Lokmat Sakhi >Fitness > रक्ताच्या कमतरतेनं अशक्तपणा, थकवा येतो? रक्त वाढवतील १० पदार्थ, हाडं राहतील बळकट

रक्ताच्या कमतरतेनं अशक्तपणा, थकवा येतो? रक्त वाढवतील १० पदार्थ, हाडं राहतील बळकट

Top Iron Rich Foods : शरीरात लोह, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे आपले हिमोग्लोबिन पातळी कमी होते, ज्यामुळे आपल्याला थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 09:24 AM2022-07-15T09:24:00+5:302022-07-15T12:42:27+5:30

Top Iron Rich Foods : शरीरात लोह, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे आपले हिमोग्लोबिन पातळी कमी होते, ज्यामुळे आपल्याला थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.

Top Iron Rich Foods : Top 10 iron rich foods to boost hemoglobin | रक्ताच्या कमतरतेनं अशक्तपणा, थकवा येतो? रक्त वाढवतील १० पदार्थ, हाडं राहतील बळकट

रक्ताच्या कमतरतेनं अशक्तपणा, थकवा येतो? रक्त वाढवतील १० पदार्थ, हाडं राहतील बळकट

जर तुमच्या रक्तात लोहाची कमतरता असेल तर तुमच्या शरीराला अनेक आजार होऊ शकतात. त्यामुळे शरीर कमकुवत होऊ शकते. लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होऊ शकतो. (Blood Deficiency) शरीरात लोह, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे आपले हिमोग्लोबिन पातळी कमी होते, ज्यामुळे आपल्याला थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. (Iron deficiency anemia)

कमी हिमोग्लोबिन पातळीमुळे देखील आपल्या मूत्रपिंडात समस्या उद्भवू शकतात. मात्र, तुमच्या आहारात अशा अनेक गोष्टी वाढवून तुम्ही हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढू शकता. (How to increase hemoglobin) तुमच्या आहारात कोशिंबीर, हिरव्या भाज्या, फळे आणि काजू यांचा समावेश करून लोहाची कमतरता भरून काढता येते. (Top 10 iron rich foods to boost hemoglobin)

मेडिकल न्यूज टु डे च्या रिपोर्टनुसार  खाद्यपदार्थ किंवा पूरक पदार्थांमध्ये लोहाचे सेवन करणे महत्त्वाचे आहे, परंतु   शरीरानं ते लोह शोषण्यास मदत केली पाहिजे. लिंबूवर्गीय फळे, स्ट्रॉबेरी आणि हिरव्या पालेभाज्या यांसारखे व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ, लोह शोषून घेण्याचे प्रमाण वाढवू शकतात. व्हिटॅमिन सी सप्लीमेंट घेणे देखील मदत करू शकते. व्हिटॅमिन ए आणि बीटा-कॅरोटीन शरीराला लोह शोषून घेण्यास आणि वापरण्यात मदत करू शकतात.

१) बीटरूटच्या सेवनाने हिमोग्लोबिन वाढते. यासोबतच बीटची पाने खाल्ल्यास जास्त लोह मिळते. त्याच्या पानांमध्ये बीटरूटपेक्षा तिप्पट लोह असते.

२) आवळा आणि जांभळाचा रस समान प्रमाणात मिसळून प्यायल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते.

३) पिस्त्यामध्ये 30 विविध प्रकारचे जीवनसत्त्वे आढळतात. त्यात लोह देखील भरपूर आहे.

घरात माणसं किती, तेल किती वापरता? स्वयंपाकासाठी वापरा ‘हे’ तेल वापरलं, हृदयाचे आजार राहतील दूर

४) लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढते.

५) मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी याशिवाय डाळिंबात लोहाचे प्रमाणही चांगले असते. एक ग्लास कोमट दुधात दोन चमचे डाळिंबाची पावडर टाकून प्यायल्याने हिमोग्लोबिन वाढू शकते.

६) ऍनिमियासारख्या आजारात सफरचंद खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढते.

७) हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास पालक सेवन केल्याने शरीरातील त्याची कमतरता पूर्ण होते. पालकामध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते.

८) मनुका रक्त निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता पूर्ण करते. लोहाने समृद्ध असलेल्या कोरड्या काळ्या मनुका खाऊन तुम्ही तुमचे हिमोग्लोबिन वाढवू शकता.

रोज कमीतकमी ‘इतकी’ पाऊलं चालली तर शुगर कमी होते, डायबिटीस कमी करण्यासाठी ७ टिप्स

९) व्हिटॅमिन ए, बी1, बी2, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅंगनीज, सोडियम, पोटॅशियम आणि क्लोरीन अंजीरमध्ये आढळतात. रात्री दोन अंजीर पाण्यात भिजवून, सकाळी त्याचे पाणी पिऊन अंजीर खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढू शकते.

१०) केळीचे किंवा आवळ्याच्या रसाचे सेवन केल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढू शकते.

Web Title: Top Iron Rich Foods : Top 10 iron rich foods to boost hemoglobin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.