Lokmat Sakhi >Fitness > मेहनत घेऊनही वजन घटत नाही? सकाळी ४ गोष्टी महिनाभर करा; पोट - मांड्या सगळंच कमी होईल

मेहनत घेऊनही वजन घटत नाही? सकाळी ४ गोष्टी महिनाभर करा; पोट - मांड्या सगळंच कमी होईल

Morning Habits to Help You Lose Weight : जिममध्ये न जाता व्हाल बारीक; वजन कमी करायचे असेल तर रोज सकाळी या गोष्टी करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2024 01:20 PM2024-03-24T13:20:55+5:302024-03-24T13:21:39+5:30

Morning Habits to Help You Lose Weight : जिममध्ये न जाता व्हाल बारीक; वजन कमी करायचे असेल तर रोज सकाळी या गोष्टी करा..

Morning Habits to Help You Lose Weight | मेहनत घेऊनही वजन घटत नाही? सकाळी ४ गोष्टी महिनाभर करा; पोट - मांड्या सगळंच कमी होईल

मेहनत घेऊनही वजन घटत नाही? सकाळी ४ गोष्टी महिनाभर करा; पोट - मांड्या सगळंच कमी होईल

लठ्ठपणा ही जागतिक समस्या बनत चालली आहे (Weight Loss). आजकाल अधिकतर लोक वाढत्या वजनामुळे त्रस्त आहे. बेढब शरीरामुळे फक्त शरीर सुटलेलं दिसत नसून, यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. वजन वाढलं की, मधुमेह, थायरॉईड, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लोक जागरूक होऊन वजन कमी करण्याकडे सकारात्मक पाऊल टाकत आहे (Fitness).

सध्या मार्केटमध्ये वजन कमी करण्याच्या अनेक फंडे उपलब्ध आहेत (Morning Routine for Weight Loss). मेहनत करूनही जेव्हा वजन कमी होत नाही, तेव्हा हिरमोड होतो. वजन कमी करण्याच्या सगळे प्रयत्न करून जर आपण थकला असाल तर, सकाळी वेट लॉस रुटीन फॉलो करून पाहा. या मॉर्निंग वेट लॉस रुटीनमुळे वजन नक्कीच झपाट्याने कमी होईल(Morning Habits to Help You Lose Weight).

सकाळी उठल्यावर पाणी प्या

द हेल्थ साईट. कॉम या वेबसाईटनुसार, वजन कमी करण्यासाठी हायड्रेटेड राहणे खूप महत्वाचे आहे. सकाळी उठल्याबरोबर २ ग्लास कोमट पाणी प्या. जर हवं असल्यास आपण त्यात लिंबाचा रस देखील मिक्स करू शकता. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. जे वजन कमी करण्यास मदत करते. हे पाणी नियमित प्यायल्याने चयापचय क्रिया बुस्ट होते. ज्यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचते.

Holi Special : पुरण सैल-पोळी लाटताना फाटते? शेफ विष्णू मनोहर सांगतात खास ६ टिप्स; पुरणपोळी होतील परफेक्ट-चविष्ट

कोवळ्या उन्हात बसा

सकाळी काही वेळ कोवळ्या उन्हात बसण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी सूर्यप्रकाशात बसल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळते, जे वजन कमी करण्यास मदत करते. अनेक अभ्यासातून असे आढळून आले आहे की, सकाळच्या सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवल्याने केवळ वजन कमी होत नाही तर अनेक आजारही दूर होतात.

व्यायाम करा

सकाळी उठल्यानंतर व्यायाम करणे ही वजन कमी करण्याच्या सर्वोत्तम सवयींपैकी एक आहे. सकाळी व्यायाम केल्याने रक्तातील साखरेची पातळी दिवसभर नियंत्रणात राहते. याशिवाय, सकाळी लवकर व्यायाम केल्याने चयापचय गती सुधारते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

होळी खेळण्याआधी त्वचेवर लावा ३ प्रकारचे तेल; केस आणि त्वचेवर करेल सरंक्षण कवचाप्रमाणे काम

हेल्दी ब्रेकफास्ट करा

न्याहारी हे दिवसाचे सर्वात महत्वाचे जेवण आहे. सकाळच्या नाश्त्यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. वजन कमी करायचे असेल तर प्रथिने आणि फायबर युक्त नाश्ता करायला हवा. मुख्य म्हणजे प्रोटीन आणि फायबरमुळे  भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Web Title: Morning Habits to Help You Lose Weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.