सोशल मीडियावर गेल्या काही महिन्यांपासून ६-६-६ वॉकिंग चॅलेंज व्हायरल होत आहे. वजन कमी करण्यासाठी याचा वापर केला जात असल्याने हे वॉकिंग चॅलेंज नेमकं काय आहे आणि यामुळे खरंच वेट लॉस होतो का? असा प्रश्न आता लोकांना पडला आहे. या चॅलेंजनुसार, एखाद्या व्यक्तीला ६ दिवस दररोज ६ किलोमीटर चालावं लागतं आणि हे सलग ६ आठवडे चालू ठेवावं लागतं. याबाबत अधिक जाणून घेऊया...
६-६-६ वॉकिंग चॅलेंज काय आहे?
- ६-६-६ वॉकिंग चॅलेंजची संकल्पना खूप सोपी आहे. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान ६ किलोमीटर चालणं आणि ते ६ आठवडे हे सतत चालू ठेवणं.
- बरेच लोक सोशल मीडियावर त्यांच्या रिझल्टचे फोटो शेअर करत आहेत, ज्यामुळे ते अधिक व्हायरल होत आहे.
यावर डॉ. बिमल छाजेड म्हणतात की, चालणं हा एक उत्तम मार्ग आहे, कारण त्यामुळे अनेक आजार टाळता येतात. त्यांचं मत आहे की, जे लोक नियमितपणे चालणं स्वीकारतात ते दीर्घकाळ निरोगी राहतात. मात्र या चॅलेंजचा सर्वांना फायदा होईलच असं नाही.
वॉकिंग चॅलेंजचे फायदे
- तुम्हाला दररोज ६ किलोमीटर चालावं लागतं. तुम्ही हे सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता.
- नियमित चालण्याने मेटाबॉलिज्म वेगाने होतं, ज्यामुळे लवकर फॅट बर्न होतात.
- चालल्यामुळे मूड चांगला होतो आणि स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात.
- ज्यांना लवकर वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हे चॅलेंज देखील सोपं आहे.
हे प्रत्येकासाठी योग्य आहे का?
जर तुमचे पाय दुखत असतील किंवा इतर कोणतीही आरोग्य समस्या असेल तर खूप वेळ चालणं तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतं. फक्त या ६-६-६ वॉकिंग चॅलेंजवर अवलंबून राहून वजन लवकर कमी होईल अशी अपेक्षा करणं अत्यंत चुकीचं आहे. चालण्यासोबतच आहाराची नीट काळजी घेणं आवश्यक आहे. पण जर तुम्हाला फिट राहण्यासाठी सोपा व्यायाम सुरू करायचा असेल तर हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.