lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > दुपारी झोपावंसं वाटतं, डुलकी लागते? झोपा बिंधास्त; नियम एकच 'वेळेचं' गणित पाळा, मिळवा पॉवर नॅप!

दुपारी झोपावंसं वाटतं, डुलकी लागते? झोपा बिंधास्त; नियम एकच 'वेळेचं' गणित पाळा, मिळवा पॉवर नॅप!

Nap in afternoon: सकाळच्या फर्स्ट हाफमध्ये दणादण सगळी कामं उरकली आणि दुपारचं जेवण झालं की घरी असलेल्या प्रत्येकाला थोडीशी डुलकी (power nap) मारण्याची जाम इच्छा होते.. (benefits of power nap) तुमचंही तसंच होत असेल आणि तुम्ही झोपायचं टाळत असाल, तर हे नक्की वाचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 06:33 PM2021-12-03T18:33:12+5:302021-12-03T18:36:02+5:30

Nap in afternoon: सकाळच्या फर्स्ट हाफमध्ये दणादण सगळी कामं उरकली आणि दुपारचं जेवण झालं की घरी असलेल्या प्रत्येकाला थोडीशी डुलकी (power nap) मारण्याची जाम इच्छा होते.. (benefits of power nap) तुमचंही तसंच होत असेल आणि तुम्ही झोपायचं टाळत असाल, तर हे नक्की वाचा...

Feeling sleepy in the afternoon, then have Power Nap! read the benefits of power nap | दुपारी झोपावंसं वाटतं, डुलकी लागते? झोपा बिंधास्त; नियम एकच 'वेळेचं' गणित पाळा, मिळवा पॉवर नॅप!

दुपारी झोपावंसं वाटतं, डुलकी लागते? झोपा बिंधास्त; नियम एकच 'वेळेचं' गणित पाळा, मिळवा पॉवर नॅप!

Highlightsपॉवर नॅप घेतली तर आपल्या शरीरात हॅप्पी हार्मोन्सचं संतुलन चांगलं राहतं आणि अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो...

सकाळी उठल्यापासून प्रत्येकाच्या मागे कसली ना कसली गडबड असते. यामध्ये घरातल्या महिलांची घाई गडबड तर आणखीनच वेगळी. मुलं, नवरा, घरातली इतर मंडळी यांचं सगळं करताना स्वत:च्या वेळा सांभाळायच्या आणि नंतर ऑफिसला पळायचं. ज्या मैत्रिणी गृहिणी असतात, त्यांची धावपळ घरातली इतर मंडळी आपापल्या कामाला गेल्यावर जरा शांत होते. पण मग घरातली इतर कामं आणि अस्ताव्यस्त झालेलं घर मोठ्या आशेने त्यांच्याकडे बघत असतं. घराचं गाडं पुन्हा रूळावर आणेपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ होते. जेवण झालं की मग जरा सुस्ती (benefits of power nap) यायला लागते आणि थोडीशी झोप (sleep after lunch) मारावी वाटते.

 

घरी असणाऱ्या प्रत्येकाचं असंच होतं. एवढंच काय ऑफिसमध्ये लंच झाल्यानंतरही अनेक जणांच्या डोळ्यांवर झोप चढलेली असते. पण नाईलाज असल्याने त्यांना झोपता येत नाही एवढंच. तर ज्या मैत्रिणी गृहिणी आहेत, त्यांच्याकडे दुपारी झोप काढण्याची चांगली संधी असते. पण त्यामुळे आपले वजन वाढेल का, आपण लठ्ठ होऊ का, वेगवेगळे आजार मागे लागतील का, अशी शंकाही त्यांना छळते. त्यामुळे दुपारच्या झोपेचं सुख काही जणी स्वत:हून सोडून देतात. पण मैत्रिणींनो जर दुपारच्या डुलकीचे काही नियम समजून घेतले तर नक्कीच ही झोप तुम्हाला अपाय करणारी नाही तर भरपूर फायदा देणारी ठरेल.

 

आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी देखील वारंवार त्यांच्या अनेक लेक्चर्समधून दुपारच्या झोपेचं महत्त्व सांगितलं आहे. दुपारची झोप घ्या पण ती वेळेचा नियम पाळून असं त्यांचं गणित आहे. दुपारची झोप फक्त २० मिनिटांचीच असावी. त्यापेक्षा जास्तही नको आणि कमीही नको. अशी २० मिनिटांची जर पॉवर नॅप घेतली तर आपल्या शरीरात हॅप्पी हार्मोन्सचं संतुलन चांगलं राहतं आणि अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो, असं त्यांचं मत आहे. याशिवाय वेगवेगळ्या संशोधनातूनही पॉवर नॅप योग्य वेळेची असेल, तर निश्चितच शरीरासाठी उपयुक्त आहे, असे अभ्यासकांनी सांगितले आहे.

पॉवर नॅप घेण्याचे फायदे
Healthy benefits of power nap

- पॉवर नॅपमुळे शरीरातील हार्मोन्सचं संतूलन राखलं जातं. जे हार्मोन्स शरीरासाठी चांगले असतात, त्यांचं सिक्रिशन वाढतं.
- शरीर आणि मनाचा थकवा दूर करण्यासाठी पॉवर नॅप उपयुक्त आहे.
- पॉवर नॅप घेतल्यामुळे उरलेल्या दिवसात पुन्हा जोमाने काम करण्यासाठी उर्जा मिळते. 
- पॉवरनॅपमुळे स्मरणशक्ती चांगली राहते.
- पॉवर नॅप घेतल्यामुळे हृदयविकाराचा, कर्करोगाचा, रक्तदाबाचा त्रास होण्याचा धोका कमी होतो.

 

कशी असावी पॉवर नॅप
How to take power nap in the noon?

- तुम्ही बेडवर झोपून पॉवर नॅप घेतली तरी चालेल. पण बेडवर एकदा झोपलं की तासभर जाग येत नाही, असं तुमचं होणार असेल, तर बेडवर झोपू नका. 
- बेडवर मागे उशा लावून उशीला टेकून रिलॅक्स बसून २० मिनिटांची पॉवर नॅप तुम्ही घेऊ शकता.
- खुर्चीवर बसल्या बसल्याही २० मिनिटांची डूलकी मारता येईल. 
- बेड, खुर्ची, झोका असं जिथे वाटेल तिथे बसा आणि पॉवर नॅप घ्या. फक्त ती २० मिनिटांपेक्षा अधिक नकाे. 
 

Web Title: Feeling sleepy in the afternoon, then have Power Nap! read the benefits of power nap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.