Lokmat Sakhi >Fitness > आपल्या वयानुसार किती झोप रोज आवश्यक असते ? कमी झोप झाली तर...

आपल्या वयानुसार किती झोप रोज आवश्यक असते ? कमी झोप झाली तर...

According To Your Age How Many Hours Of Sleep Are Enough For Good Health ? : आपल्यासाठी झोप का महत्वाची आहे व आपल्या वयोमानानुसार आपण किती तासांची झोप घेतली पाहिजे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2023 09:08 PM2023-08-19T21:08:14+5:302023-08-19T21:25:00+5:30

According To Your Age How Many Hours Of Sleep Are Enough For Good Health ? : आपल्यासाठी झोप का महत्वाची आहे व आपल्या वयोमानानुसार आपण किती तासांची झोप घेतली पाहिजे....

How Many Hours Should a Sleep Know The Right Dosage Of Sleep According To Your Age. | आपल्या वयानुसार किती झोप रोज आवश्यक असते ? कमी झोप झाली तर...

आपल्या वयानुसार किती झोप रोज आवश्यक असते ? कमी झोप झाली तर...

झोप ही आपल्या सर्वांसाठीच अतिशय महत्वाची गोष्ट असते. झोप ही अन्न, पाण्याइतकीच सर्वात महत्वाची शारीरिक गरज आहे. आपल्या आयुष्यावर, आरोग्यावर आणि एकूणच दिवसभराच्या रुटीनवर झोपेचा खूप मोठा प्रभाव असलेला दिसून येतो. फिट राहण्यासाठी चांगली झोप घेणं आवश्यक आहे. झोप शरीराच्या प्रत्येक भागाला आराम देते. त्यामुळे शरीर पुढच्या दिवसासाठी तयार होत असते. झोप शरीरासोबत मन, बुद्धि आणि इतर इंद्रियांनाही ताजेतवाने करते. यामुळेच आपले शरीर पुन्हा नव्याने तयार होत असत. प्रमाणापेक्षा जास्त झोप किंवा कमी झोप घेतली तर आजारी पडण्याची देखील शक्यता असते. योग्य प्रमाणांत झोप घेतल्यामुळे शरीराला पोषण मिळत असते.  

जर आपली झोप योग्य प्रमाणांत झाली नाही तर अपचन, गॅस, अ‍ॅसिडीटी अशा समस्या उद्भवू शकतात. एवढेच नव्हे तर हार्मोनल इम्बॅलेन्स होऊन वेगवेगळ्या शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. युकेच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस (National Health Service) आणि अमेरिकेच्या नॅशनल स्लिप फाउंडेशन (National Sleep Foundation) यांच्यानुसार, किमान ८ तासांची झोप घेणे गरजेचे असते. रात्रीची शांततापूर्ण झोप ही आपल्यासाठी एक वरदान ठरू शकते. झोप पूर्ण झाल्यावर आपल्या सर्व शारिरीक क्रिया सुरळीत पार पडतात. आपली बुद्धी, इंद्रिये आणि इतर अवयव अगदी पूर्ण क्षमतेने काम करण्याच्या स्थितीत असतात. अशी ही झोप कितीही महत्वाची असली तरीही कोणत्या वयोगटांतील व्यक्तींनी नेमकी किती तासांची झोप घ्यावी हे देखील तितकेच महत्वाचे असते(How Many Hours Should a Sleep Know The Right Dosage Of Sleep According To Your Age).

नॅशनल स्लीप फाउंडेशन नुसार (National Sleep Foundation) कोणत्या वयातील व्यक्तींनी किती झोप घ्यावी... 

१. ० ते ३ महिन्यांच्या वयोगटातील बाळांनी १४ ते १७ तासांची झोप घेतली पाहिजे.  

२. ४ ते १२ महिन्यांच्या वयोगटातील लहान मुलांनी १२ ते १६ तासांची झोप घेतली पाहिजे. 

३. १ ते २ वर्षांच्या मुलांनी ११ ते १४ तास झोपावे.

४. ३ ते ५ वर्षांच्या मुलांनी १० ते १३ तास झोपावे. 

सकाळी उठल्या उठल्या ढसाढसा पाणी पिणं योग्य की अयोग्य ? आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात, तसे करावे की नाही...

घोट - घोट पाणी पिण्याचा आहे खास नियम, लठ्ठपणा ते डिहायड्रेशन पर्यंतच्या समस्या होतील दूर...

५. ६ ते ९ वर्षांच्या मुलांनी ९ ते १२ तास झोपावे.

६. १४ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांना दररोज ८ ते १० तासांच्या झोपेची आवश्यकता असते.

७. तरुणांनी ७ ते ९ तासांची झोप घेतली पाहिजे. 

८. ६५ वर्षांवरील लोकांनी दररोज ७ ते ८ तासांची झोप घ्यावी.

सिधे रस्ते की उलटी चाल! डोकं फारच भंजाळलं, स्ट्रेस वाढला तर १ सोपा उपाय...

फॅट टू फिट प्रवासात शहनाज गिल सकाळी प्यायची सिक्रेट ड्रिंक, इतकं स्वस्त की कुणालाही परवडेल...

महिलांनी जास्त झोप घ्यावी... 

नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या संशोधनानुसार, किशोरवयीन मुलींना ८ ते १० तासांची झोप आवश्यक असते. त्याचवेळी, २४ ते ६४ वर्षे वयोगटातील महिलांनी दिवसातून ७ तास झोप घेणे आवश्यक आहे. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, पुरुषांपेक्षा महिलांना जास्त झोप लागते. प्रत्येक स्त्रीने पुरुषापेक्षा २० मिनिटे जास्त झोपले पाहिजे. याचे कारण असे की महिलांचा मेंदू पुरूषांपेक्षा जास्त काम करतो, ज्यासाठी त्यांना पुन्हा रिकव्हर होण्यासाठी रात्री अधिक झोपेची आवश्यकता असते.

Web Title: How Many Hours Should a Sleep Know The Right Dosage Of Sleep According To Your Age.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.