lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > फ्रोजन शोल्डरचा त्रास? आलिया भटची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी सांगतेय ५ व्यायाम, करून बघा 

फ्रोजन शोल्डरचा त्रास? आलिया भटची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी सांगतेय ५ व्यायाम, करून बघा 

Fitness Tips: फ्रोजन शोल्डर, स्टीफ शोल्डर किंवा खांदेदुखी (Exercise for stiff shoulders) असा कोणताही त्रास जाणवत असेल तर सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी (Anushka Parwani) यांनी सांगितलेले काही व्यायाम करून बघा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 08:13 AM2022-11-15T08:13:10+5:302022-11-15T08:15:01+5:30

Fitness Tips: फ्रोजन शोल्डर, स्टीफ शोल्डर किंवा खांदेदुखी (Exercise for stiff shoulders) असा कोणताही त्रास जाणवत असेल तर सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी (Anushka Parwani) यांनी सांगितलेले काही व्यायाम करून बघा.

Exercise for stiff shoulders or frozen shoulder, How to get relief from shoulder pain? | फ्रोजन शोल्डरचा त्रास? आलिया भटची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी सांगतेय ५ व्यायाम, करून बघा 

फ्रोजन शोल्डरचा त्रास? आलिया भटची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी सांगतेय ५ व्यायाम, करून बघा 

Highlightsअसा त्रास होऊ नये म्हणून किंवा असा त्रास असेल तर तो कमी करण्यासाठी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी यांनी सांगितलेले हे काही व्यायाम करून बघा.

कधी कधी ओझं उचलल्यामुळे, जड बॅग खांद्यावर बराच वेळ ठेवल्याने किंवा दुचाकी जास्त चालवणं झालं की खांदा आखडून जातो. फ्रोजन शोल्डर किंवा स्टीफ शोल्डरचा त्रासही अनेक जणांना असतो. याच्या वेदना तर खूप असतातच शिवाय खांदाच आखडून (frozen shoulder) गेला तर इतर हालचाली करण्यावरही बंधनं येतात. म्हणूनच असा त्रास होऊ नये म्हणून किंवा असा त्रास असेल तर तो कमी करण्यासाठी आलिया भट, करिना कपूर अशा सेलिब्रिटींची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी (Exercise for stiff shoulders by Anushka Parwani) यांनी सांगितलेले हे काही व्यायाम करून बघा.

 

खांदेदुखीसाठी व्यायाम
व्यायाम १

मांडी घालून किंवा वज्रासनात ताठ बसा. दोन्ही हात वर उचला आणि एकाचवेळी शक्य तेवढे मागे नेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा रिलॅक्स व्हा पुन्हा असा व्यायाम करा. एकूण ५ वेळा हा व्यायाम करावा.

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी मलायका अरोरा सांगतेय दंड योगा, बघा कसा करायचा हा व्यायाम 

व्यायाम २
यासाठी एका बेल्टचा किंवा टॉवेलचा वापर करू शकता. हात वर करा आणि दोन्ही हातात बेल्ट पकडा. हात गोलाकार फिरवत हात मागे न्या त्यानंतर पुन्हा तसेच विरुद्ध दिशेने फिरवत पुढे न्या. ४ ते ५ वेळा हा व्यायाम करा.

 

व्यायाम ३ 
दोन्ही गुडघे आणि तळहात जमिनीला टेकवा. यानंतर एका कोपऱ्यातून हात दुमडून एक तळहात डोक्याला लावा. त्यानंतर हाताचा कोपरा एकदा जमिनीला टेकवा तर दुसऱ्यांदा पुर्णपणे वर करा. दोन्ही हातांनी ही क्रिया प्रत्येकी ५- ५ वेळा करा.

कुणाल खेमूला छोटीशी डुलकी घेणं पडलं महागात, बघा तोपर्यंत लेकीने काय केली कमाल

व्यायाम ४ 
मऊ फरशीवर हा व्यायाम करा. पाय पुढे पसरून बसा. दोन्ही तळहातांच्या खाली रुमालाची घडी घ्या. हळूहळू दोन्ही तळहात मागच्या बाजूने घ्या पुन्हा पुर्ववत करा. हा व्यायामही ५ वेळा करा.

व्यायाम ५
श्वानासन ते भुजंगासन आणि पुन्हा भुजंगासन ते श्वानासन अशी क्रिया ५ वेळा करा. 

 

Web Title: Exercise for stiff shoulders or frozen shoulder, How to get relief from shoulder pain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.