lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Fitness > खूप राग येतो, चिडचिड होते? मीरा कपूर सांगतेय, मन आणि डोकंही शांत ठेवणारा उपाय

खूप राग येतो, चिडचिड होते? मीरा कपूर सांगतेय, मन आणि डोकंही शांत ठेवणारा उपाय

Pranayam That Helps To Get Mental Peace: कधी कधी खूप राग येतो, खूप चिडचिड होते... अशावेळी डोकं शांत ठेवणं गरजेचं असतं.. ते कसं हेच बऱ्याचदा समजत नाही, त्यासाठीच तर हा एक खास उपाय सांगतेय मीरा कपूर. (Mira Kapoor)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2022 02:49 PM2022-08-08T14:49:26+5:302022-08-08T15:01:57+5:30

Pranayam That Helps To Get Mental Peace: कधी कधी खूप राग येतो, खूप चिडचिड होते... अशावेळी डोकं शांत ठेवणं गरजेचं असतं.. ते कसं हेच बऱ्याचदा समजत नाही, त्यासाठीच तर हा एक खास उपाय सांगतेय मीरा कपूर. (Mira Kapoor)

Benefits of Bhramari Pranayam, Mira Kapoor is giving solution for reducing stress and anxiety | खूप राग येतो, चिडचिड होते? मीरा कपूर सांगतेय, मन आणि डोकंही शांत ठेवणारा उपाय

खूप राग येतो, चिडचिड होते? मीरा कपूर सांगतेय, मन आणि डोकंही शांत ठेवणारा उपाय

Highlightsवारंवार डाेकेदुखीचा त्रास होत असल्यास या प्राणायामने तो कमी होतो.रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते.  

एखाद्या अभिनेत्रीच्या फिटनेसची किंवा सौंदर्याची जेवढी चर्चा होते, तेवढीच चर्चा मीरा कपूरची (Mira Kapoor's fitness)होते. तसं पाहिलं तर ती काही अभिनेत्री नाही. ती शाहिद कपूरची पत्नी. पण तरीही तिने तिचं स्वत:चं असं जबरदस्त फॅन फॉलोईंग तयार केलं आहे. त्यामुळे ती काय करते, तिच्या आवडीनिवडी, तिच्याकडून येणाऱ्या ब्यूटी टिप्स, किंवा फिटनेस टिप्स या सगळ्या गोष्टी जबरदस्त व्हायरल होत असतात. सध्या मीरा कपूरची अशीच एक पोस्ट सोशल मिडियावर गाजते आहे. (Mira Kapoor is giving solution for reducing stress and anxiety)

 

मीरा कपूर फिटनेसच्या बाबतीत अतिशय जागरुक आहे. त्यामुळेच तर तिचा रोजचा व्यायाम, वर्कआऊट यासगळ्या गोष्टी तिच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. मीराने इन्स्टाग्रामवर नुकतीच जी पोस्ट शेअर केली आहे, ती सुद्धा फिटनेसबाबतच आहे. यात ती भ्रामरी प्राणायाम करत असून भ्रामरी प्राणायामचे फायदे  तिने सांगितले आहेत. यामध्ये ती म्हणतेय की तिने नुकताच तिचा व्यायाम म्हणजे तिचं रोजचं वर्कआऊट संपवलं असून आता ती मन आणि शरीर या दोन्ही गोष्टी रिलॅक्स करण्यासाठी, शांत करण्यासाठी प्राणायाम करणार आहे. आणि यासाठी तिने भ्रामरी प्राणायाम (Benefits of Bhramari Pranayam) करण्यास प्राधान्य दिले आहे. कोणतंही हेवी वर्कआऊट केल्यानंतर काही मिनिटांसाठी तरी प्राणायाम करायला पाहिजे, असं तिचं मत आहे. का करायला पाहिजे भ्रामरी प्राणायाम आणि कोणते त्याचे फायदे हे बघू या..

photo credit- google

भ्रामरी प्राणायाम कसे करावे?
(how to do bhramari pranayam)

- यासाठी सगळ्यात आधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा वज्रासन घालून ताठ बसा.
- यानंतर दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी कान बंद करा. चाफेकळी म्हणजेच पहिले बोट कपाळावर ठेवा. आणि उरलेल्या तिन्ही बोटांनी डोळे बंद करा.
- आता एक दिर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत सोडत ओमकार म्हणा. ओमकार म्हणताना 'ओम'चा उच्चार हा अवघ्या ३ ते ४ सेकंदांचा असावा, तर 'म'कार म्हणजेच 'म' चा उच्चार हा तुम्हाला सहजपणे जितका लांबवता येईल तितका लांबवावा.
- 'म'कार म्हणताना तो खूप जोरात नसावा. खालच्या स्वरात म्हणजेच खर्ज्यात असावा. आणि त्याची स्पंदन तुमच्या स्वरयंत्रात, तुमच्या कपाळावर तुम्हाला जाणवली पाहिजेत, अशा पद्धतीने म्हणावे. थाेडक्यात सांगायचे तर एखादा भुंगा ज्याप्रमाणे आवाज करतो, त्याप्रमाणे हा आवाज असावा. 
- अशा पद्धतीने ५ ते ६ वेळा भ्रामरी प्राणायाम करावे. 

 

भ्रामरी प्राणायामचे फायदे
(Benefits of bhramari pranayam)

- मानसिक आरोग्यासाठी अतिशय उत्तम.
- नैराश्य, संताप, चिडचिड, अस्वस्थता होत असेल तर मन शांत ठेवण्यासाठी उपयुक्त.
- मन एकाग्र होण्यासाठी फायदेशीर
- वारंवार डाेकेदुखीचा त्रास होत असल्यास या प्राणायामने तो कमी होतो.
- रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते.  
 

Web Title: Benefits of Bhramari Pranayam, Mira Kapoor is giving solution for reducing stress and anxiety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.