lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > ६२ व्या वर्षी तरूण-हॉट दिसणारा सुनिल शेट्टी खातो तरी काय? पाहा साधं-सोपं फिटनेस रूटीन

६२ व्या वर्षी तरूण-हॉट दिसणारा सुनिल शेट्टी खातो तरी काय? पाहा साधं-सोपं फिटनेस रूटीन

Sunil Shetty's Fitness Secret : सुनिल काय खातात, कोणता वर्कआऊट करतात ते समजून घेऊ.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 10:06 PM2024-04-07T22:06:38+5:302024-04-07T22:14:42+5:30

Sunil Shetty's Fitness Secret : सुनिल काय खातात, कोणता वर्कआऊट करतात ते समजून घेऊ.

Sunil Shetty's Fitness Routine Know Sunil Shetty Fitness Secrets Eat A lot of Rice | ६२ व्या वर्षी तरूण-हॉट दिसणारा सुनिल शेट्टी खातो तरी काय? पाहा साधं-सोपं फिटनेस रूटीन

६२ व्या वर्षी तरूण-हॉट दिसणारा सुनिल शेट्टी खातो तरी काय? पाहा साधं-सोपं फिटनेस रूटीन

अभिनेते सुनिल शेट्टी (Sunil Shetty) अभिनयाप्रमाणेच आपल्या फिटनेसमुळे कायम चर्चेत असतात. सुनिल शेट्टी यांचे अनेक फॅन्सस आहे. सोशल मीडियावर चाहते नेहमीच सुनिल यांचे फिटनेस व्हिडिओज आवडीने पाहत असतात.  कायम तरूण आणि हेल्दी राहण्यासाठी अभिनेते काय करतात अशी उत्सुकता प्रत्येकाच्यात मनात असते. फिटनेस सिक्रेटमध्ये नक्की कशाचा समावेश आहे. सुनिल काय खातात, कोणता वर्कआऊट करतात ते  समजून घेऊ. (Sunil Shetty's Fitness Routine Know Sunil Shetty Fitness Secrets Eat A lot of Rice)

सुनिल शेट्टींचे वर्कआऊट रूटीन कसे असते? (Sunil Shettty Fitness Routine)

सुनील सकाळी ५ वाजता उठून २ तास व्यायाम करतात. त्याआधी १ तास योगा आणि प्राणायम करतात आणि त्याच्या  ४५ मिनिटांनंतर जिममध्ये व्यायाम करतात.  सुरूवातीला त्यांनी सांगितलं होतं की त्यांना जीमला जायला फारसं आवडत नाही. अशावेळी ते पुलअप्स, पुशअप्स, सुर्य नमस्कार,  दंड बैठक आणि योगाव्यतिरिक्त इतर वेगवेगळे व्यायाम करतात.  इतकंच नाही तर मार्शल आर्ट्सही करतात. 

सुनिल शेट्टींचे डाएट कसे असते?  (Sunil Shettty's Diet)

सुनिल शेट्टी आपल्या डाएटमध्ये प्रत्येक पदार्थांचा समावेश करतात. आलू पराठा, पुरी भाजी, भात, डाळ हे पदार्थ आारात असावेत पण  योग्य प्रमाणातच याचेसेवन करा. सुनिल शेट्टी आपल्या दिवसाची सुरूवात भातापासून करतात.  त्यांचे म्हणणे आहे की यात जास्त कॅलरीज  असतात म्हणून जेवणातून वगळण्याची गरज नाही. भातात व्हिटामीन बी चे प्रमाण जास्त असते. सुनिल शेट्टी प्रोटीन शेक आणि सप्लिमेंट्स घेणं पसंत करतो.

जंक फूड जास्त खायला त्यांना आवडत नाही. प्रोटीन शेक्स आणि सप्लिमेंटसही घ्यायला आवडत नाही. जंक फूड पासून लांब राहतात. काही लोक तांदूळ शिजवताना त्यावर तूप घालतात. तांदूळ  तेल आणि बटरबरोबर फ्राय करता. असं न करता तांदूळ सोप्या पद्धतीने शिजवा.  तांदूळात पाण्याचे प्रमाण  जास्त असेल तर  ते काडून त्यातलं स्टार्च काढून टाका. 

डाएटिंग नाही संतुलित आहार गरजेचा

सुनिल शेट्टीने एका मुलाखतीत सांगितलं की लठ्ठपण कमी करण्याबाबत लोकांच्या मनात  अनेक समज  गैरसमज आहे. फिट होण्यासाठी लोक पैसेही घालवतात. पण फिट राहण्यासाठी काही खास करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही संतुलित आहार घेऊन स्वत:ला फिट ठेवू शकता.

Web Title: Sunil Shetty's Fitness Routine Know Sunil Shetty Fitness Secrets Eat A lot of Rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.