lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > सोनेरी पाण्यात दडलंय मलायकाचं फिटनेस सिक्रेट! तजेलदार त्वचा हवी? तर पाण्यात मिसळा २ गोष्टी

सोनेरी पाण्यात दडलंय मलायकाचं फिटनेस सिक्रेट! तजेलदार त्वचा हवी? तर पाण्यात मिसळा २ गोष्टी

Malaika Arora's 2-Ingredient Weight Loss & Detox Drink : मलायकाने सांगितलं पन्नाशीतही फिट-यंग दिसण्यामागचं रहस्य; एक डिटॉक्स ड्रिंक प्या आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2024 02:48 PM2024-04-02T14:48:13+5:302024-04-02T14:49:14+5:30

Malaika Arora's 2-Ingredient Weight Loss & Detox Drink : मलायकाने सांगितलं पन्नाशीतही फिट-यंग दिसण्यामागचं रहस्य; एक डिटॉक्स ड्रिंक प्या आणि..

Malaika Arora's 2-Ingredient Weight Loss & Detox Drink | सोनेरी पाण्यात दडलंय मलायकाचं फिटनेस सिक्रेट! तजेलदार त्वचा हवी? तर पाण्यात मिसळा २ गोष्टी

सोनेरी पाण्यात दडलंय मलायकाचं फिटनेस सिक्रेट! तजेलदार त्वचा हवी? तर पाण्यात मिसळा २ गोष्टी

बॉलीवूड अभिनेत्री आणि उत्तम डान्सर मलायका अरोराचं फिटनेस पाहून अनेकांना नवल वाटतं (Malaika Arora). मुख्य म्हणजे पन्नाशीत पदार्पण करूनही मलायका तिशीतली वाटते. ती आपल्या फिटनेस आणि आहाराकडे पुरेपूर लक्ष देते (Fitness Tips). वेळोवेळी मलायका आपल्या फिटनेसचे श्रेय योगा व डाएटला देत असते. मलायका सोश्क मिडीयावर सक्रीय असते. ती अनेक डाएट टिप्स फॅन्ससह शेअर करते (Healthy Skin).

मुख्य म्हणजे तिच्या चाहत्यांना मलायका सकाळची सुरुवात कशाने करते? असा प्रश्न पडतो. क्लिन स्किन आणि उत्तम फिटनेससाठी सकाळी उठल्यावर मलायका एक होममेड ड्रिंक पिते. या डिटॉक्स ड्रिंकमुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. या डिटॉक्स ड्रिंकची रेसिपी खुद्द मलायकाने शेअर केली आहे(Malaika Arora's 2-Ingredient Weight Loss & Detox Drink).

मलायकाचा दिवस कसा असतो?

मलायका सांगते, 'मन व शरीराला वेळोवेळी डिटॉक्स करणे गरजेचं आहे. यासाठी सकाळी जिरे- ओवा व मेथीचे एक खास डिटॉक्स ड्रिंक न चुकता घेणे फायद्याचे ठरू शकते. यासह दिवसभरातुन थोडा वेळ काढून व्यायाम करा. यामुळे शरीराला फायदेच फायदे मिळतात. शिवाय या ड्रिंकमुळे स्किन देखील क्लिअर होते.'

या पद्धतीने तयार करा डिटॉक्स ड्रिंक

डिटॉक्स ड्रिंकची रेसिपी मलायकाने सोशल मिडीयावर शेअर केली आहे. यासाठी एका ग्लासमध्ये पाणी घ्या. त्यात अर्धा चमचा मेथी दाणे, अर्धा चमचा जिरे घालून मिक्स करा. आपण त्यात ओवा देखील मिक्स करू शकता. या तिन्ही गोष्टी मिक्स करा. त्यावर रात्रभरासाठी झाकण लावून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या.

उन बाधणारच नाही, प्या ५ घरगुती थंड पेय- पोटावरची चरबी घटेल हा बोनस

शरीरासाठी मेथी दाण्याचे फायदे

​मेथी दाण्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. त्यात सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, विटामिन डी आणि विटामिन सी आढळते. नियमित सकाळी मेथी दाण्याचे पाणी प्यायल्याने पचनशक्ती सुधारण्यासह शरीरातील कमकुवतपणा कमी होतो, आणि हाडंही मजबूत होतात.

मेहनत घेऊनही वजन घटत नाही? सकाळी ४ गोष्टी महिनाभर करा; पोट - मांड्या सगळंच कमी होईल

जिऱ्याचे फायदे

अँटिऑक्सिडंटने समृद्ध जिऱ्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. त्यात लोह देखील असते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारते. यासह पोटाचे विकारही दूर राहतात. 

Web Title: Malaika Arora's 2-Ingredient Weight Loss & Detox Drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.