Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Fitness > वयाच्या पन्नाशीत दिसते २० वर्षांची, चित्रांगदा सिंह रोज पिते काळ्या दाण्यांचे पाणी, म्हणते फॅन्सी डाएट नको...

वयाच्या पन्नाशीत दिसते २० वर्षांची, चित्रांगदा सिंह रोज पिते काळ्या दाण्यांचे पाणी, म्हणते फॅन्सी डाएट नको...

tips and tricks Chitrangada Singh beauty secret : Chitrangada Singh reveals beauty tips : Chitrangada Singh cumin water secret : बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह पन्नाशीतही फिट, एनर्जेटिक आणि तितकीच ग्लोइंग दिसते कारणं करते १ खास उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2026 22:22 IST2026-01-16T15:00:00+5:302026-01-16T22:22:30+5:30

tips and tricks Chitrangada Singh beauty secret : Chitrangada Singh reveals beauty tips : Chitrangada Singh cumin water secret : बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह पन्नाशीतही फिट, एनर्जेटिक आणि तितकीच ग्लोइंग दिसते कारणं करते १ खास उपाय...

tips and tricks Chitrangada Singh beauty secret Chitrangada Singh reveals beauty tips Chitrangada Singh cumin water secret | वयाच्या पन्नाशीत दिसते २० वर्षांची, चित्रांगदा सिंह रोज पिते काळ्या दाण्यांचे पाणी, म्हणते फॅन्सी डाएट नको...

वयाच्या पन्नाशीत दिसते २० वर्षांची, चित्रांगदा सिंह रोज पिते काळ्या दाण्यांचे पाणी, म्हणते फॅन्सी डाएट नको...

बॉलिवूडमधील सर्वात 'क्लासी' आणि फिट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे चित्रांगदा सिंह. वयाची पन्नाशी जवळ आली असूनही तिचा फिटनेस आणि चेहऱ्यावरचा ग्लो पाहून आजही कोणालाही विश्वास बसणार नाही. अनेक अभिनेत्री महागड्या स्किन ट्रीटमेंट्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे जिम, फॅन्सी डाएटवर लाखो रुपये खर्च करतात, पण चित्रांगदाच्या सौंदर्याचे आणि फिटनेसचे सिक्रेट तिच्या किचनमधील एका साध्या पदार्थात दडलेले आहे. चित्रांगदा तिची त्वचा, घनदाट केस आणि फिगर मेंटेन्ड ठेवण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक खास ड्रिंक न चुकता आवर्जून पिते. हे साधे घरगुती ड्रिंक तिच्यासाठी एखाद्या जादू प्रमाणेच काम करते(tips and tricks Chitrangada Singh beauty secret).

चित्रांगदा सिंहने (Chitrangda Singh) आपल्या सौंदर्याने आणि फिटनेसने सर्वांनाच भुरळ घातली आहे. वयाची पन्नाशी जवळ आली असूनही चित्रांगदा आजही विशीतल्या अभिनेत्रींना टक्कर देते. बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह. वयाच्या पन्नाशीतही फिट, एनर्जेटिक आणि तितकीच ग्लोइंग दिसते. तिची सडपातळ फिगर, निरोगी त्वचा ( Chitrangada Singh reveals beauty tips) आणि मजबूत केस पाहून अनेकांना प्रश्न पडतो की, हे सिक्रेट नेमकं आहे तरी काय? महागडे सप्लिमेंट्स किंवा फँन्सी डाएट नव्हे, तर चित्रांगदाच्या सकाळच्या डेली रुटीनमध्ये एक अतिशय साधासुदा आणि घरगुती उपाय करते, जो आपणही (Chitrangada Singh cumin water secret) अगदी घरच्याघरीच सहज रोज करू शकतो. 

बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह स्वतःला फिट आणि मेंटेन्ड ठेवण्यासाठी करते देसी उपाय... 

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री चित्रांगदा सिंह आजही तितकीच तरुण आणि फिट दिसते. तिने नुकतेच एका इंटरव्ह्यू दरम्यान खुलासा केला आहे की, महागड्या ट्रिटमेंट्सपेक्षा एका साध्या घरगुती उपायामुळे तिचे सौंदर्य टिकून आहे. चित्रांगदाच्या मते, दररोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने तिची त्वचा आणि केस कमालीचे सुंदर झाले आहेत. हा एकदम छोटा आणि सोपा बदल तिच्यासाठी खरोखरच 'मॅजिक ड्रिंक' ठरला आहे. 

चित्रांगदा सिंहच्या मते, जिऱ्याचे पाणी हे केवळ सौंदर्यासाठी नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी उत्तम आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दररोज जिऱ्याचे पाणी प्यायल्याने केवळ केस आणि त्वचाच निरोगी राहते असे नाही, तर नखांपासून ते रोगप्रतिकारक शक्तीपर्यंत सर्वच गोष्टी मजबूत होतात. अभिनेत्री चित्रांगदा सिंह सांगते की, ती गेल्या २ वर्षांपासून जिऱ्याचे पाणी रोज सकाळी उठल्या - उठल्या उपाशी पोटी न चुकता पिते आणि त्याचा चांगला परिणाम तिला स्वतःला अनुभवायला मिळत आहे.

चित्रांगदा सिंह 'जिऱ्याचेच पाणी' का पिते ?

जिरे हे आयुर्वेदात पचन सुधारण्यासाठी, सूज कमी करण्यासाठी आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी वापरला जाणारा उत्तम आणि गुणकारी असा मसाल्याचा पदार्थ आहे. जिऱ्याचे पाणी शरीराला आतून हलकं ठेवण्यास आणि नैसर्गिक संतुलन राखण्यास मदत करतं. वय वाढत असताना मेटाबॉलिझम मंदावतो, वजन वाढू लागतं, त्वचा कोरडी पडते आणि केसगळतीची समस्या वाढते. अशावेळी शरीराला आतून डिटॉक्स करणं खूप गरजेचं असतं. चित्रांगदा सिंग यासाठीच दररोज न चुकता, आवर्जून जिऱ्याचे पाणी पिण्यावर भर देते.

स्पेशल मॅजिक ट्रिक! केसांच्या समस्यांनुसार आवळ्याच्या रसात मिसळून ७ पदार्थ लावा, रुक्ष निस्तेज केस चमकू लागतील...

जिऱ्याचे पाणी कसं तयार करायचं ?

जिऱ्याचे पाणी तयार करणे अत्यंत सोपे आहे. रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून घ्या आणि थोडे कोमट करा. चव आणि अधिक फायद्यांसाठी तुम्ही यामध्ये लिंबाचे काही थेंब देखील टाकू शकता. त्यानंतर हे ड्रिंक रिकाम्या पोटी चहाप्रमाणे हळूहळू प्या.

त्वचेवर येईल काचेसारखा लखलखता ग्लो फक्त ५ रुपयांत! पार्लरचे हजारो रुपये वाचतील - त्वचा दिसेल ग्लोईंग...

खरंच की काय? करण जोहर सांगतो ‘ऑझेम्पिक’ नव्हे, भात-बटाटे खाऊनच ‘असं’ केलं वजन कमी...

जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे... 

१. दररोज जिऱ्याचे पाणी प्यायल्याने नखांचे आरोग्य सुधारते आणि ती मजबूत होतात.

२. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. 

३. जिऱ्यामध्ये लोह, मॅग्नेशियम, फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. याव्यतिरिक्त, जिरे हे व्हिटॅमिन सी, ए आणि ई सोबतच कॅल्शियमचा देखील एक उत्तम स्रोत आहे.

४. जिऱ्याच्या पाण्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन 'सी' असते, जे तुम्हाला वारंवार आजारी पडण्यापासून बचाव करते. हे पाणी प्यायल्याने घशातील खवखव, इन्फेक्शन, सर्दी-खोकला यांसारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते. म्हणजेच, ज्या लोकांना वारंवार सर्दी-खोकला किंवा डोकेदुखीचा त्रास होतो, त्यांच्यासाठी हे ड्रिंक फायदेशीर ठरते.


Web Title : चित्रांगदा सिंह का राज: जवां त्वचा के लिए जीरे का पानी।

Web Summary : पचास के करीब चित्रांगदा सिंह अपनी जवां चमक और फिटनेस का श्रेय जीरे के पानी को देती हैं। वह इसे रोजाना खाली पेट पीती हैं, महंगे डाइट से बचती हैं। यह सरल पेय पाचन में मदद करता है, सूजन कम करता है, और विषहरण करता है, जिससे स्वस्थ त्वचा, बाल और प्रतिरक्षा को बढ़ावा मिलता है।

Web Title : Chitrangada Singh's secret: Cumin water for youthful skin and fitness.

Web Summary : Chitrangada Singh, nearing fifty, credits cumin water for her youthful glow and fitness. She drinks it daily on an empty stomach, avoiding fancy diets. This simple drink aids digestion, reduces inflammation, and detoxifies, promoting healthy skin, hair, and immunity.