजेत.
३० ते ४५ मिनिटं चाला
यामुळे तुमचा हार्ट रेट वाढतो, कॅलरीज वेगाने बर्न होतात आणि शरीराला शेप येतो. याशिवाय, तुम्ही कमीत कमी ३० ते ४५ मिनिटं चालण्याचा प्रयत्न करावा आणि या काळात घाम गाळावा, तरच हे तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेसाठी खूप फायदेशीर आहे.
कोणत्या वेळी चालायचं?
- जर तुम्हाला असं वाटत असेल की, कोणत्याही वेळी चालण्याने तुमचं वजन कमी होईल किंवा तुमचे फिटनेसचे ध्येय साध्य होईल, तर तुम्ही चुकीचे आहात. कारण चालण्यासाठी योग्य वेळ निवडणं महत्त्वाचं आहे.
- जर तुम्ही सकाळी उपाशी पोटी चाललात तर तुमच्या शरीरात जमा झालेले फॅट्स एनर्जीमध्ये बदलतात आणि फॅट बर्निंग प्रोसेस देखील वेगाने होते.
- जर तुम्ही दुपारचं जेवण केल्यानंतर चालायला गेलात तर ते पचन आणि मेटाबॉलिज्म सुधारतं.
- रात्रीच्या जेवणानंतर चालायला जाण्याने तुमच्या शरीरात फॅट स्टोर होत नाहीत.
- इनक्लाइन वॉकिंग तुमच्या आरोग्यासाठी देखील चांगलं ठरू शकतं. यामुळे तुमचे वजन कमी करण्याची प्रक्रिया देखील सोपी होऊ शकते.
- आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी दररोज किमान १०,००० पावलं चालली पाहिजेत.
- ऑफिसमध्ये लिफ्ट घेण्याऐवजी, पायऱ्या चढा. तुम्ही दररोज तुमच्या पावलांची संख्या पूर्ण करत आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी स्मार्टवॉच किंवा मोबाईलची मदत घ्या.