Lokmat Sakhi >Fitness > राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?

राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?

चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे जो प्रत्येकजण सहजपणे करू शकतो. पण तुम्ही कधी 'पिरॅमिड वॉक'बद्दल ऐकलं आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 18:51 IST2025-07-07T18:46:35+5:302025-07-07T18:51:53+5:30

चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे जो प्रत्येकजण सहजपणे करू शकतो. पण तुम्ही कधी 'पिरॅमिड वॉक'बद्दल ऐकलं आहे का?

pyramid walking for weight loss fitness expert recommends of this exercise belly fat | राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?

राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?

लोक दिवसाची सुरुवात मॉर्निंग वॉकने करतात. सकाळची ताजी हवा फक्त मनाला आराम देत नाही तर हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगली असते आणि वजन कमी करण्यास देखील मदत होते. चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे जो प्रत्येकजण सहजपणे करू शकतो. पण तुम्ही कधी 'पिरॅमिड वॉक'बद्दल ऐकलं आहे का?

पिरॅमिड वॉकिंग हा एक विशेष प्रकारे चालण्याचा व्यायाम आहे, ज्यामध्ये तुम्ही हळूहळू चालण्यास सुरुवात करता, नंतर हळूहळू तुमचा वेग वाढवता आणि नंतर जेव्हा तुम्ही सर्वात वेगवान गती गाठता तेव्हा तेथून हळूहळू तुमचा वेग कमी करता. अशा प्रकारे चालण्यास २० ते २५ मिनिटं लागू शकतात. यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या फिटनेस लेव्हलनुसार वेग आणि वेळ वाढवू किंवा कमी करू शकता.

 

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पिरॅमिड वॉकिंगमध्ये तुम्ही कधी हळू चालता, कधी थोडे हळू आणि कधी वेगवान. या प्रकारच्या चालण्यामुळे स्नायू सक्रिय होतात आणि संपूर्ण शरीर सक्रिय राहतं. यामुळे हृदयाची गती वाढते, जास्त कॅलरीज बर्न होतात आणि कालांतराने तुमचा स्टॅमिना सुधारतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या व्यायामामुळे सांध्यावर जास्त ताण पडत नाही, त्यामुळे वृद्ध लोक देखील ते सहजपणे करू शकतात.

'पिरॅमिड वॉक' करण्यापूर्वी, ५ मिनिटांचा वॉर्म-अप करा. यानंतर, पहिली २ मिनिटं थोडं हळू चालत जा, नंतर तुमच्या क्षमतेनुसार पूर्ण गती येईपर्यंत दर २ मिनिटांनी तुमचा वेग थोडा वाढवा. त्यानंतर दर २ मिनिटांनी तुमचा वेग कमी करायला सुरुवात करा. शेवटी ५ मिनिटांच्या हळू चालण्याने ते पूर्ण करा. यानंतर, तुमचे शरीर थोडे स्ट्रेस करा. 

 

तज्ज्ञ म्हणतात की, पिरॅमिड वॉक हा वजन कमी करण्याचा सर्वोत्तम आणि सोपा मार्ग आहे. आधी तुम्ही हळू हळू चालता, नंतर तुमचा वेग वाढवा आणि नंतर पुन्हा हळू चालता, तेव्हा तुमचे शरीर सामान्य चालण्यापेक्षा जास्त काम करतं. या चालण्यामुळे तुमच्या कॅलरीज वेगाने बर्न होतात आणि बारीक होण्यास, वजन कमी करण्यास मदत होते. 
 

Web Title: pyramid walking for weight loss fitness expert recommends of this exercise belly fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.