Join us

शिल्पा शेट्टी करते एक उपाय, चेहऱ्यावर चमक-फिगर मेण्टेन! चाळिशीतही दिसतेय हॉट कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2025 20:09 IST

Shilpa Shetty’s Beauty Secret For Glowing Skin & Slim Figure : Shilpa Shetty glowing skin tips : Shilpa Shetty fitness secrets : शिल्पा शेट्टी करते वर्षानुवर्षे 'हा' उपाय! म्हणून दिसते ग्लोइंग स्किन व टोन्ड फिगर - पाहा तिचे ब्यूटी सिक्रेट...

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी फक्त आपल्या अभिनयासाठीच नाही, तर तिच्या फिटनेस आणि नैसर्गिक सौंदर्यासाठीही अधिक जास्त ओळखली जाते. शिल्पा स्वतःला फिट आणि त्वचेला ग्लोइंग ठेवण्यासाठी घरगुती उपायांवर अधिक भर देते. वयाच्या चाळीशीनंतरही तिची टोन्ड फिगर आणि चेहऱ्यावरील हेल्दी स्किन  ग्लो पाहून अनेकजणींना तिच्यासारखं ( Shilpa Shetty fitness secrets) दिसण्याची इच्छा होते. मात्र यासाठी महागड्या प्रॉडक्ट्स किंवा (Shilpa Shetty glowing skin tips) जिममध्ये तासंतास घालवण्याची गरज नाही. काही अत्यंत साधेसोपे घरगुती उपायही शिल्पासारखी फिटनेस आणि स्किन ग्लो मिळवण्यासाठी खूपच फायदेशीर ठरु शकतात. चाळिशी उलटली तरी वजन नियंत्रणात, ग्लोइंग त्वचा आणि उत्साही व्यक्तिमत्त्व, टोन्ड फिगरमुळे शिल्पा शेट्टीचा फिटनेस मंत्र अनेकजणींना आकर्षित करतो(Shilpa Shetty’s Beauty Secret For Glowing Skin & Slim Figure).  

शिल्पाची चमकती त्वचा आणि टोन्ड फिगर पाहून कोणालाही तिच्यासारखं दिसण्याची इच्छा होते. पण हे शक्य आहे, तेही अगदी घरच्या घरीच! काही घरगुती आणि पारंपरिक उपाय आहेत जे तुमच्या शरीराला आणि त्वचेला नैसर्गिकरित्या आरोग्यदायी बनवू शकतात. स्वतः फिट व सुंदर दिसण्यासाठी शिल्पा नेमकं काय करते ते पाहूयात... 

स्किन ग्लो व फिटनेससाठी शिल्पा करते 'हा' खास घरगुती उपाय... 

शिल्पा प्रमाणेच ग्लोइंग स्किन व उत्तम फिटनेससाठी जिम किंवा डाएटवर मोठा खर्च करण्याची गरज नाही. आपल्या स्वयंपाकघरातच काही असे सोपे उपाय दडलेले असतात, जे तुमच्या सौंदर्यात अधिक चांगले आणू शकतात. pooja.real.remedies या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शिल्पा शेट्टीच्या ग्लोइंग स्किन व उत्तम फिटनेससाठी ती वर्षानुवर्षे करत असलेला खास घरगुती उपाय सांगितला आहे. शिल्पा करत असलेला घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला ग्लासभर कोमट पाणी, १/२ टेबलस्पून हळद, चिमूटभर काळीमिरी पूड आणि १ टेबलस्पून साजूक तूप इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

उपाय नेमका काय आहे ?

सगळ्यांत आधी एक भांड्यात ग्लासभर पाणी घेऊन ते हलकेच एक उकळी काढून गरम करून घ्या. हे गरम पाणी ग्लासात ओता त्यानंतर या गरम पाण्यांत चमचाभर साजूक तूप, चिमूटभर काळीमिरी पूड आणि १/२ टेबलस्पून हळद घालावी. हे सगळे मिश्रण चमच्याने हलवून पाण्यांत मिसळून घ्यावे. असे पाणी रोज सकाळी उपाशी पोटी प्यावे. यामुळे तुमची स्किन ग्लोइंग व फिगर टोन्ड दिसण्यांत मदत होऊ शकते. 

हे पाणी पिण्याचे फायदे... 

१. हळद :- हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेला नैसर्गिकरित्या उजळ बनवतात आणि शरीरातील सूज कमी करतात.

२. काळीमिरी पूड :- काळीमिरी मेटाबॉलिझमचा वेग वाढवते, त्यामुळे चरबी वेगाने कमी होण्यास मदत होते आणि वजन नियंत्रणात राहतं.

३. साजूक तूप :- साजूक तूप आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवून पचन सुधारते आणि त्वचेला आतून पोषण देऊन हेल्दी आणि ग्लोइंग बनवते.

टॅग्स :फिटनेस टिप्सशिल्पा शेट्टीआरोग्यहेल्थ टिप्सत्वचेची काळजीवेट लॉस टिप्स