Lokmat Sakhi >Fitness > उन बाधणारच नाही, प्या ५ घरगुती थंड पेय- पोटावरची चरबी घटेल हा बोनस

उन बाधणारच नाही, प्या ५ घरगुती थंड पेय- पोटावरची चरबी घटेल हा बोनस

The 5 Best Weight Loss Drinks : वजन कमी करणारी पेय: या पेयांमुळे उन्हाळ्यात तहान शमते-वजनही घटते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2024 02:32 PM2024-03-28T14:32:33+5:302024-03-28T15:03:31+5:30

The 5 Best Weight Loss Drinks : वजन कमी करणारी पेय: या पेयांमुळे उन्हाळ्यात तहान शमते-वजनही घटते..

The 5 Best Weight Loss Drinks | उन बाधणारच नाही, प्या ५ घरगुती थंड पेय- पोटावरची चरबी घटेल हा बोनस

उन बाधणारच नाही, प्या ५ घरगुती थंड पेय- पोटावरची चरबी घटेल हा बोनस

उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवणे गरजेचं आहे (Weight Loss Drinks). यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणं आवश्यक आहे. पण अनेकांची तहान फक्त पाण्याने भागत नसून, थंड पेयाने भागते. तहान शमवण्यासाठी काही जण साखरयुक्त पेय पितात. सोडा, कोल्डड्रिंक्स या पेयांमुळे शरीराला गारवा तर मिळतो, पण यामुळे शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढते.

शिवाय विविध आजारांना देखील निमंत्रण देते (Fitness). त्यामुळे आकर्षक वाटणारे पेय पिण्यापेक्षा नैसर्गिक पेय प्या. यामुळे फिटनेस आणि फिगर राखण्यास मदत होईल. शिवाय आरोग्यालाही अनेक फायदे मिळतील. कोणते आहेत, ते ५ प्रकारचे नैसर्गिक पेय पाहा(The 5 Best Weight Loss Drinks).

मेथीचे पाणी

रिकाम्या पोटी मेथीचे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. या पेयामुळे तहान तर भागतेच, शिवाय पोट देखील दीर्घकाळ भरलेले राहते. मेथीमध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन सी यांसारखे अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे वेट लॉससाठी मदत होते.

साबुदाणा भिजल्यावर लगदा होतो? खिचडी कढईला चिकटते? ६ सोप्या टिप्स-खिचडी होईल परफेक्ट

काकडी

उन्हाळ्यात बरेच जण काकडी खातात. काकडीमध्ये अँटी-डायबेटिक, अँटी-ऑक्सिडंट्स,  व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के यासह इतर पोषक घटक असतात. ज्यामुळे वेट लॉससाठी पुरेपूर मदत होते. आपण काकडीचा ज्यूस जेवणाआधी पिऊ शकता. यामुळे भूक जास्त लागत नाही. ज्यामुळे  लठ्ठपणाची समस्या कमी होते.

ताक

उन्हाळ्यात अनेकांची पसंती ताककडे वळते. ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फोरस, इत्यादी खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. आपल्यापैकी बरेच जण वजन कमी करण्यासाठी डाएड करतात, जिम लावतात. आपण आपण उन्हाळ्यात ताक पिऊनही वजन कमी करू शकता. शिवाय पचनक्रिया सुधारण्यात आणि आतड्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

घरात पाल दिसली की घाबरुन उड्या मारता? तुरटीचा १ सोपा उपाय, पाली ठोकतील धूम

लिंबू आणि पुदिन्याचा रस

लिंबू आणि पुदिन्याचे पाणी वेट लॉससाठी मदत करते. हे एक डिटॉक्स पेय आहे जे उन्हाळ्यात दररोज सकाळी सेवन केले जाऊ शकते. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. हे करण्यासाठी, लिंबूचे तुकडे करा आणि ते पाण्याच्या बाटलीत ठेवा. सोबत पुदिन्याची पाने टाका आणि रात्रभर ठेवा. सकाळी हे पेय प्या.

सफरचंद आणि दालचिनीचा चहा

साखरेचा चहा पिण्यापेक्षा आपण सफरचंद आणि दालचिनीचा चहा पिऊ शकता. सफरचंदात मुबलक प्रमाणात फायबर असते आणि दालचिनी चयापचय वाढवते. ज्यामुळे वेट लॉस तर होतेच, शिवाय चयापचय क्रियाही सुधारते. यासाठी एका बाटलीमध्ये पाणी, सफरचंदाचे काही तुकडे आणि दालचिनी पावडर घाला. रात्रभर हे पाणी झाकून ठेवा. दुसऱ्या दिवशी हे पाणी प्या.

Web Title: The 5 Best Weight Loss Drinks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.