Lokmat Sakhi >Fitness > रोज न चुकता फक्त २ मिनिटं करा सोपे भुजंगासन, पाठदुखी थांबेल-पोटावरची चरबीही होईल कमी

रोज न चुकता फक्त २ मिनिटं करा सोपे भुजंगासन, पाठदुखी थांबेल-पोटावरची चरबीही होईल कमी

Health Benefits of doing Bhujangasana regularly : आरोग्याच्या विविध समस्यांवर उपयुक्त आसन करण्याचे ४ फायदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2023 04:22 PM2023-10-09T16:22:39+5:302023-10-09T16:35:04+5:30

Health Benefits of doing Bhujangasana regularly : आरोग्याच्या विविध समस्यांवर उपयुक्त आसन करण्याचे ४ फायदे...

Health Benefits of doing Bhujangasana regularly : Do simple Bhujangasana for just 2 minutes every day without fail, back pain will stop - belly fat will also reduce | रोज न चुकता फक्त २ मिनिटं करा सोपे भुजंगासन, पाठदुखी थांबेल-पोटावरची चरबीही होईल कमी

रोज न चुकता फक्त २ मिनिटं करा सोपे भुजंगासन, पाठदुखी थांबेल-पोटावरची चरबीही होईल कमी

योगासने हा आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असा व्यायाम आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. विविध अवयवांना उपयुक्त अशी अनेक आसने आपण योगसाधनेत करतो. त्याचप्रमाणे भुजंगासन हे योगसाधनेतील एक महत्त्वाचे आसन असून या आसनाचे शरीराला अनेक फायदे होतात. सूर्य नमस्कारातही भुजंगासनाचा समावेश आहे. भुजंगासनाचा मुख्य परिणाम हा पोटाच्या आणि पाठीच्या स्नायुंवर होतो. भुजंगासनामुळे पोटाचे स्नायू सक्रीय होतात तर पाठीचे स्नायू मजबूत होतात. रक्तप्रवाह सुधारण्याबरोबरच श्वसनाच्या समस्या दूर होण्यासाठीही या आसनाचा अतिशय चांगला उपयोग होतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी भुजंगासन करण्याला विशेष महत्व आहे. या आसनाच्या नियमित सरावाने पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे पोटाच्या अनेक समस्यांवर हे आसन प्रभावी ठरू शकते. ज्या लोकांना बद्धकोष्ठता किंवा पोटाशी संबंधित समस्या आहेत, अशा लोकांनी दररोज भुजंगासन केले पाहिजे (Health Benefits of doing Bhujangasana regularly). 

भुजंगासन कसे करावे? 

भुजंगासन करताना पोटावर झोपावं. दोन्ही पाय जवळ जवळ ठेवावेत. दोन्ही हात छातीच्या बाजूने जमिनीवर टेकवून ठेवावेत.  हनुवटी जमिनीला टेकलेली असावी.  लांब श्वास घेत दोन्ही हातांवर भार देत वर उठावं. नजर वर छताकडे ठेवावी.  आसन सोडताना श्वास सोडत हळूहळू पोटाचा, छातीचा भाग जमिनीला टेकवावा आणि सगळ्यात शेवटी कपाळ जमिनीला टेकवावे. असे हे भुजंगासन करायला अतिशय सोपे असून त्यासाठी फारसा वेळही लागत नाही. 

(Image : Google )
(Image : Google )

आसनाचे फायदे

१. शरीरात चयापचयाची क्रिया बिघडली तर किडनी विकार, फॅटी लिव्हर यासारख्या समस्या निर्माण होतात. भुजंगासनामुळे चयापचयाची क्रिया सुधारते. शरीरातला रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळेच किडनी आणि यकृताचं काम सुरळीत ठेवण्यासाठी भुजंगासनाचा उपयोग होतो.

२.  भुजंगासन केल्यानं पोटाचे स्नायू ताणले जातात त्यामुळे वाढलेलं पोट नियमित भुजंगासन केल्यानं कमी होतं. तसेच संपूर्ण शरीराचं वजन नियंत्रित करण्याचं काम भुजंगासन करतं. म्हणूनच वजन कमी करण्याच्या उपायांमध्ये भुजंगासन करण्यास सांगितले जाते.

३. भुजंगासन हा एक स्ट्रेचिंग व्यायाम आहे. हे आसन केल्याने शरीरात एकप्रकारचा ताण निर्माण होतो. अशाप्रकारे ताण निर्माण करणाऱ्या व्यायामामुळे खांदे, पाठ आणि मान या अवयवांना आराम मिळतो. दिवसभर बैठे काम असणाऱ्यांना पाठदुखीची समस्या उद्भवते. अशावेळी पाठीचे स्नायू मजबूत आणि लवचिक करण्याचं काम भुजंगासन करतं. 

(Image : Google )
(Image : Google )

४. सायटिका, दमा यासरख्या समस्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी भुजंगासनाचा उपयोग होतो. भुजंगासन करताना पोट ताणलेलं असताना चालू असलेल्या मंद श्वसनाचा उपयोग फुप्फुसांचं आरोग्य सुधारण्यासाठी होतो. या आसनामुळे फुप्फुसं मजबूत होतात आणि श्वसनक्रियेसाठी याचा चांगला फायदा होतो. 


 

Web Title: Health Benefits of doing Bhujangasana regularly : Do simple Bhujangasana for just 2 minutes every day without fail, back pain will stop - belly fat will also reduce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.