lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > सतत पाठदुखी? पाठीच्या कण्याला आराम देण्यासाठी मलायका अरोरा सांगतेय एक खास आसन...

सतत पाठदुखी? पाठीच्या कण्याला आराम देण्यासाठी मलायका अरोरा सांगतेय एक खास आसन...

Fitness Tips By Malaika Arora: सारखी पाठ दुखते, बसून- बसून अगदी आखडून जाते. म्हणूनच तर तुमच्या पाठीला रिलॅक्स करण्यासाठी वाचा हा मलायका अरोराचा खास सल्ला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 06:30 PM2022-05-30T18:30:44+5:302022-05-30T18:33:32+5:30

Fitness Tips By Malaika Arora: सारखी पाठ दुखते, बसून- बसून अगदी आखडून जाते. म्हणूनच तर तुमच्या पाठीला रिलॅक्स करण्यासाठी वाचा हा मलायका अरोराचा खास सल्ला...

Malaika Arora suggest chakrasana for reducing back pain and relaxing spine due to wrong sitting position | सतत पाठदुखी? पाठीच्या कण्याला आराम देण्यासाठी मलायका अरोरा सांगतेय एक खास आसन...

सतत पाठदुखी? पाठीच्या कण्याला आराम देण्यासाठी मलायका अरोरा सांगतेय एक खास आसन...

Highlightsसध्या बहुतेक जणांचे बैठे काम आहे. दरदिवशी ८- १० तास बसून काम करणं खरोखरंच पाठीवर खूप जास्त स्ट्रेस टाकणारं आहे.

वयाच्या ४८ व्या वर्षीही कमालीची फिट असणारी मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या चाहत्यांसोबत नेहमीच वेगवेगळ्या आणि प्रत्येकालाच अतिशय उपयुक्त ठरतील अशा फिटनेस टिप्स (fitness tips) शेअर करत असते.  तिच्या फिटनेस टिप्स नियमितपणे बघून त्या फॉलो करणारेही अनेक आहेत. कारण ती ज्या टिप्स शेअर करते, त्या आपल्या रुटीनशी किंवा आपल्याला होणाऱ्या त्रासांशी खूपच मिळत्या जुळत्या असतात. आताही तिने मनावरचा ताण  कमी करण्यासाठी आणि पाठीचा कणा रिलॅक्स (how to relax spine?) करण्यासाठी एक खास योगासन सुचवलं आहे. 

 

तिने जी पोस्ट नुकतीच इन्स्टाग्रामला शेअर (instagram share) केली आहे, त्यात ती चक्रासन wheel pose दिसते आहे. सध्या बहुतेक जणांचे बैठे काम आहे. दरदिवशी ८- १० तास बसून काम करणं खरोखरंच पाठीवर खूप जास्त स्ट्रेस टाकणारं आहे. त्यातही लॅपटॉपवर काम करताना अनेक जणांची बसण्याची पद्धत चुकीची असते. कुणी खूप पुढे झुकून काम करतं, कुणी सारखं पाठीत वाकलेलं असतं. कुणाच्या खुर्च्या आणि त्यांची टेकण्याची पद्धत योग्य नसते. यासगळ्या गोष्टींचा नकळत परिणाम आपल्या बॉडी पोश्चरवर होतो आणि त्यामुळेच मग कमी वयातच पाठीचं दुखणं मागे लागतं. मान- पाठ आखडून जाते. त्यासाठीच तर मलायकाने सांगितलेलं चक्रासन उपयुक्त ठरणार आहे. 

 

कसं करायचं चक्रासन?
- चक्रासन हा एक अवघड योगाप्रकार मानला जातो. या आसनाची उत्तम स्थिती जमण्यासाठी तुम्हाला रेग्युलर वर्कआऊटची सवय पाहिजे. 
- पहिल्यांदाच चक्रासन करणार असाल तर त्यापुर्वी ८ ते १० मिनिटांचं वार्मअप आणि ५ सुर्यनमस्कार करून घ्या. यामुळे आसनस्थिती लवकर जमायला बरे पडेल.
- आता आसन करण्यासाठी पाठीवर झोपा. दोन्ही हात कोपऱ्यात वाकवून दोन्ही कानांच्या आजूबाजूला ठेवा. हाताच्या बोटांची दिशा डोक्याच्या मागच्या बाजूला असावी.
- दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून तळपाय शरीराच्या शक्य तेवढ्या जवळ आणावेत.
- आता हिप्स, कंबर, पाठ उचलण्याचा हळूहळू प्रयत्न करावा.
- हे सगळे उचलल्या गेले की सगळ्यात शेवटी छाती आणि डोके उचलावे.
- सुरुवातीला काही दिवस एवढे आसन केले तरी पुरे होते. नंतर मात्र दोन्ही तळपाय आणि तळहात अधिकाधिक एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करावा. ही आसनस्थिती ३० सेकंद टिकवावी.

 

चक्रासन करण्याचे फायदे (Benefits Of Chakrasana)
- मानेचं, पाठीचं दुखणं कमी करण्यासाठी उपयुक्त
- बॉडी टोन्ड राहण्यासाठी उत्तम व्यायाम
- पोटावरची चरबी करण्यासाठी चक्रासन अतिशय फायद्याचे ठरते.
- मासिक पाळीत खूप रक्तस्त्राव किंवा खूप पोटदुखी होत असेल, तर महिनाभर नियमितपणे चक्रासन केल्यास खूपच चांगला परिणाम दिसून येतो.
- डोक्याच्या भागात रक्ताभिसरणाचा वेग सुधारण्यासाठी उत्तम आसन
- या आसनस्थितीमुळे शारिरीक थकवा तर दूर होतोच, पण मनावरचा ताण कमी करण्यासाठीही हे आसन उपयुक्त ठरतं.

 

Web Title: Malaika Arora suggest chakrasana for reducing back pain and relaxing spine due to wrong sitting position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.