lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > सिधे रस्ते की उलटी चाल! डोकं फारच भंजाळलं, स्ट्रेस वाढला तर १ सोपा उपाय...

सिधे रस्ते की उलटी चाल! डोकं फारच भंजाळलं, स्ट्रेस वाढला तर १ सोपा उपाय...

5 reasons why you should consider walking backwards for losing weight and gaining strength : चालण्याचा तर फायदा होतोच, पण उलटं चालण्याचे फायदे अनेक, डोकं ताळ्यावर आणणारा खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2023 08:09 PM2023-05-20T20:09:57+5:302023-05-20T20:13:00+5:30

5 reasons why you should consider walking backwards for losing weight and gaining strength : चालण्याचा तर फायदा होतोच, पण उलटं चालण्याचे फायदे अनेक, डोकं ताळ्यावर आणणारा खास उपाय

Here are the 5 benefits of reverse walking that will make you a fan | सिधे रस्ते की उलटी चाल! डोकं फारच भंजाळलं, स्ट्रेस वाढला तर १ सोपा उपाय...

सिधे रस्ते की उलटी चाल! डोकं फारच भंजाळलं, स्ट्रेस वाढला तर १ सोपा उपाय...

फिट राहण्यासाठी चालणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम मानला जातो. यामुळे आपले वजन तर नियंत्रणात राहतेच शिवाय रक्तदाब, मधुमेह, हृदय आणि किडनीशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. याशिवाय रोज सकाळी चालण्याने शरीराला व्हिटॅमिन-डी सुद्धा मिळते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. म्हणूनच डॉक्टर दररोज सकाळी ४० मिनिटे चालण्याचा सल्ला देतात. तंदुरूस्त राहण्यासाठी लोकं व्यायामाला महत्व देतात. त्यासाठी सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळी नियमित चालणं- धावणं पसंत करतात. रोज अशाप्रकारे व्यायाम(Exercise) केल्याने शरीराला खूप फायदा होतो. आपल्या रोजच्या व्यायाम प्रकारांत आपण सरळ चालण्याचा व्यायाम तर करतोच परंतु कधी उलटे चालण्याचा म्हणजेच रिव्हर्स वॉकिंग करण्याचा प्रयत्न केला आहे का ? 

तज्ज्ञांनुसार, उलट चालणे किंवा बॅक स्टेप चालण्याने तुमच्या हृदय, मेंदू आणि चयापचय क्रियेला खूप फायदा होतो. तसेच कॅलरीजही कमी होतात. आरोग्यतज्ज्ञ लोरी शेमेक यांच्या मते, १०० पावले उलट चालणे हे १००० पावले सरळ चालण्याच्या बरोबरीचे असते. उलट चालण्यामुळे आपले हृदय (Heart) जलद गतीने पंप करते आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा अधिक जलद प्रामाणात होतो. रिव्हर्स वॉकिंग करण्याचा आपल्या शरीराला नेमका काय फायदा होतो, एक्स्पर्ट काय सांगतात ते पाहूयात(Here are the 5 benefits of reverse walking that will make you a fan).  

रिव्हर्स वॉकिंगबद्दल तज्ज्ञांचे मत...

रिव्हर्स वॉकिंग बद्दल तज्ज्ञ म्हणतात, "उलट चालणे आपल्या मेंदू आणि हृदयासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे आपल्या चयापचय क्रियेचा वेग वाढतो. तसेच रिव्हर्स वॉकिंग केल्याने आपण आपल्या सामान्य चालण्यापेक्षा जास्त कॅलरीज बर्न करतो." त्याचबरोबर "इंटरनॅशनल जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, रिव्हर्स वॉकिंग हा सर्वोत्तम कार्डिओ व्यायाम आहे, ज्यामुळे वजन कमी करण्यासोबतच संपूर्ण शरीरात अनेक बदल दिसून येतात." 

रोज मॉर्निंग वॉकला जाता पण वजन कमीच होत नाही? ५ गोष्टी करा, वजन आणि होईल कमी...

रिव्हर्स वॉकिंग करण्याचे फायदे :- 

१. स्नायूंसाठी फायदेशीर :- उलट चालण्याने आपल्या पोटरीचे स्नायू (Calf Muscle), क्वाड्रीसेप्स (Quadriceps) , ग्लूट्स (Glutus) वर चांगला परिणाम होतो. तसेच मेंदूलाही वेगळ्या पद्धतीने कार्य करण्यास मदत होते.

जॅकलीन फर्नांडिसने केलेली ही झुलती कसरत पाहिली का? फिटनेससाठी जबरदस्त व्यायाम, पाहा फोटोज...

२. मन शांत राहते :- जर्नल ऑफ फिजिकल थेरपी सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, उलटे चालल्याने मानसिक संतुलन सुधारते तसेच शरीरात हॅप्पी हार्मोन्सची निर्मिती होते जे तुम्हाला शांत ठेवण्यास मदत करतात.

३. हृदयाला फायदा :- उलट चालल्यामुळे शरीराच्या अवयवांचे संतुलन सुधारते,असे मानले जाते. तसेच शरीराच्या खालच्या अंगांची हालचाल आणि चालणे यांचा समन्वय साधला जातो. रेट्रो वॉकिंग केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. त्याचबरोबर रिव्हर्स वॉकिंग केल्याने गुडघ्यांमधील सांधेदुखीपासून मुक्तता मिळू शकते. 

४. चयापचय क्रियेचा वेग वाढतो :- आपले हृदय उलट चालल्याने वेगाने धडकते, तसेच चयापचय क्रियेत वाढ होते. यामुळे आपण अगदी कमी वेळेत अधिक कॅलरी बर्न करू शकतो. तसेच शरीराचा समतोल राखण्यासाठी हा उत्तम व्यायाम असल्याचे मानले जाते. 

५. दृष्टी सुधारते :-  उलट चालणे हे आपल्या शरीराच्या एकूण आरोग्यासाठी खूप चांगले असते त्यामुळे आपली दृष्टीही चांगली राहते.

Web Title: Here are the 5 benefits of reverse walking that will make you a fan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.