lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > Kickback Squats: शिल्पा शेट्टीचे जबरदस्त किकबॅक, एनर्जी अशी कमाल की...व्यायाम करण्यातही मजा!

Kickback Squats: शिल्पा शेट्टीचे जबरदस्त किकबॅक, एनर्जी अशी कमाल की...व्यायाम करण्यातही मजा!

Fitness Tips by Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हिने तिचा एक जबरदस्त वर्कआऊट व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. वर्कआऊट करतानाचा तिचा उत्साह आणि एनर्जी खरोखरंच कमाल आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 05:37 PM2022-04-18T17:37:42+5:302022-04-18T17:39:17+5:30

Fitness Tips by Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हिने तिचा एक जबरदस्त वर्कआऊट व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. वर्कआऊट करतानाचा तिचा उत्साह आणि एनर्जी खरोखरंच कमाल आहे. 

Kick back squats workout of Actress Shilpa Shetty, Look at her tremendous energy  | Kickback Squats: शिल्पा शेट्टीचे जबरदस्त किकबॅक, एनर्जी अशी कमाल की...व्यायाम करण्यातही मजा!

Kickback Squats: शिल्पा शेट्टीचे जबरदस्त किकबॅक, एनर्जी अशी कमाल की...व्यायाम करण्यातही मजा!

Highlightsस्क्वॅट हे मुळातच एक प्रकारचं हेवी वर्कआऊट. त्यात शिल्पाने स्क्वॅट करता करता त्यात किक बॅकही केलं आहे.अर्थातच हे दोन्ही एकत्रित करण्यासाठी तुमचा फिटनेसही जबरदस्त असायला हवा.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही नेहमीच तिच्या चाहत्यांना फिटनेस मोटीव्हेशन देत असते. कधी योगाचे महत्त्व समजावून सांगते तर कधी आहाराविषयी टिप्स देते.. आता शिल्पाने (Fitness Tips by Shilpa Shetty) नुकताच तिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर (instagram share) केला असून यामध्ये ती kickback squat वर्कआऊट करताना दिसते आहे. हे वर्कआऊट करताना तिच्या फिटनेस (fitness) ट्रेनर तिच्यासोबत असून कोणताही व्यायाम किती एनर्जेटिक असू शकतो किंवा आपण तो किती आनंद घेत करू शकतो, हे शिल्पाचा वर्कआऊट व्हिडिओ पाहून लक्षात येतं..

 

स्क्वॅट हे मुळातच एक प्रकारचं हेवी वर्कआऊट. त्यात शिल्पाने स्क्वॅट करता करता त्यात किक बॅकही केलं आहे. किक बॅक स्क्वॅट हे अतिशय डायनॅमिक प्रकारचं वर्कआऊट समजलं जातं. अर्थातच हे दोन्ही एकत्रित करण्यासाठी तुमचा फिटनेसही जबरदस्त असायला हवा. शिल्पाच्या बाबतीत तर फिटनेसचा प्रश्न नाहीच. शिवाय वर्कआऊट, योगा हे तिच्या अगदी आवडीचे विषय. त्यामुळे हा अवघड व्यायामही ती अतिशय छान पद्धतीने एन्जॉय करताना दिसते आहे. या वर्कआऊटमध्ये असं दिसतंय की एकदा ती स्क्वॅट करते आहे, तर त्यानंतर लगेचच ती एका पायाने बॅक कीक मारते आहे. अशा पद्धतीने दोन्ही पायांनी किक बॅक करून तिने तिचं वर्कआऊट शेड्यूल पुर्ण केलं.

 

kickback squat वर्कआऊट करण्याचे फायदे (benefits)
- शरीर आणि मन यांचं उत्तम संतुलन या व्यायाम प्रकारात राखलं जातं.
- किकबॅक स्क्वॅट हा व्यायाम प्रामुख्याने हिप्स आणि थाय मसल्सच्या बळकटीसाठी केला जातो.
- टोन्ड लेग मिळवायचे असतील तर हे वर्कआऊट परफेक्ट मानलं जातं. 
- कंबरेच्या स्नायुंना बळकटी देण्यासाठीही हा व्यायाम उत्तम मानला जातो.
- kickback squat वर्कआऊटमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
- संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होत असल्याने हृदयासाठीही हा व्यायाम प्रकार उत्तम मानला जातो. 

 

Web Title: Kick back squats workout of Actress Shilpa Shetty, Look at her tremendous energy 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.