lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > मांड्या-निंतब पसरट, जाड दिसतात? घरीच 5 सोपे व्यायाम करा, झटपट बारीक व्हाल-फिट दिसाल

मांड्या-निंतब पसरट, जाड दिसतात? घरीच 5 सोपे व्यायाम करा, झटपट बारीक व्हाल-फिट दिसाल

How to Get Rid Of Thighs Fat And Hips Fat : 5 Important Things To Do If You Want To Reduce Thigh Fat

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 11:35 AM2024-03-22T11:35:17+5:302024-03-22T11:47:04+5:30

How to Get Rid Of Thighs Fat And Hips Fat : 5 Important Things To Do If You Want To Reduce Thigh Fat

How to Get Rid Of Thighs Fat And Hips Fat : 5 Important Things To Do If You Want To Reduce Thigh Fat | मांड्या-निंतब पसरट, जाड दिसतात? घरीच 5 सोपे व्यायाम करा, झटपट बारीक व्हाल-फिट दिसाल

मांड्या-निंतब पसरट, जाड दिसतात? घरीच 5 सोपे व्यायाम करा, झटपट बारीक व्हाल-फिट दिसाल

लठ्ठपणा असलेल्या लोकांमध्ये चरबी जमा होणं हे खूपच कॉमन आहे.  जेनेटिक्स, वाढतं वय आणि हॉर्मोन्समध्ये होणारे बदल यामुळे चरबी जास्त सुटत जाते. मांड्यांना शेपमध्ये ठेवण्यासाठी रोजच्या जीवनात काही गोष्टींमध्ये बदल करू शकता. (Fat Loss Tips) जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात पाणी जास्त तयार होते. ब्लॉटिंगमुळे मांड्या तसंच शरीराच्या इतर भागांचा आकारही बदलत जातो. (How to Reduce Hips Fat)

अशावेळी शरीरात वॉटर रिटेंशन रोखण्यासाठी कमी प्रमाणात मीठ खा. इलेक्ट्रॉल्समध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त  असते. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वाढतो आणि बॉडी फॅट लवकर बर्न होण्यास मदत होते. (How to Get Rid Of Thighs Fat And Hips Fat) घरच्याघरी काही सोपे व्यायाम करून शरीर मेंटेन ठेवू शकता. 

१) स्क्वाट्स

हेल्थलाईनच्या रिपोटर्नुसार स्क्वाट्स हा ओव्हरऑल व्यायाम आहे. ज्यामळे मसल्सची ग्रोथ चांगली होते तुम्ही वजन घेऊन किंवा वजन न घेताही स्क्वाट्स हा व्यायाम करू शकतात.

२) साईड लंजेस

साईड लंजेस हा व्यायाम केल्याने स्नायू मजबूत होतात याशिवाय गंभीर आजारांपासूनही बचाव होतो.  ज्यामुळे पायांचे स्नायू व्यवस्थित ताणले जातात. घरच्याघरी हा व्यायाम करणं एकदम सोपं आहे. 

सकाळ-संध्याकाळ चालता पण पोट जसंच्या तसंच? किती, कसं चालायचं योग्य पद्धत पाहा-स्लिम व्हा

३) वॉल सिट

याशिवाय  भिंतीला टेकून तुम्ही वॉल सिट हा व्यायाम करू शकता. ज्यामुळे पायांच्या स्नायूंवर दबाव येतो.  भिंतीला टेकून २० ते ३० सेकंद होल्ड करा त्यानंतर सामान्य स्थितीत या.

४) जंपिंग स्क्वॅक्टस

जंपिंग स्क्वॅक्टस केल्यानं शरीराचे स्नायू चांगले राहतात आणि व्यायामही व्यवस्थित होतो. जंपिग स्क्वॅक्टस करण्यासाठी तुम्ही बॅण्डसचा वापरही करू शकता. यामुळे ओव्हरऑल बॉडी फॅट कमी होण्यास मदत होईल.

सद्गुरुंवर मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी-डोक्याला होती सूज, मेंदूचे विकार का होतात, लक्षणं-उपाय पाहा

५) शिड्या चढ-उतर

शिड्या चढ-उतार करून तुम्ही पायांना योग्य शेप देऊ शकता. हा एक उत्तम कार्डिओवॅस्क्युलर व्यायाम आहे. ज्यामुळे मांड्या टोन्ड होतात आणि अतिरिक्त चरबीही कमी होते. 

मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी कोणता व्यायाम उत्तम ठरतो? (How to reduce Hip Fat)

कार्ब्स ग्लायकोजन बदलून पाण्याबरोबर लिव्हर आणि मांसपेशींमध्ये जमा होतात. तुम्ही जितके कार्बोहायड्रेट्स खाता तितकंच तुमच्या शरीरात पाणी जमा होईल. अशात कार्ब्सयुक्त फुड इन्टेक कमी करायला हवा. ज्यामुळे लठ्ठपणा कमी होईल. जर तुम्हाला जीमला न जाता मांड्याची चरबी कमी करायची असेल तर लिफ्टऐवजी जिने चढ उतर करा. हा एक प्रभावी व्यायाम आहे. ज्यामुळे मांड्यांचे स्नायू मजबूत होतात आणि फॅट बर्निंगही वेगाने होते.

कार्डिओ व्यायाम मांड्या आणि नितंबांची चरबी कमी  करण्याचा एक उत्तम व्यायाम आहे. यासाठी तुम्ही रनिंग किंवा डान्सिंग या पर्यायांची निवड करू शकता. सायकल चालवल्याने मांड्याची चरबी कमी होण्यास मदत  होते. याशिवाय मांड्याचे स्नायू स्ट्राँग होतात. पाय पसरवून वॉक करा. यामुळे इनर थाईस आणि शरीराच्या खालचा भाग टोन्ड होण्यास मदत होते. 

Web Title: How to Get Rid Of Thighs Fat And Hips Fat : 5 Important Things To Do If You Want To Reduce Thigh Fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.