lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > Holi Special : पुरण सैल-पोळी लाटताना फाटते? शेफ विष्णू मनोहर सांगतात खास ६ टिप्स; पुरणपोळी होतील परफेक्ट-चविष्ट

Holi Special : पुरण सैल-पोळी लाटताना फाटते? शेफ विष्णू मनोहर सांगतात खास ६ टिप्स; पुरणपोळी होतील परफेक्ट-चविष्ट

perfect puran poli recipe - maharashtrian pooran poli tips & tricks : पारंपारिक पद्धतीची पुरणपोळी करण्याची सोपी कृती; पुरणपोळी टम्म फुगावी म्हणून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2024 11:12 AM2024-03-24T11:12:40+5:302024-03-24T12:45:20+5:30

perfect puran poli recipe - maharashtrian pooran poli tips & tricks : पारंपारिक पद्धतीची पुरणपोळी करण्याची सोपी कृती; पुरणपोळी टम्म फुगावी म्हणून..

perfect puran poli recipe - maharashtrian pooran poli tips & tricks | Holi Special : पुरण सैल-पोळी लाटताना फाटते? शेफ विष्णू मनोहर सांगतात खास ६ टिप्स; पुरणपोळी होतील परफेक्ट-चविष्ट

Holi Special : पुरण सैल-पोळी लाटताना फाटते? शेफ विष्णू मनोहर सांगतात खास ६ टिप्स; पुरणपोळी होतील परफेक्ट-चविष्ट

होळी (Holi 2024) आणि पुरणाची पोळी (Pooran Poli) हे समीकरण तसं फार जुनं. पुरणपोळी म्हटलं की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पुरणपोळी करण्याच्या अनेक पद्धती आहेत. पण प्रत्येकाला परफेक्ट पुरणपोळी करता येईलच असे नाही. मऊसूत पुरणपोळी करताना बऱ्याचदा लहान-सहान नकळत चुका घडतात. ज्यामुळे पुरण सैल होते, किंवा पोळी लाटताना फाटते. आज सर्वत्र होळी सण साजरा करणायत येईल (Cooking Tips).

जर आपल्याला परफेक्ट पारंपारिक पद्धतीची पुरणपोळी घरीच तयार करायची असेल तर, शेफ विष्णू मनोहर (Vishnu Manohar) यांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करून पाहा (Kitchen Tips). या टिप्सच्या मदतीने पुरणपोळी मनासारखी तयार होईल. शिवाय पूरण सैल आणि पोळी फाटण्याचं टेन्शन उरणार नाही(perfect puran poli recipe - maharashtrian pooran poli tips & tricks).

पुरणपोळी करताना लक्षात ठेवा काही खास टिप्स(How to make Pooran Poli in Marathi)

- पुरणपोळी करण्याची पहिली स्टेप म्हणजे पूरण तयार करणे. आपण सर्वप्रथम चण्याची डाळ शिजत घालतो. पण डाळ शिजत घालण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यात पुन्हा पाणी घालून डाळ अर्धा तासासाठी भिजत ठेवा.

- चण्याची डाळ शक्यतो पितळ्याच्या भांड्यामध्ये शिजवा. शिवाय जास्त पाण्यामध्ये डाळ शिजवू नका.

- पुरणामध्ये आपण वेलची किंवा जायफळ पावडर घालतो. काही लोक मिक्सरच्या भांड्यात वेलची बारीक करून त्याची पावडर तयार करतात. पण मिक्सरच्या भांड्याचा वापर न करता, खलबत्त्यात कुटून पावडर तयार करा, आणि मग पुरणामध्ये मिक्स करा.

- पुरण नेहमी गॅसच्या मध्यम आचेवर तयार करावे. शिवाय मध्येमध्ये ढवळत राहावे. मुख्य म्हणजे पुरण गरम असतानाच वाटून घ्यावे.

- पुरणामध्ये गुळ नेहमी किसून घाला. शिवाय त्यात चवीनुसार मीठ घाला, याने पुरणाची चव वाढेल.

- कणिक भिजत घालताना त्यात तेल आणि मिठाचा वापर करा. शिवाय कणिक व्यवस्थित मळून घ्या. कणिक मळताना सैलसर मळून घ्या, व त्यावर झाकण ठेऊन काही मिनिटासाठी भिजत ठेवा.

अशा प्रकारे आपले पुरण आणि कणिक रेडी होईल, आपण याच्या छान पारंपारिक पद्धतीच्या पुरणपोळ्या तयार करू शकता.

Web Title: perfect puran poli recipe - maharashtrian pooran poli tips & tricks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.