lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > ओटी पोट सुटलंय-व्यायामाला वेळ नाही? रात्रीच्या जेवणानंतर इतका वेळ चाला, स्लिम पोट होईल

ओटी पोट सुटलंय-व्यायामाला वेळ नाही? रात्रीच्या जेवणानंतर इतका वेळ चाला, स्लिम पोट होईल

How to Walk to Lose Weight : या चुकीच्या सवयीमुळे अन्न पचायला वेळ लागतो  तर कधी वजनही वाढू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 05:43 PM2024-02-16T17:43:19+5:302024-02-17T00:52:13+5:30

How to Walk to Lose Weight : या चुकीच्या सवयीमुळे अन्न पचायला वेळ लागतो  तर कधी वजनही वाढू शकते.

How to Walk to Lose Weight : Walking For Weight Loss How to Use Walking For Weight Loss | ओटी पोट सुटलंय-व्यायामाला वेळ नाही? रात्रीच्या जेवणानंतर इतका वेळ चाला, स्लिम पोट होईल

ओटी पोट सुटलंय-व्यायामाला वेळ नाही? रात्रीच्या जेवणानंतर इतका वेळ चाला, स्लिम पोट होईल

 निरोगी, फिट राहण्यसाठी फक्त खाणंपिणंच नाही तर काही सवयी चांगल्या असणंसुद्धा गरजेचं  असतं.  दिवसभराच्या थकव्यानंतर बरेचजण रात्रीचे जेवण करून लगेच झोपायला जातात. (Walking Tips)असं करणं तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतं तुम्हालाही अशी सवय असेल तर तुम्ही ही सवय त्वरीत बदला. (How to Walk to Lose Weight) या चुकीच्या सवयीमुळे अन्न पचायला वेळ लागतो  तर कधी वजनही वाढू शकते. जर तुमचे वजन जास्त वाढत असेल तर रात्रीच्या जेवणानंतर थेट झोपण्याची चूक करू नका. डॉ. जितेंद्र  शर्मा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Walking Tips For Weight Loss)

रात्रीच्या जेवणानंतर १५ ते ३० मिनिटं वॉक केल्याने पचनक्रिया चांगली राहते. अन्न पचण्यास मदत होते. जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा पचनक्रिया चांगली राहते आणि जास्त मंद होते. यामुळे पोटाच्या समस्याही उद्भवू शकतात.

दात पिवळे, चिकट झालेत? १ चुटकी मिठात 'हा' पदार्थ मिसळून दात घासा, पांढरेशुभ्र दिसतील दात

एक्सपर्ट्सच्यामते  खाल्ल्यानंतर थोडावेळा वॉक केल्यानं ब्लड शुगर किंवा ब्लड ग्लुकोज लेव्हल नियंत्रणात राहते. रोज व्यायाम केल्याने गॅस, ब्लोटींग, अनिद्रेची समस्या दूर होते आणि हृदय निरोगी  राहते. जेवल्यानंतर रोज  चालायला गेलात तर अपचन, पोटदुखीच्या वेदना कमी होतात. 

खाल्ल्यानंतर वॉक केल्याने मानसिक आरोग्यात सुधारणा होते. इतकंच नाही तर स्ट्रेस वाढवणारे हॉर्मोन कॉर्टिसोल कमी होते.  व्यक्ती फिरते तेव्हा तिच्या शरीरात एंडॉर्फिन रीलिज  होते. हे एक नैसर्गिक वेदनाशामक आहे. यामुळे भिती वाटणं, अस्वस्थ वाटणं कमी होतं. मूड चांगला राहतो, ताण-तणाव कमी होतो आणि शरीर रिलॅक्स राहण्यास  मदत होते. १० ते १५ मिनिटं नक्की चाला.

रात्री चाललल्यामुळे तुम्हाला हार्ट डिसिज, स्ट्रोक यांसारख्या आजारांचा  धोका कमी होतो. (CDC)  सेंटर फॉर डिसीज कंट्रोल एंटी प्रिव्हेशंनच्यामते हेल्दी हार्टसाठी व्यक्तीने प्रत्येक आठवड्याला ५ दिवस कमीत कमी  ३० मिनिटं व्यायाम करायला हवा. तुम्ही जेवल्यानंतर ३० मिनिटं पायी चालू शकता. नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण केल्यानंतर १० मिनिटांसाठी फिरायला जा. 

Web Title: How to Walk to Lose Weight : Walking For Weight Loss How to Use Walking For Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.